सप्टेंबर
2016 मध्ये 'ईद-अल-अधा' उर्फ 'बकरी ईद'ची सुट्टी यू.ए.ई. मध्ये जाहीर झाली. खाजगी सेक्टरला
कधी नव्हे तर सलग तीन दिवस वाटेला आले. अशा अनपेक्षित (तशी अपेक्षितच पण सुट्टीची तयारी
नसल्यामुळे अनपेक्षित) सुट्टीचा आनंद कसा लुटावा हा प्रश्न पडू लागला.
खरेतर
यू.ए.ई मध्ये सुट्टी म्हटल्यावर नेहमीचीच ठिकाणे डोळयांपुढे येतात, ती म्हणजे फुजेरा,
अल-एन वा दुबई. सप्टेंबरच्या लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यामध्ये अशी नेहमीचीच स्थळे
सोडून इतरत्र निवांत ठिकाणी कुठे जात येईल याची चाचपणी सुरु झाली आणि हा यक्ष प्रश्न
आमच्या 'बेटर हाफ'ने दोन सेकंदातच सोडवला. उत्तर आले "Sir Baniyas Island
Desert Resort". एका फोन कॉलवर
Anantara मध्ये रिसर्व्हेशन झाले आणि दहा मिनिटात कन्फरमेशन आलेसुद्धा. मग काय
तर तयारी सुरु झाली "Sir Baniyas Island Desert Resort" च्या अनोख्या दुनियेची
सफर करण्यासाठी.
1971
साली शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान ह्या अबुधाबीच्या राजाने Sir Baniyas Island हे
nature reserve म्हणून जाहीर केले. अबुधाबीहुन अधिक क्षेत्रफळ असलेल्या ह्या बेटावर
आज 13000 पेक्षा जास्त प्राणी, open atmosphere मध्ये मुक्तपणे संचार करत आहेत. आश्चर्य
म्हणजे वाळवंटी प्रदेश असूनसुद्धा आंबा, खजूर, सफरचंद, पेरू, लिंबू, कलिंगड,टोमॅटो,
काकडी, भोपळी मिरची, दुधी अशा विविध प्रकारच्या
फळ-भाज्यांचे उत्पन्न आज तिथे होत आहे जी एकेकाळी सुरवातीला अशक्यप्राय गोष्ट
मानली जात होती.
Sir
Baniyas Island ला जाण्यासाठी Jebbel Dhannaपासून तीस मिनिटांची बोट सफारी आहे. Jebbel Dhanna हे अबूधाबीपासून अडीच
तासांच्या कार ड्राईव्हवर, Ruwais जवळ आहे. पर्यटकांसाठी Jet Rotanaची हवाई सेवा सुद्धा उपलब्ध आहे.
अशी
सगळी माहिती घेत 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात आमची गाडी Ruwaisच्या दिशेने दौडू
लागली. वाटेतल्या मनोहारी sand dunesनी तर आमच्या फोटोग्राफी कौशल्याची जणूकाही परीक्षाच
घेतली.
Jebbel
Dhanna च्या पोर्टला पोहोचल्यावर एअरपोर्टप्रमाणेच इथेही आमच्या luggage ला टॅग लावण्यात
आले आणि 'वॉटर-टॅक्सी'मधून सुरु झालेल्या आमच्या 'सेमी-इंटरनॅशनल' प्रवासाला Sir
Baniyas Islandच्या किनाऱ्याची ओढ लागली.
Anantara ग्रुपचे हे डेझर्ट रिसॉर्ट किनाऱ्यापासून 20 मि. च्या अंतरावर आत वसलेले आहे.
गाडीतून रिसॉर्टला जात असताना रस्त्याच्या कडेला दिसलेला हरणांचा कळप आमच्या आगामी
wildlife safariची जणूकाही चुणूकच देऊन गेला.
रिसॉर्टमध्ये
स्वागत झाले ते जास्वंदाच्या सुमधुर व थंडगार सरबताने आणि island वरच्या गोड खजुरांनी.
सुरवातच अत्यंत सुंदर झाली. रिसॉर्टचा फेरफटका मारण्यात दिवस कलतीला आलेला कळलेच नाही.
समुद्रकिनार्यालाच लागून असलेला swimming pool खुणावू लागला होता. विलोभनीय मावळत्या
सूर्याचा लालिमा अंगावर घेत निळ्याशार पाण्यात डुंबण्याची मजा खरंच अवर्णनीय!
