Sunday, June 11, 2017

clicked by Chinar Patil On Samsung S7


Clicked by Narendra Kulkarni on Samsung A5


Location





This is a sketch by me as a tribute to one of the great marathi/hindi stage and film actress.- Reema Lagoo.

Shrikant Bhat

Photo By: Aniket Kokare
Mobile: Moto G2
Place : Abudhabi Corniche  

CANCER EPIDEMIC

             CANCER
   Cancer is worldwide epidemic and ifwe go with facts, everyday there one person gets diagnosed with some form of  cancer. But it’s not all a lost cause because according to many studies conducted worldwide, there is 1 preventive measure, we can take - DIET.
Diet plays a vital role in the management of cancer because they are the source of important physiological functional components.
     
Here is a list of 10 foods that prevent cancer-                                                                        
Rich in Vitamin E, peanuts reduces the risk of colon, lung, liver,   and other cancers.
Grapefruit
Grapefruits are high in Vitamin C. This element prevents the formation                                of cancer-causing nitrogen compounds.
Berries
Berries top the charts when it comes to cancer fighting foods. Raspberries, blueberries, and cranberries are very promising potential to help prevent cancer.
Sweet potatoes
Sweet potato is full of beta carotene. The consumption of high beta carotene foods reduces the risk of cancers.
Turmeric
Cur cumin, the active ingredient in turmeric, acts as both an anti­ inflammatory and an antioxidant, and prevents cancer by interfering with aspects of cellular signalling.
Tea
Tea contains catechins compounds; these compounds restrict the growth of cancer. Tea reduces risk of lung, prostate, colon and breast cancers.
Tomato
Tomatoes, which contain lycopene, help prevent prostate cancer. Lycopene is a strong antioxidant that may also prevent other types of cancers.
Pomegranates
Pomegranates are rich in ellagic acid. According to a few studies, ellagic acid slows down cancer cell growth and deactivates cancer­ causing compounds.
Onions
Again, a food rich in anti-cancer substances including allicin, onions are a staple in Indian dishes. You can also incorporate it through salads or just eating it raw.
Wild salmon (Fish) ··
Eating foods rich in vitamin D will help in blocking the development of blood vessels that feed growing tumors and help stop the proliferation of cancerous and precancerous cells.
                                                                                                                                                
                                                                  
                                                                 APEKSHA CHOUBEY
                                                                              Dietician

Art by Anshul Darne



Kids Corner

Sir Baniyas Island- सफर अनोख्या दुनियेची

सप्टेंबर 2016 मध्ये 'ईद-अल-अधा' उर्फ 'बकरी ईद'ची सुट्टी यू.ए.ई. मध्ये जाहीर झाली. खाजगी सेक्टरला कधी नव्हे तर सलग तीन दिवस वाटेला आले. अशा अनपेक्षित (तशी अपेक्षितच पण सुट्टीची तयारी नसल्यामुळे अनपेक्षित) सुट्टीचा आनंद कसा लुटावा हा प्रश्न पडू लागला.

खरेतर यू.ए.ई मध्ये सुट्टी म्हटल्यावर नेहमीचीच ठिकाणे डोळयांपुढे येतात, ती म्हणजे फुजेरा, अल-एन वा दुबई. सप्टेंबरच्या लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यामध्ये अशी नेहमीचीच स्थळे सोडून इतरत्र निवांत ठिकाणी कुठे जात येईल याची चाचपणी सुरु झाली आणि हा यक्ष प्रश्न आमच्या 'बेटर हाफ'ने दोन सेकंदातच सोडवला. उत्तर आले "Sir Baniyas Island Desert Resort". एका फोन कॉलवर  Anantara मध्ये रिसर्व्हेशन झाले आणि दहा मिनिटात कन्फरमेशन आलेसुद्धा. मग काय तर तयारी सुरु झाली "Sir Baniyas Island Desert Resort" च्या अनोख्या दुनियेची सफर करण्यासाठी.  

1971 साली शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान ह्या अबुधाबीच्या राजाने Sir Baniyas Island हे nature reserve म्हणून जाहीर केले. अबुधाबीहुन अधिक क्षेत्रफळ असलेल्या ह्या बेटावर आज 13000 पेक्षा जास्त प्राणी, open atmosphere मध्ये मुक्तपणे संचार करत आहेत. आश्चर्य म्हणजे वाळवंटी प्रदेश असूनसुद्धा आंबा, खजूर, सफरचंद, पेरू, लिंबू, कलिंगड,टोमॅटो, काकडी, भोपळी मिरची, दुधी अशा विविध प्रकारच्या  फळ-भाज्यांचे उत्पन्न आज तिथे होत आहे जी एकेकाळी सुरवातीला अशक्यप्राय गोष्ट मानली जात होती. 

