द किंग
विदिन
प्रकाशक: हार्परकॉलिन्स पब्लिकेशन
पाने : २१६
प्रकाशन : सन २०१७
भाषा : इंग्रजी
ख्रिस्तपूर्व सन ३७३. राजबिंडा आणि धडाडीचा देवा
दर्शिनी नावाच्या एका सुंदर वारांगना व अभिनेत्रीला डाकूंपासून वाचवतो.देवा, दर्शिनी,
वीरसेन आणि कालिदास यांच्यात एक सुंदर मैत्रीचे नाते तयार होते. देवाचे प्रारब्ध असे
आहे की त्याचे नाव पुढील कैक पिढ्यांच्या लक्षात राहील.
कोण आहे हा देवा? काय आहे त्याचे प्रारब्ध? त्यांची
मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरेल का? राजा कोण आहे?
ही कथा गुप्त राजघराण्याच्या काळात घडते. त्यावेळी
समुद्रगुप्त राजाची सत्ता असते. राजाच्या मरणानंतर राजेपदासाठी त्याच्या मुलांमध्ये
रस्सीखेच सुरु होते. नवीन राजाला सुधारणा आणायच्या आहेत. त्याला आपले नाव आपल्या कार्याने
अमर करायचे आहे. तो बाह्यत्वाने राजा झाला पण तो अंतरीचा राजा होईल का?
या पुस्तकातील पात्रे दैदीप्यमान आहेत. काही रंगतदार
आहेत, काही तीव्र आहेत, काही शूर आहेत तर काही शहाणी आहेत. काही यातील अनेक स्वभावांचे मिश्रणही आहेत. रामगुप्त,
राजाचा पहिला मुलगा आणि युवराज आहे. चंद्रगुप्त, देवा राजाचा दुसरा मुलगा आहे आणि तो
आपल्या मोठ्या भावाच्या बायकोच्या प्रेमात आहे. दर्शिनी, देवाच्या प्रेमात पडलेली नगर
नाती आहे. शूरवीर वीरसेन आणि प्रसिद्ध कवी कालिदास हे देवाचे जिवलग मित्र आहेत. ध्रुवसेना,
देवाची प्रेमिका आणि नंतरची राणी आहे. या व्यक्तीवैशिष्ट्यानी नटलेल्या पात्रांमुळे
कथा खुलते.
कथेची रचना चित्तवेधक आहे. मांडणी व विस्तार मनोरंजक
आहे. जवळजवळ तीन चतुर्थांश पुस्तक कथा प्रवाही आहे. त्यानंतर मात्र कथा एकदम संथावते
आणि रंगायला लागते. 'किंग विदिन - अंतरीचा राजा' चा संदर्भ शेवटच्या काही पानांमध्येच
येतो. जर लेखिकेने किंग विदिन हे नाव पुस्तकाला दिले आहे तर त्यावर जास्त भर द्यायला
हवा होता आणि आपला मुद्दा मांडण्यासाठी आणखी काही पाने खर्च केली पाहिजे होती. किंग
विदिन जवळजवळ पश्चातबुद्धी सारखे वाटते. कथा सर्वार्थाने संपत नाही. पुढे काय होते
ते वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडले आहे कारण कथेसाठी ते तितके महत्वाचे नाही.
नंदिनी सेनगुप्ता पत्रकार आहे आणि टाइम्स ऑफ इंडिया
मध्ये काम करते. ही तिची पहिली कादंबरी आहे. तिच्यात यशस्वी लेखिका होण्यासाठी लागणाऱ्या
सर्व गोष्टी आहेत.
मी हे पुस्तक का वाचले : ब्लर्ब्
काय आवडले नाही : किंग विदिन थोडक्यात आटोपला
काय आवडले : कथा, शैली
शिफारस : वेळ असेल तर वाचा
श्री. मंदार आपटे
No comments:
Post a Comment