"बाबा"
बाबा खुप आठवतात हो तुम्ही, आणि तुमच्या
आठवणीत स्वतः ला रमवणे
माझ्या जन्मानंतर माझी आई मला मिळाली हे
सांगणे,
आजीचे नाव घेऊन सतत संबोधणे,
दोन्ही पावलं हातात घेऊन गुंडबावलं म्हणून
नाचणे.
बाई,
ताई करत सतत आवाज देणे.
बाबा खुप आठवतात हो तुम्ही, आणि तुमच्या आठवणीत स्वतः ला
रमवणे.
माझी मुलगी माझ्या घरची लक्ष्मी आहे असे
मानणे ,
ती जिथे जाईल तिथे बरकत असणार, असे सांगणे ,
माझी मुलगी सर्वगुण संपन्न आहे याचा
अभिमान वाटणे,
बोलतांना असे आईला कित्येकदा म्हणणे.
बाबा खुप आठवतात हो तुम्ही, आणि
तुमच्या आठवणीत स्वतः ला रमवणे.
तुमचे दोन्ही भावांवर चिडणे, पण मी समोर आली कि स्वतः ला आवरणे.
लग्न झाल्यावर घरी माहेरपणाला येणार
म्हणून रस्त्याकडे डोळे
लावून बसणे.
समोसा आवडतो म्हणून आधीच घेवून येणे.
आता कोण करणार माझे असे लाड हाच विचार सतत
मनात येणे.
बाबा खुप आठवतात हो तुम्ही, आणि तुमच्या
आठवणीत स्वतः ला रमवणे.
सौ. अंजली निलेश उज्जैनकर
No comments:
Post a Comment