Sir Baniyas Island ला जाण्यासाठी Jebbel Dhannaपासून तीस मिनिटांची  बोट सफारी आहे. Jebbel Dhanna हे अबूधाबीपासून अडीच तासांच्या कार ड्राईव्हवर, Ruwais जवळ आहे. पर्यटकांसाठी  Jet Rotanaची हवाई सेवा सुद्धा उपलब्ध आहे.

अशी सगळी माहिती घेत 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात आमची गाडी Ruwaisच्या दिशेने दौडू लागली. वाटेतल्या मनोहारी sand dunesनी तर आमच्या फोटोग्राफी कौशल्याची जणूकाही परीक्षाच घेतली.

Jebbel Dhanna च्या पोर्टला पोहोचल्यावर एअरपोर्टप्रमाणेच इथेही आमच्या luggage ला टॅग लावण्यात आले आणि 'वॉटर-टॅक्सी'मधून सुरु झालेल्या आमच्या 'सेमी-इंटरनॅशनल' प्रवासाला Sir Baniyas Islandच्या  किनाऱ्याची ओढ लागली. Anantara ग्रुपचे हे डेझर्ट रिसॉर्ट किनाऱ्यापासून 20 मि. च्या अंतरावर आत वसलेले आहे. गाडीतून रिसॉर्टला जात असताना रस्त्याच्या कडेला दिसलेला हरणांचा कळप आमच्या आगामी wildlife safariची जणूकाही चुणूकच देऊन गेला.

रिसॉर्टमध्ये स्वागत झाले ते जास्वंदाच्या सुमधुर व थंडगार सरबताने आणि island वरच्या गोड खजुरांनी. सुरवातच अत्यंत सुंदर झाली. रिसॉर्टचा फेरफटका मारण्यात दिवस कलतीला आलेला कळलेच नाही. समुद्रकिनार्यालाच लागून असलेला swimming pool खुणावू लागला होता. विलोभनीय मावळत्या सूर्याचा लालिमा अंगावर घेत निळ्याशार पाण्यात डुंबण्याची मजा खरंच अवर्णनीय!

Dinner ची थिम होती 'अरेबियन नाइट'...wow म्हणजे अजून एक surprise तर.... समुद्र किनाऱ्यावर 'हॉटेल शम्स' द्वारे अरेबियन शामियाने घालण्यात आले होते...आकर्षक सजावट, उत्कृष्ट खानपान अन उत्तम सेवा दिलखुश कर गयी.

भल्या पहाटे सुरु होणाऱ्या wild life safariच्या उत्सुकतेने रात्रीच्या गप्पा रंगल्या अन आम्ही निद्रादेवीच्या अधीन कधी झालो ते कळलेच  नाही.
अलार्म लावून झोपलो खरे पण पहाटेच मोरांच्या आवाजाने जाग आली अन आजच्या अविस्मरणीय दिवसाची नांदी झाली. आमची मास्टर्स केलेली तज्ञ सफारी गाईड मार्गारेट आमच्या स्वागताला हजर होती. उघड्या जीपमधून आमची स्वारी निघाली जंगलाच्या दिशेने. ह्या सफारीमध्ये कुठेच जाळीचा पडदा नव्हता जणूकाही आम्हीसुद्धा प्राण्यामध्ये एक होऊन फिरणार होतो. वा कल्पनाच किती सुरेख आहे.  "जुरासिक पार्क"ह्या चित्रपटातील गेटसारखे सरकते भव्य गेट ओलांडून आम्ही स्वछंदी वन्य जीवांच्या दुनियेत प्रवेश केला. प्रथमतः दर्शन झाले आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचे- आपला विहंगम पिसारा फुलवून आमचे स्वागत करणाऱ्या मोराचे..केकारवाने जागे केले होतेच पहाटे आता दर्शनही मिळाले.धन्य! पुढे जात जात दिसले ते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, हरणे, जिराफ, काळवीट, इमू, सांबरशिंगे, गवे, कोल्हे, रानगाई.
अशीच मजल दरमजल करत असतानाच आमचे लक्ष् गेले ते एक निवांत बसलेल्या चित्त्यापाशी. हा- म्हणजे ही-'सफीरा' तिचं नाव- इतकी  निवांत कशी असा विचार येताच पाहतो तर काय, ह्या अवघ्या नऊ महिन्याच्या 'सफीरा' बेबीने नुकत्याच एका सांबाराची शिकार केले होती अन मेजवानीची मजा घेणे चालू होते. चित्त्याला पाहून हरखलेली माझी 6 वर्षाची मुलगी पावनी आपल्या आईला विचारते,' मम्मा, अगं हे बेबी  तर फक्त नाईन मन्थस चे आहे मग दात तरी आले असतील का त्याला?..( तिचे अजून येतायत ना!)..मुलांचं विश्व किती निरागस असतं नाही!
87sqkm च्या ह्या island वर  केवळ चारच चित्ते आहेत. त्यांचे दर्शन हे फारच दुर्लभ असते.  त्यामुळे आम्ही फारच नशीबवान आहोत- इति आमची ड्राइवर कम टूर गाईड मार्गारेट. केवळ 10 फुटांवरून चित्ता तोही उघड्या जीपमधून बघतानाचा अनुभव अविस्मरणीय होता.

