Friday, December 22, 2017

Congratulations Vaishnavi Soman


Miss Vaishnavi Soman has got First price in UAE Inter school Hindi Advertisement Competition 


आज वेळ नाही ... मंजिरी जोशी

सुख आहे सगळ्यांच्याच पदरात,
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही......
आईच्या अंगाईची जाणीव आहे,
पण आईला आज
"आई" म्हणायला वेळ नाही...
सगळी नाती संपवून झालीत,
पण त्या नात्यांना
पुरायलाही आज वेळ नाही...
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये सेव्ह आहेत,
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही...
ज्या पोराबाळांसाठी मेहनत दिवसरात्र करतात
त्यांच्या कडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही..
सांगेल कोण कशाला दुसऱ्याबद्दल,
जेव्हा इथे स्वतःकडेच
बघायलाही वेळ नाही...
डोळ्यावर आलीय खूप झोप,
पण आज कोणाकडे
झोपायलाही वेळ नाही..
हृदयात वेदनांचा पूर वाहतोय,
पणते आठवून
रडायलाही आज वेळ नाही..
परक्यांची जाणीव कशी असेल?
जर इथे आपल्याच माणसांसाठी आज वेळ नाही...
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या,
या संघर्षात जरा मागे वळून,
पाहायलाही आज वेळ नाही...
अरे जीवना तूच सांग,
जगण्यासाठी चाललेल्या या धावपळीत
जागायलाही आज वेळ का नाही????


मंजिरी जोशी

नजर... सौ.नम्रता नितीन देव

नजर
 अचानक जग थोडा धूसर वाटू लागला
डोळ्यापुढे काहीतरी उगीचच दाटू लागला
ऐकलं होता नजर नेहेमी शोधक असावी
पण अगदीच स्वतःच्याच नजरेला शोधणारी नसावी
विचार आला जगाचा किंवा आपला दृष्टिकोन नसेल ना बदलला?
आत्मपरीक्षणातून दृष्टीचा प्रत्येक कोन तपासला
तेव्हा लक्षात येऊन जीव खूप सुखावला
जगासाठी लावलेल्या चष्म्यावर थोडा धुरळा होता साठला
धुरळा स्वच्छ केला दृष्टिदोष सुधारला
आता मला दुसर्यांचा दृष्टिकोनही दिसू लागला


  सौ.नम्रता नितीन देव

Clicked By Anagha Lonikar


1.                                                                                                       Anagha Lonikar
                                                Location...Maryah island Abudhabi
                                                Mobile.... IPhone 7S

