बरे झाले बाप्पा; उद्या पुन्हा येतेय परिक्षेची वेळ
परत घालीन मी; बुद्धि क्षमता आणि चातुर्याचा मेळ
तुम्ही सारे रहा निश्चिन्त; नका करू जास्त विचार
कोणता का असेना पेपर; घेईन त्याचा नक्की समाचार
बाबा म्हणे भाषा; तर आई म्हणे गणितावर् जोर दे थोडा
कोणी म्हणे समाजशास्त्र; तर कोणी म्हणे भूगोल घालेल खोडा
शेवटी मीच म्हणालो; आता सारे माझ्यावर तुम्ही सोडा
आता कुठेही अडणार नाही; माझ्या आत्मविश्वासाचा घोडा
दही साखर हाती देवून; आई लावेन माझ्या कपाळी चंदन
त्या अगोदर देवदर्शन; आणि आई बाबांना करीन वंदन
मी मात्र निर्धास्त आहे; मला न आता कसलांच घोर
कारण माझ्या मेहनतीच्या जोड़ीला; तुमच्या शुभेच्छा थोर

No comments:
Post a Comment