" लिहिते व्हा " असं आवाहन करत कार्यकारी समिती २०२२-२०२३ ने जून २०२२ ला पहिला ई बहर प्रकाशित केला.
'शुभारंभ' असा विषय देऊन सुरुवात करत वेगवेगळ्या सात सदारांमध्ये जसे,
१. दर महिन्याला एक नवा विषय
२. मुलुख मराठी - महाराष्ट्र आणि मायबोली मराठी विषयी माहिती देणारा
३. ललित -अनुभव ,लेख ,कादंबरी,वर्णन ह्यासारख्या विषयांनी परिपूर्ण
४. पुस्तक परीक्षण - विविध संदर्भातील पुस्तकांची माहिती आणि त्याच्या विषयीचे परीक्षण
५. स्वाद घराघरातला - प्रत्येकाच्या घरात विविध पद्धतीने केले जाणारे पदार्थ
६. कॅमेरा कैद - मोबाईल अथवा कॅमेरात कैद केलेले क्षण
७. छोटयांसाठी खास - लहान मुलांच्या कला,वाचन ह्या संदर्भातील विशेष सदर.
आणि नुकताच सुरु केलेला आठवा सदर
८. चलचित्र,
ह्या सर्व सदारांमध्ये सदस्यांनी अतिशय वाचनीय असे आम्हाला पाठवलेले स्वलिखित साहित्य, साजेश्या संग्रहित इमेजेस, खुलणारे रंग वापरून ह्या वर्षीचा बहर खरोखरच बहरला.
स्वागत- नवीन सदस्यांचे , कौतुक/शुभेच्छा - शैक्षणिक यश मिळालेल्या लहान मित्रमैत्रिणींचे ,आढावा- समितीने आयोजित केलेल्या प्रत्येक महिन्यातल्या कार्यक्रमाचा आढावा आणि त्याचे टिपलेले क्षण.ही सदरे सुद्धा मंडळातील सदस्यांसाठी आपुलकीची ठरली.
तसेच दिवाळी बहर छापील अंकासाठी लिहिणाऱ्यांचा प्रतिसाद आणि वाचकांचाही वेळोवेळी चांगला अभिप्राय मिळाला.
ह्या सर्व (जून २०२२ ते मे २०२३ पर्यंतच्या) ई मासिकांचा संग्रह असावा आणि तो कधीही कधीही वाचता यावा,
म्हणूनच आम्ही सगळी मासिके एकत्रित देत आहोत.
जून २२
जुलै २२
ऑगस्ट - सप्टेंबर २२
ऑक्टोबर २२- छापील बहर-दिवाळी अंक
नोव्हेंबर २२
डिसेम्बर २२
जानेवारी २३
फेब्रुवारी २३
मार्च २३
एप्रिल - मे २३
धन्यवाद
सौ मंजुषा किरण जोशी, सौ उन्नती विकास नाईक
बहर संपादक २०२२ -२०२३