पुस्तक परिक्षण : श्री. मंदार आपटे- बारामुल्ला बॉम्बर

baaramaullaa baa^mbar
laoKk: @laak- p`saad
p`kaSak: inayaaogaI bau@sa
panao: 315
p`kaSana : sana\ 2013
BaaYaa : [Mga`jaI
jagaacaI Ka~I pTlaI Aaho kI paikstana AaiNa caInanao Saa@sagaama vh^laI maQyao eka Bayaanak va gauPt As~acaI caacaNaI kolaI Aaho. yaa As~acaa s~aot vaodaMmaQyao AaiNa baayabala maQyao Aaho. pNa daonhI doSaaMnaI kanaavar hat zovalao.Baart‚ isvaDna‚ paikstana AaiNa caIna yaa savaa-Mnaa mansaUr hOdr yaa kiSmarI ik`koTpTUmaQyao svaarsya Aaho. mansaUrcaI Kasa maOi~Na Aaho Aahanaa yajauvao-dI.
Saa@sagaama vh^laImaQyao na@kI kaya JaalaMÆ ho As~ na@kI kaya AahoÆ vaodaMmaQyao kaya rhsya dDlaMyaÆmansaUrlaa [tkMmah%va ka AahoÆ “laIga Aa^f gaaiD-yansa” ha kaya p`kar AahoÆ baaramaullaa baa^mbar kaoNa AahoÆ
kqaa p`vaahI Aaho. kqaodrmyaana ba¹yaaca gaaoYTIMcyaa maagacaa Aqa- samajat naahI pNa bahutok sava- gaaoYTIMcaa pustk saMpopya-Mt ]lagaDa haotao.saMsxaNa maM~I ksao maR%yaumauKI pDlaoÆ ha AaiNa Asao kahI p`Sna maa~ Anau<arIt rhatat. kdaicat yaa p`SnaaMcaI ]kla yaa pustk maailakocyaa puZIla Baagaat Asaola. kqaocaI maaMDNaI va kqaaivastar ]<ama Aaho. kqaocaI pirsaImaa javaLjavaL ]<amaAaho. pNa kqaocaa SaovaT AgadIca gauLmauLIt Aaho. kqaocaa AalaoK caZt jaatao %yaamauLo vaacakaMcaI Apoxaa Asato kI AaNaKI kahI trI raomaaMcakarI hao[-la‚ pNa SaovaT AgadI saamaanya haotao.
Paa~rcanaa KUp Cana Aaho.ik`koTpT UmansaUr‚ %yaacyaa hOdrkuTuMbaamaQyao ek gauipt dDlaMya pNa to Aaplyaalaa itsa¹yaa pustkat samajaNaarAaho. Aahanaa yajauvao-dI‚ sauMdr‚ huSaar‚ QaaDsaI‚ igayaa-raohk‚ p^raT/Upr AaiNa Aaplyaa naaokrI maQyao savaa-Mcaa AadSa- ASaI yauvatI. qaaoD@yaat tI sava-gauNasaMpnna Aaho. Agas%ya razaoD ³kaya Baardst naava Aaho´‚ Baartacao gaRhmaM~I AaiNa ksalaola orajakarNaI. yaaMcao Kanadana KUp p`aicana Aaho. A^Da^lf‚ isvaDISa gauPtcar AiQakarI. samaIr‚ yaacaI KrI inaYza kuzo Aaho to javaLjavaL kadMbarI saMpopya-Mt samajatca naahI. kirnaa‚ isvaDISa gauPtcarKa%yaacaI p`mauK AaiNa Agas%ya razaoDcaI vaga-maO~INa. yaaMcyaa saaqaIlaa AaNaKI pNa kahI pa~o Aahot.
P`a%yaok p`krNaapuvaI- kqaocaa tao Baaga jagaacyaa jyaa Baagaat GaDtao tI jaagaa jagaacyaa nakaSaavar fulaI maarUna daKvalaI Aaho. kaya klpktaÆ saja-naSaIlatocaa ]<amanamaunaa.
ra^baT- Aaopnaho[-marcao ANauivasfaoTanaMtrcao Sabd Anaok kadMba¹yaaMcao sfuillaMga banalao Aahot. %yaa SabdaMnaI laoKkaMcyaa klpnaaSa@tIlaa caalanaa imaLalaI. hI kadMbarI doiKla yaaca EaoNaIt yaoto.
Paustkacyaa naavaavarUna AaiNa mauKpRYzavarUna eKaValaa Asao vaaTola kI hI kqaa kiSmarmaQaIla dhSatvaadasaMbaMQaI Asaola. pNa tsaM naahIe. jarI kiSmar p`SnaacaI paSva-BaUmaI AsalaI trI tao yaa kqaocaa Baaga naahI. tumhalaa ek gauipt saaMgau kaÆ baaramaullaa baa^mbarcaa AaiNa Aa%maGaatI hllyaaMcaa kahIhI saMbaMQa naahI.  Paustkacao mauKpRYz ivalaaoBanaIya Aaho.
@laak- p`saad ho saUrja p`saadca osaaih%yaIk naava Aaho. yaa Ap`isad\Qa va AnaamaIk laoKkanao djao-dar kadMbarI ilaihlaI Aaho. %yaacaI svat:caI ASaI laoKnaSaOlaI Aaho. hI tIna pustkaMcaI mailaka Aaho AaiNa dusaro pustk lavakrca p`kaiSat haoNaar Aaho.
maI ho pustk ka vaacalaoÆ    blaba- AaiNa mauKpRYz.
kaya AavaaDla onaahIÆ      SaovaT.
kayaAavaDlaoÆ            kqaa.
iSafarsa                ]<ama pdap-Na. jarRUrvaacaa.

maMdar AapTo

Clicked By Neha Vaidya


1                                                                                  Clicked By Neha Vaidya
                                     Iphone 7 plus
                                     Valley of Flowers Trek.