Dinner
ची थिम होती 'अरेबियन नाइट'...wow म्हणजे अजून एक surprise तर.... समुद्र किनाऱ्यावर
'हॉटेल शम्स' द्वारे अरेबियन शामियाने घालण्यात आले होते...आकर्षक सजावट, उत्कृष्ट
खानपान अन उत्तम सेवा दिलखुश कर गयी.
भल्या
पहाटे सुरु होणाऱ्या wild life safariच्या उत्सुकतेने रात्रीच्या गप्पा रंगल्या अन
आम्ही निद्रादेवीच्या अधीन कधी झालो ते कळलेच
नाही.
अलार्म लावून झोपलो खरे पण पहाटेच मोरांच्या आवाजाने जाग आली अन
आजच्या अविस्मरणीय दिवसाची नांदी झाली. आमची मास्टर्स केलेली तज्ञ सफारी गाईड मार्गारेट
आमच्या स्वागताला हजर होती. उघड्या जीपमधून आमची स्वारी निघाली जंगलाच्या दिशेने. ह्या
सफारीमध्ये कुठेच जाळीचा पडदा नव्हता जणूकाही आम्हीसुद्धा प्राण्यामध्ये एक होऊन फिरणार
होतो. वा कल्पनाच किती सुरेख आहे. "जुरासिक
पार्क"ह्या चित्रपटातील गेटसारखे सरकते भव्य गेट ओलांडून आम्ही स्वछंदी वन्य जीवांच्या
दुनियेत प्रवेश केला. प्रथमतः दर्शन झाले आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचे- आपला विहंगम
पिसारा फुलवून आमचे स्वागत करणाऱ्या मोराचे..केकारवाने जागे केले होतेच पहाटे आता दर्शनही
मिळाले.धन्य! पुढे जात जात दिसले ते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, हरणे, जिराफ, काळवीट,
इमू, सांबरशिंगे, गवे, कोल्हे, रानगाई.
अशीच मजल दरमजल करत असतानाच आमचे लक्ष् गेले ते एक निवांत बसलेल्या
चित्त्यापाशी. हा- म्हणजे ही-'सफीरा' तिचं नाव- इतकी निवांत कशी असा विचार येताच पाहतो तर काय, ह्या
अवघ्या नऊ महिन्याच्या 'सफीरा' बेबीने नुकत्याच एका सांबाराची शिकार केले होती अन मेजवानीची
मजा घेणे चालू होते. चित्त्याला पाहून हरखलेली माझी 6 वर्षाची मुलगी पावनी आपल्या आईला
विचारते,' मम्मा, अगं हे बेबी तर फक्त नाईन
मन्थस चे आहे मग दात तरी आले असतील का त्याला?..( तिचे अजून येतायत ना!)..मुलांचं विश्व
किती निरागस असतं नाही!
87sqkm च्या ह्या island वर
केवळ चारच चित्ते आहेत. त्यांचे दर्शन हे फारच दुर्लभ असते. त्यामुळे आम्ही फारच नशीबवान आहोत- इति आमची ड्राइवर
कम टूर गाईड मार्गारेट. केवळ 10 फुटांवरून चित्ता तोही उघड्या जीपमधून बघतानाचा अनुभव
अविस्मरणीय होता.
अचानक आमच्या गाईडचे लक्ष गेले ते इवल्याशा बहूरंगी winter bird
कडे, ज्याचे islandवरील आगमन हे यू.ए.ई मधल्या हिवाळ्याचे आगमन सूचित करते.
वाळवंटी प्रदेशामध्ये राहत असताना, सप्टेंबरच्या कडक उन्हामध्ये केवळ ह्या पक्षाचे
दिसणे हेच खूप आनंददायी असते ह्याची अनुभूती
आम्हाला आली.
वॉटर स्पोर्ट्स, कयाकिंग, स्नोर्केल्लिंग, आर्चरी, माउंटन बाइकिंग,
पर्ल डायविंग, हॉर्स रायडींग, डाऊ क्रूस अशा
विविध प्रकारच्या island activities म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच.
नेहमीच काहीतरी नवीन आणि चांगले शोधण्याची आवड असणाऱ्या आम्हाला
Sir Baniyas Island ने खूप साऱ्या रम्य आठवणी दिल्या आणि 'Discover the Best' ही आपली tag line सार्थ ठरवली. Sir Baniyas
Island Desert Resort मधला स्टे आमच्यासाठी नक्कीच एक 'आऊट ऑफ द वर्ल्ड' अनुभव होता.
असा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी हि टूर जरूर
करावी...
धन्यवाद !
डॉ. प्रसाद बारटके
prasadpbartake@gmail.com
No comments:
Post a Comment