यशस्वी Planning
किंवा नियोजन हे कुठल्याही process चा पाया
असते. आम्ही जेंव्हा याबाबत नियोजन सुरु केल
तेंव्हा आम्हाला समजले कि Cruise iteniraray म्हणजे क्रुझ चे वेळापत्रक अगदी काटेकोर
आणि त्यात मुख्यत्वे भर internatinally असलेल्या सुट्यांच्या व त्यानुसंगाने cruise
ज्या भागात फिरणार आहे त्यातील हवामानाचा विचार करून तयार केलेले असते.
जून जुलै
मध्ये युरोप व मध्य पुर्वेतील खास करून उत्तर्भागातील हवामान सुखद असते व सुट्ट्या
असतात, म्हणून युरोप मधील mediteranian cruize च्या विविध वेळापत्रकानुसार भरपूर
पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे १ का cruise कंपनी च्या वेगवेगळ्या वेळांच्या पर्यायाच्या
voyage तुम्हाला हवे त्या महिन्या मध्ये शोधण्यासाठी जर google केले तर अक्षरशः २०
ते २५ genuine पर्याय मिळू शकतात. अशा जवळपास ९-१० कंपन्यांचे मिळून जवळपास २५०
पर्याय उपलब्ध असतात.
काही खास cruise
Voyage च्या dedicated sites वर समुद्री व जगप्रसिध्द नद्यांमधून फिरणाऱ्या
Cruises चे भरपूर पर्याय व offers मिळतात. उदा. पूर्ण जग प्रदिक्षणेपासून १२१ दिवसांच्या
ते ५-७ दिवसांच्या पर्यायामधून निवड करता
येऊ शकते. यामध्ये www.cruisecritic.com किंवा त्यासम पुष्कळ sites मिळतात व
तुम्हाला पाहिजे त्या मौसमा मध्ये व खिशाला परवडेल अश्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे सफरींची
निवड होऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला सुट्ट्या हवामान आणि त्या देशात लागणारा Visa
प्रोसेसिंग Time ई. ची सांगड घालून नियोजन करावे लागते.
अर्थात तुम्ही
तुमच्या आर्थिक व उपलब्ध प्रवासी उद्देश्यानुसार त्या क्रुझेस निवडू शकता. वानगीदाखल
सांगायचे झाल्यास अमेरिकन (बहामा) किंवा अति पुर्वेतील (सिंगापोर-मलेशिया) देशांच्या
सफरींमध्ये भारतातील प्रख्यात प्रवासी कंपन्या त्यांचे प्रोग्राम क्रुझ itenirary ला
जोडून आखतात. अशा प्रकारच्या सफरींमध्ये तुम्हाला
बहामा (३-४ रात्रीचे) किंवा अलास्कन (७ ते ८ रात्रींचे), पनामा (१-२), पेनांग(२-३)
असे criuse Voyage करता येऊ शकते. हे Voyage Destination या प्रकारात मोडते.
या
व्यतिरिक्त नुसते Cruise शिप वर सुट्टी घालवण्यासाठी अशा काही खास Cruise वरील समुद्री
सफरी असतात त्यामध्ये Mediteranian, Carrabian, Norvagian, Antartic, Artict, Trans
Atlantic, Trans pacific असे कित्येक नुसते Cruise Voyages करताच म्हणून आखलेले routes
आहेत. हे सगळे Luxury Voyage या प्रकारातील असतात. म्हणून ज्या ठिकाणी मोठी शिप
लागू शकेल त्या ports लाच खास cruise berths तयार केलेले असतात. ते बहुतकरून नैसर्गिक
आणि आधुनिक बंदर (पोर्ट) आणि त्या सलंग्न शहरांना सामावूनच आखलेले असतात. शिप त्या
पोर्ट ला लागली कि दिवसा तेथील आजूबाजूचा परिसरातील पर्यटनाचा आस्वाद घेता येतो.
याला shore excursion असे संबोधले जाते. सगळ्या cruises रात्रीचा प्रवास करतात, जेणेकरून
तुम्हाला पुढचा दिवशी किमान ५/६ तास तरी shore excursion साठी उपलब्ध राहतात.
मी मागील प्रकरणामध्ये
सुचवल्यानुसार भारतातून बुकिंग केलेल्या cruise voyage नेहेमीच स्वस्त पडतात, त्याचे कारण त्यांना भारतातून उत्सुकांचा व हौशी मंडळींचा
जो एक मोठा वर्ग आहे त्यांना या प्रकारासाठी promote करायच असते. म्हणून भारता मधून promotional
offers चांगल्या मिळतात. म्हणजे सप्टेंबर, ते ऑक्टोबर मध्ये गणपती , दुर्गापूजा
अशा १ का आठवड्याच्या सुट्ट्या मिळू शकतात. पण जगामध्ये इतरत्र या दरम्यान शाळा
सुरु झ्लेलेया असल्या मुळे त्यांची मागणी कमी असते. त्यामुळे ज्या मंडळींना हा
मौसम सोयीचा असेल त्यांना offers ३५० $ ते ६०० $ प्रती माणशी (साधारण ७ एक दिवसांकरता)
पासून उपलब्ध होऊ शकतात. उदा. सध्या सुरू असलेली MSC ची ऑफर खाली चित्रात दाखवल्या
प्रमाणे आहे त्याचा लाभ ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर घेणे.(यात माझा कोणताही
आर्थिक हेतू नाही हे नम्रपणे नमूद करतो.)
अर्थात या
कंपनी च्या cruise ने आम्ही गेल्या वर्षी प्रवास केला होता म्हणून सांगू शकतो कि या
ऑफर मध्ये साधारणपणे ५ रात्रीन्चे जेवण, सकाळचा
ब्रेकफास्ट , व २२ तास ओपन असलेले काही खास Dining Venus मधील जेवण समाविष्ट असते,
पण सुरवातीच्या पोर्ट ला जाण्याचा विमान खर्च , Visa, शिप वरील पाणी, Drinks,
shore excursions, कॅसिनो ई. चा खर्च समाविष्ट नसतो.(Disclaimer: offers पडताळून
खात्री करावी).
shore excursions
नेट वरून माफक दरात आणि आपल्या खिशां नुसार घेता येतात.
यात
बाल्कनी कॅबीनस म्हणजे साधारणपणे अशा जागी मिळू शकतात.
बाल्कनी कॅबीन
मध्ये १ डबल बेड आणि १ सोफा कम डबल बेड attached bath असते.आपल्या कौटुंबिक गर्जे
नुसार आपण १-२ कॅबिन घेऊ शकता.
तर मंडळी,
उघडा तुमचे कॅलेंडर, करा जरुरी तजवीज आणि सुरु करा तुमच्या अनोख्या
सुट्टी ची तयारी! तुम्ही जर आर्थिक आणि
सुट्ट्यांच्या गणितात पुढे गेला असाल तर मग काहीच कठीण नाही ...
सचिन सबनीस
No comments:
Post a Comment