Saturday, July 10, 2021

चित्रकला-----वंशिका निलेश उज्जैनकर

 


चित्रकला----स्वानंद नाईक

 



चित्रकला…..:-पियुष धनजंय शितोळे




 

चित्रकला-------पावनी प्रसाद बारटके

 


चित्रकला…..:- धृति आशिष देहणकर

 


चित्रकला-------भूमिका निलेश उज्जैनकर

 


चित्रकला--------आदित बलदावा

 



सभोवताली माझ्या …. ---रुपाली मावजो किर्तनी

 

प्रत्येक गोष्टीतून आपण काय ना काय शिकत असतो, फक्त त्या गोष्टी कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो ह्यावर सगळं अवलंबून असतं आणि तेव्हाच आपण शिकू शकतो. मला नेहमी असं वाटतं की माझ्या सभोवताली असलेली प्रत्येक गोष्ट मला शिकवत असते आणि मला एक वेगळी दिशा दाखवते.

 

सभोवताली माझ्या …. 

 

सभोवताली माझ्या

जगावं कसं , मी शिकले

चंद्र -सुर्य , झाडं फुलांनी

नदी, मेघांनी शिकवले

 

नदीकडूनी शिकले मी

वाहत कसे राहावे

बेरंग असूनी प्रवाह सुद्धा

निळेशार कसे दिसावे

 

झाडांकडूनी शिकले मी

सावली देण्यास डोलावे

सुकून जरी गेले तरीही

जळण होऊनी जळावे

 

फुलांनीनी  मला शिकविले

परीमळ पसरत फुलावे

चोखुन काढला मध तरीही

मधाळ कसे उरावे

 

चंद्राकडूनी शिकले मी

काळोखात उठून दिसावे

किरणांचा घेउन प्रकाश

सर्वोपरी कसे पोचावे

 

सूर्याने मज शिकवले

रखरखीत केंव्हा राहावे

तापावे कधी शितल होवे

अन कोमल कधी व्हावे

 

मेघांकडूनी मी शिकले

आकाशभर पसरावे

काळे असुदे वा पांढरे

आशा देत राहावे

 

वाटेकडूनी शिकले मी

दिशा दाखविण्यास जगावे

नागमोडी वळणावर सदैव 

साथ देत राहावे

 

दिशा दाखवणारी वाट असो

वा वाहणारा वारा काय

सभोवतालचा निसर्ग मजला

सदोदित शिकवतच जाय

 

 ---रुपाली मावजो किर्तनी

 

फादर्स डे -----सौ.नम्रता नितीन देव

 

- फादर्स डे -

 

आईची महती साऱ्या जगाने गायली 

बापाची माया कायम दुय्यमच ठरली 

आईच्या प्रेमासाठी साऱ्या म्हणी सारी गाणी 

अपवाद म्हणुन पुराणात शकुंतला -कण्व मुनी 

आणि आता भावलेली ' दमलेल्या बाबाची कहाणी '

निसर्गनियमानुसार तो बाळाला जन्म देत नाही 

म्हणुन काही त्याचे प्रेम कमी ठरत नाही 

तो पण लेकरावरती जीवापाड प्रेम करतो 

त्याच्या उज्वल भविष्यासाठी वर्तमानात राबतो 

धावपळीच्या आयुष्यात बाळाच्या सहवासाला मुकतो 

बाळाचे पहिले पाऊल ,पहिला बोल चुकला म्हणुन झुरतो 

बाबाचा धाक म्हणुन थोडंफार रागावतो 

रुसुन झोपलेल्या लेकराला मग हळुच कुशीतही घेतो 

बाळाच्या आजारपणात आईसारखा तोही हळवा होतो 

तिच्यासोबत तोही मग  रात्र रात्र जागतो 

लेक सासरी निघाल्यावर आतून तोही रडत असतो 

 आईसारख्या त्याच्या भावना तो दाखवू शकत नसतो 

सांगा बरं मग आईपेक्षा बाबा कुठे कमी पडतो ?

