Friday, September 8, 2017

श्रावणसरी



मृदगंधाचे अत्तर शिंपीत
आल्या श्रावण धारा
धुंद सुगंधाने दरवळला
आसमंत सारा

ऊन पावसाचा जणू
लपंडाव चालला
आला आला म्हणता
पाऊस अचानक थांबला

शतधारांनी तृप्त जाहली
तृषार्त धरणीमाता
त्या ओल्या तृप्तीतुन फुलतील
हिरवे अंकुर आता

हिरवाईच्या विविध छटांनी
सृष्टी सजली सारी
निसर्गाच्या सृजनाची
सारी किमयागारी

हिरवा सुंदर श्रावण आणतो
सुखसमृद्धीच्या लहरी
आनंदाचे शिंपण करिती
रिमझिम श्रावण सरी
         रिमझिम श्रावण सरी

सौ.नम्रता नितीन देव

No comments:

Post a Comment