Sunday, November 12, 2017

हर दिल धडक ने दो भाग-२ सचिन सबनीस

यशस्वी Planning किंवा  नियोजन हे कुठल्याही process चा पाया असते. आम्ही जेंव्हा याबाबत नियोजन सुरु केल तेंव्हा आम्हाला समजले कि Cruise iteniraray म्हणजे क्रुझ चे वेळापत्रक अगदी काटेकोर आणि त्यात मुख्यत्वे भर internatinally असलेल्या सुट्यांच्या व त्यानुसंगाने cruise ज्या भागात फिरणार आहे त्यातील हवामानाचा विचार करून तयार केलेले असते.
जून जुलै मध्ये युरोप व मध्य पुर्वेतील खास करून उत्तर्भागातील हवामान सुखद असते व सुट्ट्या असतात, म्हणून युरोप मधील mediteranian cruize च्या विविध वेळापत्रकानुसार भरपूर पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे १ का cruise कंपनी च्या वेगवेगळ्या वेळांच्या पर्यायाच्या voyage तुम्हाला हवे त्या महिन्या मध्ये शोधण्यासाठी जर google केले तर अक्षरशः २० ते २५ genuine पर्याय मिळू शकतात. अशा जवळपास ९-१० कंपन्यांचे मिळून जवळपास २५० पर्याय उपलब्ध असतात.
काही खास cruise Voyage च्या dedicated sites वर समुद्री व जगप्रसिध्द नद्यांमधून फिरणाऱ्या Cruises चे भरपूर पर्याय व offers मिळतात. उदा. पूर्ण जग प्रदिक्षणेपासून १२१ दिवसांच्या  ते ५-७ दिवसांच्या पर्यायामधून निवड करता येऊ शकते. यामध्ये www.cruisecritic.com किंवा त्यासम पुष्कळ sites मिळतात व तुम्हाला पाहिजे त्या मौसमा मध्ये व खिशाला परवडेल अश्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे सफरींची निवड होऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला सुट्ट्या हवामान आणि त्या देशात लागणारा Visa प्रोसेसिंग Time ई. ची सांगड घालून नियोजन करावे लागते.
अर्थात तुम्ही तुमच्या आर्थिक व उपलब्ध प्रवासी उद्देश्यानुसार त्या क्रुझेस निवडू शकता. वानगीदाखल सांगायचे झाल्यास अमेरिकन (बहामा) किंवा अति पुर्वेतील (सिंगापोर-मलेशिया) देशांच्या सफरींमध्ये भारतातील प्रख्यात प्रवासी कंपन्या त्यांचे प्रोग्राम क्रुझ itenirary ला जोडून आखतात. अशा प्रकारच्या  सफरींमध्ये तुम्हाला बहामा (३-४ रात्रीचे) किंवा अलास्कन (७ ते ८ रात्रींचे), पनामा (१-२), पेनांग(२-३) असे criuse Voyage करता येऊ शकते. हे Voyage Destination या प्रकारात मोडते.
या व्यतिरिक्त नुसते Cruise शिप वर सुट्टी घालवण्यासाठी अशा काही खास Cruise वरील समुद्री सफरी असतात त्यामध्ये Mediteranian, Carrabian, Norvagian, Antartic, Artict, Trans Atlantic, Trans pacific असे कित्येक नुसते Cruise Voyages करताच म्हणून आखलेले routes आहेत. हे सगळे Luxury Voyage या प्रकारातील असतात. म्हणून ज्या ठिकाणी मोठी शिप लागू शकेल त्या ports लाच खास cruise berths तयार केलेले असतात. ते बहुतकरून नैसर्गिक आणि आधुनिक बंदर (पोर्ट) आणि त्या सलंग्न शहरांना सामावूनच आखलेले असतात. शिप त्या पोर्ट ला लागली कि दिवसा तेथील आजूबाजूचा परिसरातील पर्यटनाचा आस्वाद घेता येतो. याला shore excursion असे संबोधले जाते. सगळ्या cruises रात्रीचा प्रवास करतात, जेणेकरून तुम्हाला पुढचा दिवशी किमान ५/६ तास तरी shore excursion साठी उपलब्ध राहतात.
मी मागील प्रकरणामध्ये सुचवल्यानुसार भारतातून बुकिंग केलेल्या cruise voyage नेहेमीच स्वस्त पडतात, त्याचे कारण त्यांना भारतातून उत्सुकांचा व हौशी मंडळींचा जो एक मोठा वर्ग आहे त्यांना या प्रकारासाठी promote करायच असते. म्हणून भारता मधून promotional offers चांगल्या मिळतात. म्हणजे सप्टेंबर, ते ऑक्टोबर मध्ये गणपती , दुर्गापूजा अशा १ का आठवड्याच्या सुट्ट्या मिळू शकतात. पण जगामध्ये इतरत्र या दरम्यान शाळा सुरु झ्लेलेया असल्या मुळे त्यांची मागणी कमी असते. त्यामुळे ज्या मंडळींना हा मौसम सोयीचा असेल त्यांना offers ३५० $ ते ६०० $ प्रती माणशी (साधारण ७ एक दिवसांकरता) पासून उपलब्ध होऊ शकतात. उदा. सध्या सुरू असलेली MSC ची ऑफर खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे आहे त्याचा लाभ ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर घेणे.(यात माझा कोणताही आर्थिक हेतू नाही हे नम्रपणे नमूद करतो.)
अर्थात या कंपनी च्या cruise ने आम्ही गेल्या वर्षी प्रवास केला होता म्हणून सांगू शकतो कि या ऑफर मध्ये साधारणपणे  ५ रात्रीन्चे जेवण, सकाळचा ब्रेकफास्ट , व २२ तास ओपन असलेले काही खास Dining Venus मधील जेवण समाविष्ट असते, पण सुरवातीच्या पोर्ट ला जाण्याचा विमान खर्च , Visa, शिप वरील पाणी, Drinks, shore excursions, कॅसिनो ई. चा खर्च समाविष्ट नसतो.(Disclaimer: offers पडताळून खात्री करावी).

