अचानक जग थोडा धूसर वाटू लागला
डोळ्यापुढे काहीतरी उगीचच दाटू लागला
ऐकलं होता नजर नेहेमी शोधक असावी
पण अगदीच स्वतःच्याच नजरेला शोधणारी नसावी
विचार आला जगाचा किंवा आपला दृष्टिकोन नसेल ना बदलला?
आत्मपरीक्षणातून दृष्टीचा प्रत्येक कोन तपासला
तेव्हा लक्षात येऊन जीव खूप सुखावला
जगासाठी लावलेल्या चष्म्यावर थोडा धुरळा होता साठला
धुरळा स्वच्छ केला दृष्टिदोष सुधारला
आता मला दुसर्यांचा दृष्टिकोनही दिसू लागला
सौ.नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment