Saturday, April 28, 2018

मराठी शाळा

मातृभूमी पासून दूर राहून मातृभूमीशी नाळ जोडण्याचे काम आम्ही मराठी शाळे मार्फत करतो. खर तर मराठी शाळेची स्थापना 2016 साली झाली, सुरुवातीला फक्त 4 मुले घेऊन सुरुवात केली , काही कारणाने मध्यंतरीच्या काळात खंड पडला होता, पण मागच्या वर्षानंतर शाळेने पुन्हा जोर धरला आणि आता ती नियमितपणे सुरू आहे. आत्ता सध्या 4 वरून 9 मुलांची संख्या झाली आहे. आजही आम्हाला तो दिवस आठवतो जेंव्हा शाळेचा पहिला दिवस होता, मुलांना मातृभाषे बद्दल तशी काहीच माहिती नव्हती त्यामुळे आमच्या समोर एक आवाहन होते. याच कारणासाठी आम्ही मुलांचे त्यांच्या वयोमानानुसार गट केले. बाल गट, छोटा गट, मोठा गट असे तीन गट केल्यामुळे प्रत्येक मुलाला शिकवण्यास आम्हाला सोप्पे जाते. आज जेंव्हा एक वर्षानंतर जेंव्हा आमची मुले स्वतःचे पूर्ण नाव मराठीतून लिहू शकतात, स्वतःची आओळ्ख मराठीतून लिहितात, मराठीतून "माझी आई" हा निबंध लिहितात, तेंव्हा आम्हाला काय आनंद होतो ते आम्हालाच ठाऊक. आम्ही सुरू केलेल्या प्रयत्नांना किमान थोडे तरी यश प्राप्त झाल्याचे समाधान मिळतेमी शीतल अंबुरे, पिनल चौधरी, नम्रता देव, आणि अनुजा पडवळ आमचे हे प्रयत्न असेच सुरू राहणार आहेत.

                                                                                                                         
                                                                                           शीतल अंबुरे

No comments:

Post a Comment