- आपुलकी -
ह्या परक्या देशात मला इथं
परक परक का वाटत नाही ?
नसेल हे डोक्यावरचं आकाश माझ्या ओळखीचं
पण हा सूर्य तर माझा मित्र आहे !
नसेल हे पाणी माझं रोजचं
पण पाण्याची ओढ तर तीच आहे.
हा वाराही असेल मला अपरिचित
पण हा सुखद गारवा तर तोच आहे .
आणि नसेल ही माझी मातृभूमी
पण माझी भूमाता तर हीच आहे .
सौ. निर्मला महाजन,
पुणे.
+91 9890446708
No comments:
Post a Comment