Saturday, July 10, 2021

- पर्यावरण दिन की पर्यावरण दीन ----सौ .नम्रता नितीन देव

 

- पर्यावरण दिन की पर्यावरण दीन -

 

हवा ,वेली ,पाणी -फुले ,पक्षी ,प्राणी 

या साऱ्यांनी मिळून बनले आपले पर्यावरण 

निसर्गानेच त्याच्यावरती पसरले 

ओझोनचे संरक्षक आवरण 

पण हे स्वार्थी मानवा 

कसे रे तुझे हे आचरण 

तुझ्या विध्वंसक वृत्तीने 

बिघडवलेस सारे वातावरण 

तोडुन वृक्ष आणि जंगले 

उभे केलेस तुझे बंगले 

स्वतः अतिक्रमण करून म्हणतोस 

बिबटे,गवे शहरात घुसले 

प्लास्टिकच्या राक्षसाने 

नदी- नाले सारे तुंबले 

पशु-पक्षी पाण्याविना 

तर जलचर पाण्यामध्ये संपले

हे सारे कमी म्हणुन आता 

व्हायरस युद्ध सुरु झाले 

सारे काही संपवून आता 

मानव मानवा संपवु लागले 

बास कर आता तरी 

थांबव बाबा हे सगळे 

तूच निर्मिलेल्या कोरोनाने 

तुलाच हतबल करून टाकले 

प्राणवायूचे मोल सांग 

आता तरी तुला पटले?

ऑक्सिजन प्लान्ट  उभारण्यापेक्षा 

प्रत्येकाने प्लांट लावणे 

खरोखरीच खुप गरजेचे झाले 

अतिशय गरजेचे झाले 

                           

सौ .नम्रता नितीन देव 

 


No comments:

Post a Comment