हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अभिनेत्रीचा विचार केला तर त्यात दक्षिण आणि उत्तर भारतीय जास्त आहेत. दक्षिण म्हटलं तर वैजयंती माला, पद्मिनी, वहिदा ते अलीकडच्या शिल्पा शेट्टी पर्यंत. उत्तर भारतीय म्हटलं तर मीना कुमारी, नर्गिस पासून अगदी आताच्या अनुष्का पर्यंत. मराठी अभिनेत्री पण होत्याच, पण सुपर स्टार कोणी नव्हतं
१९८० ते १९९०
या काळात खूप
नवीन अभिनेत्री नावारूपास
आल्या. त्यात महत्वाची
नांवे म्हणजे श्रीदेवी,
जयाप्रदा. यांच्या बरोबरच एक
मराठी मुलगी हिंदी
चित्रपटात काम करायला
लागली होती. अबोध,
स्वाती हे खूप सुरुवातीचे सिनेमे केल्यानंतर
तिला संधी मिळाली
"हिफाजत" मध्ये अनिल
कपूर च्या समोर
काम करायची (बटाटा
वडा हे गाणे याच सिनेमातील).
तेव्हा कोणाला माहित
होतं कि पुढे या कलाकारा
बरोबर जोडी जमेल
आणि आपण मोठे
स्टार होऊ. थोडा
फार नाव होतं
असताना एक अजून सिनेमा आला
"दयावान", हा फिरोज
खान बॅनरचा आणि
त्याच्या खास स्टाईलचा.
हा फेमस झाला
तो अभिनया पेक्षा "आज
फिर तुमसे प्यार आया
है" या गाण्याने.
हे सगळं सुरु
होते, पण अजून यश म्हणजे
काय ते मिळालं
नव्हतं.
१९८८ मध्ये एन.चंद्रा या
मराठी दिग्दर्शकाने
"तेजाब" सिनेमा तयार
केला आणि त्यात
मोहिनी हा रोल दिला
आणि एका दिवसात
ती स्टार झाली.
"एक दोन तीन…"
या गाण्याने आणि
तिच्या मनमोहक नृत्याने
सगळयांना वेडे केले.
हा सिनेमा चांगला,
सगळे उत्कृष्ट कलाकार
अनुपम खेर, अनिल
कपूर, सुहास जोशी.
जितकी गाणी चांगली
तितकेच सुमधुर संगीत
दिलाय एल.पी. नी.
तेजाब नंतर एक हुकमी
एक्का म्हणून तिची घोडदौड सुरु झाली. "दिल" सिनेमाने तर तिला मोठं यश दिलं.
राम लखन, परिंदा, खेल, किशन कन्हैया मध्ये अनिल कपूर बरोबर जोडी जमली. "बेटा"
सिनेमा आणि त्याची गाणी, प्रामुख्याने "धक धक करने लगा" या गाण्याने तर किती
तरी जणांची धड धड वाढली. "साजन" चित्रपट हा प्रेक्षणीय आणि संगीतमय होता.
उत्तम कथानकाच्या साथीला चांगले कलाकार, तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. एकेक
सिनेमे करत असताना सुभाष घईंचा "खलनायक" आला, "चोली के पीछे क्या"
या गाण्याला लोकांनी काय कपडे घातलेत आणि खूप लाजिरवाणे नृत्य म्हणून नांवे ठेवली.
हा सिनेमा तिला खूपच महत्वाचा ठरला. यानंतर जॅकी बरोबर १०० डेज, संगीत, सचिन दिग्दर्शित
"प्रेम दिवाने" आले. तसेच संजय दत्त सोबत ठाणेदार, १९९४ मध्ये सुरज बडजात्यांचा
"हम आपके है कौन" या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीला चार चांद लागले. लगेच
१९९७ ला यश चोप्रांच्या "दिल तो पागल है" संगीतमय सिनेमा प्रेक्षकांच्या
पसंतीस उतरला होता. जर तिच्या सिनेमांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल. पण तिचे
अजून काही चांगले रोल म्हणा किंवा सिनेमे आहेत, इलाका/प्रेमप्रतिज्ञा मिथुन बरोबर,
अंजाम कोण विसरेल? लग्नानंतर केलेल्या देवदासचा पारोचा रोल केवळ लाजवाब.
कधी ती अभिनेत्री
म्हणून तर कधी डान्सर म्हणून
लक्षात राहिली. आपल्या
सगळ्यांना तिचे काही
गाणी व डान्स जास्त आवडली
ती म्हणजे, "तुमसे
मिलके ऐसा लगा, हमको
आज कल है इंतजार, बडा दुःख
दिना तेरे लेखन
ने, अठरा बरस
की ते अगदी देवदास".
अशा या अभिनेत्रीला
म्हणजेच " माधुरी दीक्षित"
ला वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा!
१९६७ मध्ये अजून
एका हॉलीवूड अभिनेत्रीचा
जन्म झाला ती म्हणजे जुलिया
रॉबर्ट्स. तिचं पण
करिअर १९८७-९० या काळात
सुरु झाले. मिस्टिक
पिझ्झा, स्टील मॅग्नोलियास
या सुरुवातीच्या चित्रपटानंतर
१९९० मध्ये तिला
भूमिका मिळाली ती "प्रेट्टी वुमन" ची. त्या भूमिकेचं
जुलियाने सोन केलं.
ती रातो रात
स्टार झाली आणि
मग एका पाठोपाठ
एक माय बेस्ट
फ्रेंड्स वेडिंग, एरिन, असे
सुपर हिट सिनेमे
दिले.
माधुरी आणि जुलिया
या दोघींच्या बाबतीत
हे साम्य. दोघीनींही
मग काही काळ
बॉलीवूड/हॉलिवूड वर
राज्य केलं.
लेखन - श्री मनोज करंदीकर
No comments:
Post a Comment