Sunday, March 31, 2019

शेवटची घंटा


आपण सगळेच रोज शाळेत येतो. रोज तेच विषय, तेच टीचर्स.
पण मजा असते, धम्माल असते रोजची कारण सगळे मित्र मैत्रिणी भेटतात.
मला शाळा खूप आवडते. कारण अभ्यास असतो, खेळ असतात, ड्रॉईंग पेंटिंग असते.
एका दिवसात किती विषय शिकवतात.
आपल्या सगळ्या मुलांचे आणि पालकांचे प्रत्येकाचे दिवसाचे टाइम टेबल असते.
घरी अलार्म असतो यासाठी की उठा, कामे सुरु करा. तसंच शाळेत " घंटा" असते.
शाळा सुरु झाली, एक पिरियड संपला, मधली सुट्टी आणि शाळा सुटली हे सगळं सांगण्यासाठी.
मी लहान होते तेव्हा घरातूनच बघायचे ही गडबड शाळेत येण्याची आणि जाण्याची पण.
आता शाळेत येते, दिवसभर आपण एकत्र असतो पण संध्याकाळी आपण सगळे वाट बघत असतो घरी
जाण्याची. माझं घर खूप जवळ आहे, बाकी मैत्रिणीचं घर लांब आहे त्यांना खूप वेळ लागतो, म्हणून आम्ही
सगळे " शेवटची घंटा" होण्यासाठी खिडकी बाहेर बघतो.
शाळेत येताना खुश असतोच पण घरी जाताना जास्त आनंदी होतो, कारण आई- बाबा, आजी आजोबा
भेटणार असतात ना?
आई नी काही तरी खाऊ केलेला असतो माझ्या साठी,  मला गाणं आठवत जस "शाळा सुटली पाटी
फुटली आई मला भूक लागली "
शहरांत तर दिवस आणि रात्र घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करावी लागतात. तसे आपण सगळे आजची
शाळा संपली तरी उद्या परत " पहिली घंटा " होताना शाळेत येणार असतो आणि " शेवटची घंटा" झाली
की घरी परत.













मनोज करंदीकर.

No comments:

Post a Comment