Friday, May 25, 2018

माझी माती


 
 
 
माझी माती म्हणजे हजारो वर्षांचा  इतिहास लाभलेली अंबा देवी , रुक्मिणी चे माहेर घर असलेली अमरावती, विदर्भातील एक गाव .
पूरातन  काळी विदर्भ नावाच्या राजाचे राज्य या भागात होते आणि या राज्याची राजधानी म्हणजे अमरावती मधील कौढण्यपूर .
    
पूर्वी अमरावती हे उमरावती नावानं ओळखले जायचे ,असे म्हणतात की या भागात उंबर म्हणजे
औदुमबर वृक्षाचे घनदाट जंगल होते म्हणून अमरावती असे नाव पडले.
माझ्या अमरावतीत अंबा देवी चे अस्तित्व हजारो
वर्षा पासुन असल्याची नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेका ची पत्रिका अंबा देवी ला पाठवल्या चे इतिहासात नमूद आहे .
जुन्या वस्तीत परा कोटीला लागून हे मंदिर आहे.
अंबा देवी ची मूर्ती पूर्वा भिमुख असुन अतिशय पुरातन आहे. रुक्मिणी हरणंशी या मंदिरा शी संबंध जोडला
जातो इतिहासाचा पुरावा म्हणून देवी च्या मंदिरात
आज ही रुक्मिणी हरणाच्या वेळेस वापरलेली गुफा पायऱ्या अजूनही अस्तित्वात आहेत .
      
अंबा देवी ची  मूर्ती स्वयंभू , पूर्णाकृती ,आसनस्थ
काळ्या वाळुका पाषाण आहे . मंगळवारी मूर्तीला मुखवटा सोन्याचा चढवला जातो आणि सर्व दागिने घालून मूर्ती अतिशय  प्रसन्न दिसते .नवरात्री चे  नऊ दिवस मंदिरात भक्ताची प्रचंड गर्दी असते.
. 1500 च्या सुमारास विदर्भ वर मुघलांनी कब्जा केला. अनेक नगराची लुटालूट केली ,नुकसान केले.
अनेक मंदिरे देखील उध्वस्त केली ,त्यात हे देवी चे मंदिर पण उध्वस्त झाले होते .मात्र आतील गाभारा
आणि मूर्ती सुखरूप राहिली .
पुढे . . 1660 च्या दरम्यान श्री .जनार्दन स्वामी नी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
अहिल्याबाई होळकर यांचे ही मंदिराच्या पुनर्निर्माणीत मोलाचे योगदान आहे .
    
लक्ष्मी देवी चा अवतार समजल्या जाणाऱ्या श्री .कृष्णा ची पत्नी रुख्मिणी हिचे हरण करून शिशुपाल पासून रक्षण  करून  वाचवले ते ही अमरावतीत .
    
अश्या ऐतिहासिक अमरावती च्या माती मधला माझा जन्म . मी   माहेर ची माधुरी मंगला श्रीधर जोशीबालपण अतिशय आनंदात कौतुकात
गेले. सगळे नातेवाईक शेजारी अतिशय प्रेमळ आणि सदैव एकमेकांच्या अडचणीत धाऊन जाणारे .
माझ्या माती शी माझ्या खूप घट्ट गोड आठवणी जोडल्या गेल्या आहेत .
    
सुदैवाने सासर पण अमरावती तले त्यामुळे वर्षातून दोन / तीन दा तरी माझ्या अमरावती ला जाण्या चा योग येतोच .
अमरावती ला गेले की ,आनंदात मजेत मित्र मैत्रिणी सोबत गिल्ली दांडू , कंचे , लपाछपी , सुरकडी असे खेळ खेळून घालवलेले बालपण  , आणि आत्ता हयात नसलेले आणि माझ्यावर अतोनात प्रेम करणारे माझे बाबा यांच्यां आठवणी नी  डोळे पाणावतात .
   
तुम्ही देखील वेळात वेळ काढुन नक्की अंबा देवी मंदिर , भक्ती धाम , कोंडेश्वर  मंदिर , बांबू गार्डन, अप्परवर्ध धारणमेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा
वाइल्ड लाईफ सेंच्युरी आणि गाविलगड किल्ला या सर्व ठिकाणी आवश्य  भेट द्या .
     
अंबा देवी ची कृपा दृष्टी आपल्या सर्वांवर   कायम असू दे हीच त्या देवी चरणी नम्र प्रार्थना .
                             
                          
सौ .निहारिक सचिन सावरकर .
                                 
अबुधाबी .

No comments:

Post a Comment