shore excursions नेट वरून माफक दरात आणि आपल्या खिशां नुसार घेता येतात.
यात बाल्कनी कॅबीनस म्हणजे साधारणपणे अशा जागी मिळू शकतात.
बाल्कनी कॅबीन मध्ये १ डबल बेड आणि १ सोफा कम डबल बेड attached bath असते.आपल्या कौटुंबिक गर्जे नुसार आपण १-२ कॅबिन घेऊ शकता.
तर मंडळी, उघडा तुमचे कॅलेंडर, करा जरुरी तजवीज आणि सुरु करा तुमच्या अनोख्या सुट्टी ची तयारी!  तुम्ही जर आर्थिक आणि सुट्ट्यांच्या गणितात पुढे गेला असाल तर मग काहीच कठीण नाही ...

cruize ची वैशिष्ट्ये पुढील प्रकरणामध्ये विस्तृत पणे पाहूया ....... (क्रमशः)

सचिन सबनीस

Recipe By Dr. Gauri Kulkarni

LASOONI PALAK PANEER ROLLS
It’s not seldom that we have faced a dilemma in choosing the right food to curb those hunger pangs in-between meals or while on the go. While a wholesome meal might leave you bloated, quick bites are often loaded with calories and unhealthy ingredients. Additionally there are so few options for the pure vegetarians here – veg sandwiches, falafel sandwich, vada pav to name a few – but again there’s maidaL
 So presenting here a dish that’s yummy, filling and powered packed with healthy ingredients like:
WHEATgood source of carbohydrates, vitamin E, B complex and fiber
PALAKrich in iron, calcium, vitamins, minerals, fiber
PANEER rich in calcium and proteins
BROCOLLIrich in vitamins, iron, magnesium, proteins and omega3 fatty acids
BELL PEPPERrich in vitamin C
CAPSICUMrich in calcium and iron

This homemade recipe offers a delicious substitute to those outside snacks and is a healthy alternative for brunches, lunch boxes or quick bites while on picnics/short journeys.

