Friday, May 25, 2018

मराठी मातीतील मौल्यवान रत्ने - १ - रीमा लागू.



१८ मे २०१७ ला सकाळीच बातमी की " रीमा लागू " यांचे निधन. खूप वेळ विचार करत होतो की ही एक्सिट कायमची आहे. 

खरं म्हणजे मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट, टीव्ही सिरिअल्स या सर्व आघाडी वर त्यांचा वावर होता. एकदम शिस्तप्रिय, आपलं आणि बरोबर च्या कलाकाराचं काम चांगलं होणं हे त्यांना महत्वाचं असायचं. मला आठवतंय, जेव्हा मराठी नाटक आम्हाला समजायला लागलं तेव्हा "रीमा लागू" हे नाव प्रसिद्ध होत.

पुरुष, सविता दामोदर परांजपे, नातीगोती, हि गाजलेली नाटक. पण मला स्वतःला जो अभिनय जास्त भावला, आवडला तो "गोड गुलाबी, आसू आणि हसू , मनोमनी,...... अजून बरेच. गोड गुलाबी मधली कोकणची आजी तर बेस्ट. हे नाटक म्हणजे जुगलबंदी होती बरोबर मोहन जोशी आणि स्वतःची मुलगी मृण्मयी लागू.

रंगभूमी करत असताना मराठी चित्रपट होतेच, आठवत असेल तर बघा "नणंद भावजय, माझं घर माझा संसार, रेशामगाठ, अलीकडचा म्हटलं तर आईशपथ, शुभमंगल सावधान, नवरा माझा नवसाचा (एकदम छोटी भूमिका), आणखी किती तरी . आणि एक दिवस "कयामत से कयामत " मधून हिंदी मध्ये नवीन आई मिळाली.

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आई म्हणून मराठी अभिनेत्री ची काही कमी नव्हती, दुर्गा खोटे, सुलोचना, नूतन सगळ्या होत्या. त्यात रीमा हे नाव आलं आणि आईची काय असते ते आपण बघितलं. आशिकी,मैने प्यार किया पासून तर आई म्हणजे रीमा हे समीकरण झालं. मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. १९९० ते २००० च्या सगळ्या ब्लॉक बस्टरमध्ये आईची भूमिका रीमा. सगळे जण म्हणतात कि त्यांनी आई ग्लॅमरस केली. मुळात दिसायला सुंदर, अभिनय डोळ्यांनी करायचा हे अंगीभूत आणि दर्जेदार अभिनयाचा वारसा घरातून मिळाला होता.

टीव्ही सिरिअल्स चा विचार केला तर श्रीमान श्रीमती, ते स्टार प्लस च्या नामकरण पर्यंत मला आज परत या कलाकारांना सांगावस वाटत , लक्ष्मीकांत, सुधीर जोशी, आनंद अभ्यंकर, आता रीमा कि तुम्ही रंगभूमी करताना एक्सिट घेता तेव्हा माहित असत कि पुढच्या अंकामध्ये तुम्ही असणार आहात. पण तुम्हा सर्वांची हि कायमची एक्सिट खरंच चटका लावून गेली हे खरं. काही त्रास होत असेल, तब्ब्येत बरी नसेल तर - प्रयोग, शूटिंग थांबवा. कदाचित ही धावपळ माणसाला त्रासाची ठरते का ? आज च्या काळात सगळं करत असताना आपण तब्ब्येती कडे दुर्लक्ष करतोय हेच समजत नाही.

मनोज करंदीकर


No comments:

Post a Comment