अचानक आमच्या गाईडचे लक्ष गेले ते इवल्याशा बहूरंगी winter bird कडे, ज्याचे islandवरील आगमन हे यू.ए.ई मधल्या हिवाळ्याचे आगमन  सूचित करते.  वाळवंटी प्रदेशामध्ये राहत असताना, सप्टेंबरच्या कडक उन्हामध्ये केवळ ह्या पक्षाचे दिसणे हेच खूप आनंददायी असते ह्याची  अनुभूती आम्हाला आली.
वॉटर स्पोर्ट्स, कयाकिंग, स्नोर्केल्लिंग, आर्चरी, माउंटन बाइकिंग, पर्ल डायविंग, हॉर्स रायडींग, डाऊ क्रूस अशा  विविध प्रकारच्या island activities म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच.
नेहमीच काहीतरी नवीन आणि चांगले शोधण्याची आवड असणाऱ्या आम्हाला Sir Baniyas Island ने खूप साऱ्या रम्य आठवणी दिल्या आणि 'Discover the Best'  ही आपली tag line सार्थ ठरवली. Sir Baniyas Island Desert Resort मधला स्टे आमच्यासाठी नक्कीच एक 'आऊट ऑफ द वर्ल्ड' अनुभव होता.

असा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी हि टूर जरूर करावी...

धन्यवाद !
डॉ. प्रसाद बारटके
prasadpbartake@gmail.com


महाराष्ट्र मंडळ आणि मी

       हो बरोबर. महाराष्ट्र मंडळाची घटना कार्यान्वित होऊन या वर्षी २५ वर्षे होतील. मला अभिमान वाटतो कि या २५ वर्षातल्या सुमारे २३ वर्षात मी मंडळाचा सभासद आहे. खूप खूप छान आणि सुंदर आठवणी देत आलंय मंडळ.
       अगदी सुरवातीला सत्य नारायण पूजा, गणपती, कोजागिरी, वार्षिक सहल, अधून मधून नाटक व समजा दुबईला कोणी कलाकार भारतातून आले तर त्यांचा कार्यक्रम असे स्वरूप असायचे. साधारण ४० कुटुंबे सभासद होती. मंडळाची वाढ व विस्तार खूप छान होत गेला.
       १९९४ मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. त्याचबरोबर रमझान च्या महिन्यामध्ये बैठ्या खेळांच्या स्पर्धा सुरु झाल्या. त्यानंतर मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होऊ लागल्या. त्या वेळची सर्व मुले आता संसाराला लागली. सुरुवातीला लोटस टेबलं वापरली जायची सभासदांची लिस्ट म्हणून. अगदी थोडे सभासद असल्याने निमंत्रणे फोन वर दिली जायची व त्यामुळे सर्वांचे फोन नंबर तोंडपाठ होऊन जायचे. एखाद्या प्रोग्रॅमला कोणी जर आले नाही तर लगेच लक्षात यायचे आणि विचारपूस व्हायची.
हळू हळू सभासदांची संख्या वाढत गेली व ती आज पर्यंत वाढतच राहिली. ई-मेल द्वारा निमंत्रणे सुरु झाली. तरी फोन करणे बंद नव्हते झाले. बहुतेक वेळा कार्यक्रम  झाल्यावर सुद्धा फोन वर अभिप्राय घेतला जायचा. कदाचित त्यामुळे आपुलकी  निर्माण व्हायची.
       खूप कमी जणांकडे कार असायची. कमिटी वर जायला कार असेल तर प्राधान्य असायचे.
फार पूर्वीपासून गजाभाऊ वराडकर गणपतीची आरास करत आले. जुलै व ऑगस्ट महिना त्यांच्याकडे मुक्काम असायचा काही जणांचा. एकाहून एक सरस मखर बनायचे दर वर्षी. बहुतेक वेळा अबू धाबीत नुकतेच आलेल्या जोडप्याला पूजेचा मान दिला जायचा.
       ISC मधे दर वर्षी एक दिवस मंडळाला आजही मिळतो. रिजिनल फोकस डे या नावाखाली १९९५ पासून आपण करत आहोत. छोट्या मोठ्या नाटकापासून ते भव्य ३ तासाच्या प्रोग्रॅम पर्यंत अनेक विषय हाताळले गेले. त्या कार्यक्रमात भाग घेणे ही एक वेगळीच मजा आहे.
       जसजसे नवे सभासद समिती वर येत गेले तसतसे नवीन कल्पना पुढे येऊ लागल्या. यातूनच मग किलबिल, कुकरी स्पर्धा, दांडिया, अंताक्षरी, वगैरे कार्यक्रम सुरु झाले. अधून मधून फोटो कॉम्पेटिशन, आकाश कंदील व रांगोळी स्पर्धा याही घडत गेल्या.
       January १९९८ मधे मासिक सुरु झाले. त्याला पुढे बहर हे नाव देण्यात आले. बहरची संकल्पना सर्व सभासदांनी उचलून धरली. एकंदरीत मराठी भाषिकांसाठी जे जे काही करता येईल ते सर्व मंडळ करत आलंय व करत राहील. मंडळाचा सभासद असल्याचा मला सतत अभिमान आहे व तो दिवसागणिक वाढत जातोय.