INGREDIENTS FOR SERVING AROUND 3-4 PEOPLE:
For the juicy filling:
Ø  Paneer (Cottage Cheese) (200 gms)- thawed to room temperature/fresh if available
Ø  Sweetcorn kernel (100 gms) – defrosted and boiled
Ø  Onion (2-3) medium sizes – finely chopped
Ø  Tomato (3-4) medium sizes– finely chopped
Ø  Broccoli (100 gms) – blanched and cut to small pieces
Ø  Capsicum (1-2) – may include Red/Yellow Bell Pepper – thin sliced pieces
Ø  Oil (2 tsp.)
Ø  Mustard seeds
Ø  Green chillies (2-3), garlic (4-5 cloves),  coriander (handful) – finely chopped
Ø  Red chilly powder, goda masala & kitchen king masala (1/2 – 1 tsp. each)
Ø  Pinch of Oregano and Salt to taste
Ø  Butter (3-4 tsp.)
For the crispy wrap:
Ø  Wheat Atta (4-5 tbsp.), oil (2 tsp.), ginger (half an inch), garlic (4-5 cloves),chilly (2-3), cumin seeds
Ø  Palak (Spinach) (300 gms)– washed, blanched and grinded to a puree
For the healthy dressing:
Ø  Hand cut lettuce, capsicum/bell pepper and olives
START WITH:
·         Heat the oil in a shallow pan or kadai.
·         Add mustard seeds, green chillies and the finely chopped onions.
·         Sauté it for 2-3 minutes till the onion turns pinkish in colour. Add oregano and salt to taste.
·         Add finely chopped tomatoes and a bit of butter and sauté it till the tomatoes are semi-cooked
·         Add crumbled paneer, capsicum, broccoli and the finely chopped coriander and sauté further
·         Add a bowl of pre-boiled sweetcorn, the masala powders and salt to taste. Mix the contents well.
·         Cover with a lid and keep on low heat till it’s finally cooked
·         Turn off the heat and let the mixture settle and cool to room temperature.
Note: Paneer should be at room temperature to be melting in mouth and have a correct homogeneity.
WRAP WITH:
·         Grind a handful of spinach with green chillies, ginger and garlic in a mixer.
·         Add the above paste to the wheat flour while preparing the dough as similar for chapattis (poli)
·         Add a pinch of salt and cumin seeds while preparing the dough. Cover it and allow it to settle.
·         Make small round balls to prepare medium sized circular tava parathas with the dough.
Note: To make the parathas crispier, roast it on both sides with a bit of ghee or butter.
 SERVE WITH:
·         Prepare a bed of fresh hand cut lettuce as a base on the serving dish
·         Add some  capsicum and cut olives to make the dressing healthier and visually appealing
·         Apply some lasoon coconut  chutney to one side of the paratha & place adequate stuffing to it
·         Wrap it to a roll * (you may substitute the paratha with buttered grilled bread to make a sandwich)
·         Cut it in 2-3 pieces and place it on the salad dressing
·         Serve hot and fresh with green coriander coconut chutney and/or tomato ketchup

ROLLS ARE READY TO EAT!!!


