८ सप्टेंबर हा ग्रेट आशा भोसले यांचा वाढदिवस. तसं सप्टेंबर महिन्यात दोन वाढदिवस असतात. एका घरातील दोन उत्तुंग, उत्कृष्ट कलाकारांचा, एक म्हणजे लता मंगेशकर आणि आशा भोसले.
आपण सगळेच त्यांची गाणी ऐकत मोठे झालोय. एक तर त्या काळात टीव्ही सगळ्या घरात नसायचा वा नव्हता पण. त्यामुळे रेडिओ हे एकच करमणुकीचे साधन. दिवस भरात जमेल तेव्हा नाही तर रात्री मराठी मधले "आपली आवड" हा किंवा हिंदी मधले "छायागीत" व "बेला के फूल" हे एकदम पसंतीचे कार्यक्रम. त्या वेळची ती गाणी अशी डोक्यात आणि मनात घट्ट बसून आहेत. नुसती गाणी नाही तर त्याचे गीतकार, संगीतकार हे सगळंच पाठ झालाय. त्यासाठी कुठल्या हार्ड डिस्क वर पेन ड्राईव्ह ची गरज नाही. हि गाणी लक्षात राहण्याची खूप कारण आहेत.
आशा भोसले यांची गाणी असा नुसता विचार करायचा म्हटलं तरी कोणती गाणी हा मुख्य प्रश्न येतो. मग ते चित्रपट गीत, भावगीत, अल्बम असो. जो प्रकार किंवा जे गाणं गायलं ते असं कि जीव ओतूनच. त्यांच्या मुळे किती गीतकार, संगीतकार उदयाला आले आणि आधीचे सुप्रसिद्ध झाले. ओ. पी, खय्याम, रवी, बप्पी लाहिरी
ते रहमान पर्यंत. खूपच गाणी आहेत आवडती त्यांची, मराठी आणि हिंदी पण. नेहमीची आहेतच म्हणजे "जिवलगा राहिले रे , केव्हा तरी पहाटे, धुंदी कळ्यांना.....सुवासिनी, मुंबईचा जावई, हिंदी म्हटलं तर किती तरी उमराव जानची सगळी गाणी, पिया बावरी(खूबसूरत)", ........ अमर्याद. ..... या गाण्यानं काय ऐकायचं हे शिकवलं, कान तृप्त केले. आशा बाई नी एक अद्भुत आणि वेगळं रेकॉर्ड केलं ते म्हणजे अल्बम. त्यात गझल हरिहरन, गुलाम अली अशा दिग्गजांबरोबर आणि अजून बरेच. हा विषय कधीच पूर्ण होणार नाही कारण गाणं हा वीक पॉईंट आहे.
मला आवडणारी त्यांची काही खास गाणी आहेत, आपण हि कधी वेळ काढून ती ऐकायचा प्रयत्न करा.
१. सखी ग मुरली मोहन (धर्मकन्या, हृदयनाथ मंगेशकर)
२. प्रेमवेडी राधा (आराम हराम आहे, सुधीर फडके )
३. श्रावण आला गं (वर्हाडी वाजंत्री, राम कदम)
४. माझ्या मनी प्रियाची (बाळा गाऊ कशी अंगाई, एन. दत्ता)
५. एकच या जन्मी जणू (पुढचं पाऊल, सुधीर फडके )
६. सांग तू माझाच ना (धाकटी सून, सुधीर फडके)
७. या सुखांनो या (सुधीर फडके)
८. काली घटा छाये (सुजाता, बर्मन दा)
९. अच्छाजी मै हारी (काला पानी)
१०. पान खायो सय्या हमारो (तिसरी कसम)
काही अल्बम गाणी आहेत.
१. सलोना सा साजन है (गुलाम अली )
२. कुछ दूर हमारे साथ चलो (हरिहरन)
३. करो ना याद मगर किस तरह भुलावू उसे
४. ना मरते हम तो क्या करते
No comments:
Post a Comment