मार्च
२०१९ मध्ये पुण्याला
सुट्टीला गेलो होतो.
एका पूजेच्या निमित्ताने
खूप जण जेवायला
आले होते.
शेवटची
पंगत आमची घरच्या
मंडळींची होती. आमच्या
बरोबर एका मामाची
सून पण होती.
ती श्रुती सडोलीकरांकडे
गाणे शिकते. मग
तिला गाण्याचा आग्रह
झाला आणि गाणं
संपल्यावर जेवायचं असं फर्मान
निघालं. तिने "पाण्यातले
पहाता प्रतिबिंब हासणारे"
हे गाणं खूपच
सुंदर म्हटलं. चांगलीच
तयारी आहे गाण्याची.
हे गाणे ऐकून
सुट्टीचे पुढचे काही
दिवस तेच गाणं
गुणगुणण्यात गेले. अर्थात
घरी कार्यक्रम व्हायचे
तेव्हा या गाण्याची
अक्षरशः उजळणी झालेली
आहे.
इकडे
परत आलो तरी पण मन
त्या गाण्यातच. मग
सुरु झाला तो आवडता प्रकार,
एखादे गाणे/कविता
रोज ऐकायची. आता
तर गाणे ऐकणे
वा गाणे बघणे
खूपच सोप्पे आहे.
गुगल मावशी किंवा
युट्युब मावशी ला
सांगायचं की आपले
गाणे सुरु. २५-३० वर्ष
मागे बघितलं तर
फक्त रेडिओ आणि
मग आलेला ब्लॅक
अँड व्हाईट टीव्ही.
खरं तर हे गाणे १९७९
च्या "सोबती" या चित्रपटातील.
गीतकार - गंगाधर महाम्बरे,
संगीतकार - श्रीनिवास खळे आणि गायिका- आशा भोसले.
श्रीनिवास खळे यांच्याबद्दल
आपण काय बोलणार?
गाणे कसं सुंदर
आणि श्रवणीय होईल
हे त्यांचे तत्व.
भीमसेनजी, वसंतराव देशपांडे, सुधीर
फडके, अरुण दाते,
लता मंगेशकर, आशा
भोसले, सुरेश वाडकर
यांनी खळे काकांकडे
गाणी गायली आहेत.
आपण सगळेच या
सगळ्यांची गाणी ऐकताच
मोठे झालोय. उदा:
निज माझ्या नंदलाला,
या चिमण्यांनो परत
फिरा, सर्व सर्व
विसरू दे, पहिलीच
भेट झाली .............. ते
अगदी जेव्हा तुझ्या
बटांना पर्यंत.
"पाण्यातले पहाता"
या गाण्याबरोबरच अजून
दोन गाणी आहेत
" सोबती" मध्ये. ती
म्हणजे "आली आली
सर ही ओली"
आणि "सावलीस का
कळे उन्हामधील यातना".
तिन्ही गाण्याची नजाकत,
बाज पूर्ण वेगळा
आहे. आशा भोसले
यांची दोन गाणी
आणि एक साक्षात
लता मंगेशकरांचे. गंगाधर
महाम्बरे यांनी किती
सुंदर रचना केल्या,
त्याला उत्तम संगीत
देऊन श्रीनिवास खळेंनी
आपल्याला आनंद दिला.
बरेच वेळा एखादा
सिनेमा येऊन जातो
कळत देखील नाही,
पण त्यातील गाणी
कायम लक्षात राहतात.
"सावलीस ना
कळे" हे गाणे
ऐकून तेच जाणवलं
की आपण किती
तरी वर्षांपासून ऐकत
होतो पण आज तीच गाणी
नव्याने सापडली. आज
या निमित्ताने गीतकार,
संगीतकार आणि गायिका
अशा थोर मंडळींना
सलाम.
लेखन - श्री. मनोज करंदीकर
No comments:
Post a Comment