                                                                        - नरेंद्र कुलकर्णी.
                                                        narendra.v.kulkarni@gmail.com

Saturday, June 3, 2017

बहर करिता साहित्य पाठविण्याविषयी काही सूचना.
१. सर्व प्रकारचे साहित्य mmadbahar@gmail.com यापत्त्यावर ई-मेलने पाठवावे.
२. साहित्य हे मराठीतच टाईप केलेले असावे.
३. साहित्य ms-word मध्ये किंवा ई-मेलमध्ये पेस्ट करून पाठवावे. PDF अथवा स्कॅन केलेले नसावे.
४. मराठी मध्येटाइपिंग करण्यासाठी http://marathi.indiatyping.com ही लिंक वापरा.
५. साहित्य पाठवताना ई-मेलच्या Subject मध्ये योग्य तो विषय नमूद केलेला असावा.
६. साहित्याच्या तळाला लेखकाचे नाव असावे.
७. साहित्यात अथवा त्यातील मजकूरात किंवा छायाचित्रात कोणत्याही प्रकारच्या अबुधाबी (युएई) च्या धार्मिक, सांस्कृतिक प्रथा/           नियमांचा अनुल्लेख नसावा. काही आक्षेपार्ह आढळल्यास साहित्य प्रसिद्ध केले जाणार नाही.
७. सभासदांनी पाठवलेले साहित्य mmadbahar.blogspot.ae या ब्लॉग वर प्रकाशित करण्यात येईल. व त्यानंतर
सर्व सभासदांना त्याबद्दल इ-मेलद्वारे सूचित करण्यात येईल.
वाचक सभासद त्यांच्या आवडीच्या लेखाला योग्य प्रतिसादही देऊ शकतात.
हे वर्ष महाराष्ट्र मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तेव्हा या वेळचा विषय हा त्यालाच अनुसरून आहे. "मी आणि महाराष्ट्र मंडळ".....चला तर मग ... उचला लेखणी आणि तुमच्यातल्या लेखकाला व्यक्त होऊ द्या.
या व्यतिरिक्त ही इतर लेख, प्रवासवर्णन, कविता, रेसिपी, बालकलाकारांनी रेखाटलेले चित्र यांचे सुद्धा स्वागत आहे.
बहर ब्लॉग मध्ये Mobilography व Achievements या दोन नवीन सदरांचा समावेश करण्याचे ठरवले आहे. तेव्हा ज्यांना आपली छायाचित्रणाची हौस, आवड, गोडी पुरवायची आहे त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काढलेले एखादे सुंदर छायाचित्र नाव व विषय यासहित पाठवून द्यावे. छायाचित्रात नेमके काय दाखवायचे आहे याविषयी १-२ ओळी लिहाव्यात.....
Achievements या सदरात विद्यार्थी/खेळाडू यांना शाळा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मिळालेल्या वेगवेगळ्या पुरस्कारांचा उल्लेख केला जाईल. सभासदांनी/पालकांनी त्याबद्दलची माहिती/छायाचित्र mmadbahar@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. 
साहित्य दि. ५ जून २०१७ पर्यंत वर नमूद केलेल्या ई-मेलवर पाठवावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
सौ. रुपाली कीर्तनी (0506890867)
श्री. अजय पडवळ (0528115209)