Sunday, March 31, 2019

आई -माझा आदर्श



तुझाच अंश मी 
तुझाच वंश मी 
अस्तित्व माझे तुझ्यामुळे 
तुझ्यामुळेच आज मी 
मातीच्या गोळ्यास एका 
तू दिलेला आकार मी 
घडविलेस व्यक्तित्व माझे 
तुझेच सर्व संस्कार मी 
आयुष्याची मार्गदर्शक तू 
चालणारी पांथस्थ मी
नाहीस जरी आहेस तू 
कायम आश्वस्त मी 
फेडू कसे ऋण तुझे 
माझ्यासवे नेईन मी 
फेडण्यास ते पुढील जन्मी 
तुझीच लेक होईन मी













सौ.नम्रता नितीन देव

No comments:

Post a Comment