म्हणुनच मदर्स डे बरोबरच फादर्स डे ही असतो 

                                           

सौ.नम्रता नितीन देव 

 

- पर्यावरण दिन की पर्यावरण दीन ----सौ .नम्रता नितीन देव

 

- पर्यावरण दिन की पर्यावरण दीन -

 

हवा ,वेली ,पाणी -फुले ,पक्षी ,प्राणी 

या साऱ्यांनी मिळून बनले आपले पर्यावरण 

निसर्गानेच त्याच्यावरती पसरले 

ओझोनचे संरक्षक आवरण 

पण हे स्वार्थी मानवा 

कसे रे तुझे हे आचरण 

तुझ्या विध्वंसक वृत्तीने 

बिघडवलेस सारे वातावरण 

तोडुन वृक्ष आणि जंगले 

उभे केलेस तुझे बंगले 

स्वतः अतिक्रमण करून म्हणतोस 

बिबटे,गवे शहरात घुसले 

प्लास्टिकच्या राक्षसाने 

नदी- नाले सारे तुंबले 

पशु-पक्षी पाण्याविना 

तर जलचर पाण्यामध्ये संपले

हे सारे कमी म्हणुन आता 

व्हायरस युद्ध सुरु झाले 

सारे काही संपवून आता 

मानव मानवा संपवु लागले 

बास कर आता तरी 

थांबव बाबा हे सगळे 

तूच निर्मिलेल्या कोरोनाने 

तुलाच हतबल करून टाकले 

प्राणवायूचे मोल सांग 

आता तरी तुला पटले?

ऑक्सिजन प्लान्ट  उभारण्यापेक्षा 

प्रत्येकाने प्लांट लावणे 

खरोखरीच खुप गरजेचे झाले 

अतिशय गरजेचे झाले 

                           

सौ .नम्रता नितीन देव 

 


"बाबा"--------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

"बाबा"

बाबा खुप आठवतात हो तुम्ही, आणि  तुमच्या आठवणीत स्वतः ला  रमवणे

माझ्या जन्मानंतर माझी आई मला मिळाली हे सांगणे,
आजीचे नाव घेऊन सतत संबोधणे,
दोन्ही पावलं हातात घेऊन गुंडबावलं म्हणून नाचणे.
बाई, ताई करत सतत आवाज देणे.

बाबा खुप आठवतात हो तुम्ही, आणि तुमच्या आठवणीत स्वतः ला  रमवणे.

माझी मुलगी माझ्या घरची लक्ष्मी आहे असे मानणे ,
ती जिथे जाईल तिथे बरकत असणार, असे सांगणे ,
माझी मुलगी सर्वगुण संपन्न आहे याचा अभिमान वाटणे,
बोलतांना असे आईला कित्येकदा  म्हणणे.

बाबा खुप आठवतात हो  तुम्ही, आणि तुमच्या आठवणीत स्वतः ला रमवणे.

तुमचे दोन्ही भावांवर चिडणे, पण मी समोर आली कि स्वतः ला आवरणे.
लग्न झाल्यावर घरी माहेरपणाला येणार म्हणून रस्त्याकडे  डोळे लावून बसणे.
समोसा आवडतो म्हणून आधीच घेवून येणे.
आता कोण करणार माझे असे लाड हाच विचार सतत मनात येणे.

बाबा खुप आठवतात हो तुम्ही, आणि  तुमच्या आठवणीत स्वतः ला  रमवणे.

                                 सौ. अंजली निलेश उज्जैनकर

Fatherhood: Memories and wish------Dr.Prasad Bartake

 

Fatherhood: Memories and wish

I am Dr.Prasad Bartake father of two sweets angles Pavani and Pranavi and Bahar magazine has given me an opportunity to share my thoughts on Fatherhood i.e. Baba. While making this article it took me down the memory lane to the golden day spent with my father which are just unforgettable.

Fatherhood is the great thing that could ever happen. You can't explain it until it happens—it's like telling someone what water feels like before they've ever swam in it."

I belong to a strong political and respectable family and my father, Mr.Prafulla Bartake, was a mayor of our municipal corporation for many decades. He was an eminent and reputable personality  in our hometown and had done a lot of philanthropic work for the betterment of society. 

He used to say that it's never too late to do anything you want to do.  And you never know what you can accomplish until you try.

He gave me the greatest gift anyone could give another person and that is he believed in me.

Education is the best gift anyone can have and because of his strong support and encouragement I was able to achieve my highest degree of PhD from an esteemed  institute like IIT Bombay.

Still after doing my doctorate he asked me if I wanted to study further. Then I said let me apply the education to the field what I have studied and being a practical man, he was very much happy with my idea.

Honesty and high standard morals are the life ethics he lived with and taught us through out the life.

He used to say that money is not everything and friendships and good personnel bonding makes a complete person. 

Now my role being a father make me responsible to teach and convey the values inculcated by my father to my daughters and make them a good human being.  

Finally I will say

"A good father is one of the most unsung, unpraised, unnoticed, and yet one of the most valuable assets in our society."