J J J  HOPE YOU ENJOYED THE DISH…WISH YOU A HEALTHY DAY AHEAD  J J J

Click By Satish Kadale on iPhone 7 Plus


Clicked By : Mr. Satish Kadale 
Equipment : iPhone 7 Plus

Sketch By Shrikant Bhat


Sketch By Anushka Lonikar


Tuesday, September 12, 2017

पुस्तक परिक्षण : श्री. मंदार आपटे- उत्तररंग

उत्तररंग  
लेखक : नारायण धारप
प्रकाशक : समन्वय प्रकाशन
पाने  : २३२  
प्रकाशन  : आवृत्ती सन २०१२
भाषा  : मराठी
विमल अत्रे ही सुंदर, आकर्षक पन्नाशीतली विधवा असते. तारुण्यात वैधव्य आल्यावर तिने आपल्या मुलांना मोठे केले आणि मार्गी लावले. जाण्यापूर्वी अत्रे साहेबांनी पैशाची तरतूद करून ठेवलेली असल्याने पुनर्विवाह करून आपले स्वातंत्र्य घालवायची तिची तयारी नव्हती. ती कधी त्या फंदात पडलीच नाही. मुले आपापल्या संसारात रममाण आहेत, विमलचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. आपल्या घरात विमल एकटी राहते. कर्मधर्मसंयोगाने एक दिवशी नाट्यगृहात तिची गाठ संजय उपाध्येंशी (नाना) पडते.
त्यांची भेट नाटकाबरोबर संपेल का? ती सुखी आहे का? त्यांच्या घराचे लोक त्यांच्या मैत्रीकडे कसे पहातील? त्यांना मान्यता मिळेल का? 
विमल एकटी राहते. तिच्या दोन्ही मुलांची लागणे झाली आहेत आणि दोघे त्याच शहरात राहतात. ते वेळोवेळी आईची मदत घेतात किंबहुना ती गृहीतच धरतात. पण वरचेवर आईला फोन करावा, आईला भेटावे, तिला आराम करायला म्हणून बोलवावे असे काही त्यांना वाटत नाही. नानांनी काही वर्षांपूर्वी, त्यांच्या सुनेच्या वागण्यामुळे, आपल्या मोठ्या मुलाला वेगळे बिऱ्हाड थाटायला सांगितले होते. मधून अधून नाना त्यांना भेटायला जातात, पण ते येत नाहीत. त्याचा धाकटा मुलगा उत्तरभारतात नोकरीला असतो.
दोघे एकटे आहेत, दोघांची आर्थिक स्थिती चांगली आहे. दोघे सुस्वरूप आहेत. दोघांनी स्वतःला कसल्यातरी व्यापात गुंतवले आहे. पण तरीही त्यांच्या आयुष्यात एकटेपण आहे, एक पोकळी आहे. सहचार्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली आहे. पाहता पाहता ठिणगी प्रज्वलित व्हायला वेळ लागत नाही आणि ते एका निर्णयाप्रत येऊन पोहोचतात, मुलांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगण्याच्या क्रांतिकारी निर्णयाप्रत.
ही सुखवस्तू कुटुंबातील लोकांची गोष्ट आहे, त्यांना पैशाची चणचण नाही. ही कथा उतारवयातील एकटेपणा हा विषय हाताळते. एकटेपणात जेव्हा पर्याय निर्माण होतो तेव्हा तो मार्ग चोखाळला जातो. यातून पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो परंतु संघर्ष हा या कथेचा विषय नाही तो परिणाम आहे. लेखकाने कथा अतिशय सुबकतेने मांडली आहे. कथा प्रशंसा, आवड, मागणी, प्रेम, मुलांचा विरोध, लग्न, विरोध मावळणे आणि शेवटी विनाशर्त मान्यता हे सर्व टप्पे पार करत पैलतीरास पोहोचते. एखाद्याला ब्रूस टकमनच्या मॉडेलची आठवण झाली तर आश्चर्य वाटायला नको. सगळे काही छान छान वाटू नये म्हणून लेखक एक खलनायिका आणतो. पण तिला थोडासाच वाव मिळतो आणि तिचा कथेतील कार्यभाग संपतो. तिला अजून ठेवले असते तर आणखी नाट्य निर्माण झाले असते.
ती एक व्यक्तिरेखा सोडली तर या कथेतील सर्वजण मूलतः चांगले आहेत. काहीजण म्हाताऱ्यांच्या लग्नाच्या धास्तीने वाईट वागतात पण अंततः परत आपल्या चांगुलपणाकडे वळतात. हे एक कुटुंबनाट्य आहे. यात फार तणाव नाही, अति भावनाक्षोभ नाही, फार थरार नाही, अति रोमांच नाही व मारामारी किंवा लढाई देखील नाही पण तरीही हे पुस्तक आल्हाददायी आहे.
ही कथा आपल्याला विमल आणि नाना भेटतात त्या दिवसापासून ते त्यांची कुटुंबे खऱ्या अर्थाने एक होतात त्या दिवसापर्यंतच्या प्रवासाला घेऊन जाते. कथा जरी वेगवान नसली तरी ती कुठेही ढिली पडत नाही आणि त्यामुळे वाचकाचे लक्ष विचलीत तर होत नाहीच उलट त्यांना गोडीच लागते.
विमलचे विचार, भावना आणि तिच्यातली स्थित्यंतरे लेखकाने आपल्या शब्द कुंचल्यात चपखल पकडली आहेत. विमल आपल्यासमोर एक संवेदनाशील, सक्षम आणि बुद्धिमान पण आधाराची आणि सहचर्याची गरज असलेली स्त्री म्हणून येते. नाना हे पटापट निर्णय घेणारे, आपल्याला काय पाहिजे त्याची जाण असणारे यशस्वी उद्योजक असतात. काही वेळा ते विमल आणि स्वतः असे दोघांचे निर्णय घेतात, विमलला ते आवडते. जर मला या पुस्तकाचा उत्तरार्ध किंवा दुसरा भाग लिहायचा असेल तर मी या गोष्टीचा कथाबीज म्हणून वापर करेन.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका पुरुषाचा हात मेंदी काढलेल्या स्त्रीच्या हाताच्या बोटात अंगठी घालताना दाखवला आहे. कथेचा भावार्थ एका चित्रात! परंतु हे हात तरुण माणसाचे वाटतात, म्हाताऱ्यांचे नाही.
नारायण धारप हे भयकथा, गूढ कथा, थरार व विज्ञान काल्पनिका यांचे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या शैली बाहेरील जी एका हाताच्या बोटावर मोजता येणारी पुस्तके आहेत त्यातील हे एक आहे. आपण आपल्या खास शैली पलीकडे जाऊनही तितकेच चांगले लिहू शकतो याचा धारप आपल्याला प्रत्यय देतात.
मी हे पुस्तक का वाचले?   कल्पनारम्यते पलीकडचे धारप आहेत तरी कसे
काय आवडले नाही?        अति चांगुलपणा
काय आवडले?               कथा व लेखन
शिफारस           वाचनीय. जरूर वाचा.

मंदार आपटे



हर दिल धडक ने दो.... सचिन सबनीस

आपण सगळ्यांनीच "दिल धडकने दो" हा हिंदी चित्रपट बघितला असेल त्यामधील cruise शिप व तेथील हॉस्पिटॅलिटी आणि त्याभोवताली फिरणारे कथानक हा फ्रेश व नवा थिम हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर लक्षात आला असेलच.

आमच्या मागील वर्षी अनुभवलेल्या cruise हॉलिडे अनुभवाबद्दल आमच्या निकटवर्तीय मित्रमंडळीत औत्सुख्यमिश्रित चर्चा नेहेमीच घडत असतात. म्हणून मला वाटले कि आपण या बाबत जर काही लीहिले तर ते याबाबतीत मार्गदर्शक ठरेल कारण आपण बहुतेक वेळी अनुभवांच्या बाबतीत नेहेमीच साहाय्य घेत असतो. आज बहरच्या माध्यमातून या सफरीचा अनोखा अनुभव खास MMAD साठी share करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आनंदाचे मुख्य कारण असे कि माझी बहरसाठी हि पहिलीच लेखनसेवा आहे व तिही कौटुंबिक पुरस्काराने पूर्णत्वाला येतेय. तेंव्हा आपल्या सगळ्यांसाठी हा अनुभव रंजक व नाविन्यपूर्ण असेल अशी खात्री आहे.


जेंव्हा मला याबद्दल पहिल्यांदा समजले तेंव्हा काही मूलभूत गैरसमज इथे मुद्दामून करत आहे. उदारणार्थ

 v बोट बुडली तर काय होईल ,
 v बोटीवर sea सिकनेस फार जाणवतो,
 v हे खूप महागडे असते ते आपल्याला परवडणारे नाही,
 v जेवण म्हणजे फक्त sea फूड मिळणार ई ई. ..
तर आपल्या समाधानकारक माहितीसाठी मी खासकरून सांगतो ते म्हणजे
 v यात अपघाताच्या शक्यता फारच नगण्य असल्याने काळजी करण्याची गरज नाही. तसाही आपण विमानप्रवासाचा फार बाऊ (issue) करत नाहीच. Cruise चा प्रवास या आधीच्या शतकापासून कसा सुधारत गेला व त्याच्या मागे किती R&D व मेहेनत घेतली गेलीय याबद्दल YouTube वर भरपूर विडिओ उपलब्ध आहेत, (उत्सुकांसाठी पुढील लिंक देतआहे https://youtu.be/N3qh0SBH9EU  तरी हा विडिओ अवश्य बघणे).

 v Sea सिकनेस हा प्रकार आम्हाला अजिबात जाणवला नाही कारण cruise liner या उद्योगाचे classification अजूनही Luxury Voyage मध्ये असल्याने त्याचे science खूपच प्रगत झाले आहे, याबाबत अधिक Technicalities Youtube वरील विडिओमधून जाणून घेता येतीलच म्हणून त्या तपशिलात मी शिरत नाही.
तरी प्रामाणिकपणे सांगतो कि आम्हालातरी आमच्या सफरीत बोट हलणे हाच अनुभव तोहि एकदाच आला. तोसुद्धा जसे रात्री पाळण्यात नवजात बालकाला नाजूकपणे आई झोका देते तितकाच पण सुखद होता कारण त्यादिवशी रफ sea होता म्हणे.
तौलनिकदृष्ट्या आपण कधी Luxury बसने रात्रीचा प्रवास केला असेल तर झोप लागल्यावर ड्राइवरने अचानक lane कट केल्यावर जो असतो तो १००%.  त्याच्या तुलनेत विमानाचा रफ स्काय फील हा ५% जाणवतो. तात्पर्य जेवढे रफ स्काय आपण विमान प्रवासात अनुभवतो त्यापेक्षा शिपचा फील केवळ ५०%  mild असतो. म्हणजे सिकनेसचा प्रश्न निकालात निघतो.
 v आपण कुठल्या ना कुठल्या देशाटनाला जात असतोच त्यामध्ये देशोदेशीची प्रसिध्द्ध व प्रेक्षणीय स्थळे आपल्या सफरीच्या बजेट नुसार आपण बघायचे ठरवतो .
त्यात ती स्थळे बहुत करून युरोपमधील असतात ज्यात एकापेक्षा जास्त दिवस त्या सफरीसाठी दिलेले असतात. उदा. तुम्हाला पॅरिसमध्ये जर Eifel Tower  बघायचा असेल तर तुम्ही कमीत कमी पॅरिसचे ३ दिवसांचे package घेता व एक दिवस Eifel Tower  बघून उरलेल्या २ दिवसात बाकीची स्थळे बघून येऊ शकता.
या अशा सफरींना destinationtourism प्रकारात मोडतात. पण या प्रकारच्या destiantiontourism ला leisure Tourism शी compare करता येणार नाही. कारण दोघांची उद्देश्य भिन्न असतात.

      अर्थात जेंव्हा आपण डेस्टिनेशन Tourism करतो त्यावेळी आपल्याला leiusre नको असते असे नव्हे तर डेस्टिनेशन मध्ये leisure Tourism जोडले तर त्याचा खर्च भरमसाठ होतो. याचे मुख्य कारण डेस्टिनेशनला उपलब्ध असणाऱ्या leisure facility त्या डेस्टिनेशनचा प्रीमियम घेत असतात.
फार सोपे करून सांगायचे झाले तर जसे हॉटेलमध्ये गेल्या वर तुम्हाला पाणी सुद्धा जास्त किमतीला घ्यावे लागते तेच इथे होते.
म्हणूनच cruise शिप Voyage कधीच डेस्टिनेशन tourisim शी जोडलेले नसतात
अर्थात त्या तुलनेत किंमत तुम्ही कमीच देत असता.
याबाबत एक नमूद करावेसे वाटते ते असे कि भारतातून बुकिंग केलेल्या cruise voyage नेहेमीच स्वस्त पडतात, त्याचे कारण त्यांना भारतातून उत्सुकांचा व हौशी मंडळींचा जो एक मोठा वर्ग आहे त्यांना या प्रकारासाठी promote करायच आहे. म्हणून भारतातील बुकिंग भारताबाहेरून केलेल्या बुकिंगपेक्षा स्वस्त असतात.
 v राहिला प्रश्न जेवणाचा, तर त्यामध्ये फक्त Sea फूडच असते हा एक भोळा गैरसमज आहे.
हो आमच्यासारख्या शाकाहारी मंडळींची थोडी पंचाईत होते पण त्यासाठी केंव्हाही आगाऊ लेखी सूचना दिलेली असल्यास तीसुद्धा अडचण राहत नाही.

इतर शंकाचे निरसन माझ्या यापुढील प्रकरणात विस्तृतपणे सांगितलेल्या स्वानुभवरून होईलच याची खात्री आहे.
तेंव्हा मंडळी जर तुम्हालाही cruise सफर करावी असे वाटायला लागले असेल तर तुमचे हि
   दिल धडकने दो….. 
   सचिन सबनीस