Friday, April 2, 2021
छोटू समोसे--------सौ. शीतल अमित झळकीकर
छोटू
समोसे
साहित्य
दोन उकडलेले बटाटे
लाल तिखट २ छोटे चमचे
चिमुटभर बडीशेप
कोथिंबीर चिरलेली
मीठ चवीनुसार
पारीसाठी साहित्य
मैदा एक वाटी
चिमुटभर ओवा
मोहन एक चमचा
मीठ
तळण्यासाठी तेल
कृती
बटाटे कुस्करून घ्यावे.
त्यात लाल तिखट, कोथिंबीर
थोडेसे, बडीशेप आणि मीठ घालून एकत्र
करावे.
आता पारी साठी -
मैदा,
त्यात थोडेसे पाणी, थोडा ओवा, मीठ घालून कणिक मळून घ्यावी. मध्यम आकाराची गोळी
घ्यावी. लाटावी, त्याचे दोन भाग करावे आणि कोनाच्या आकारात करून घेऊन त्यात सारण
भरावे. तळणीसाठी तेल ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. दोन किंवा चार समोसे एकावेळी
तळावे. मंद आचेवर सामोसे गुलबट रंगाचे होईपर्यंत तळावे.
सामोसे जर खुसखुशीत हवे असतील तर ते मंद आचेवरच
तळावे, मोठ्या आचेवर सामोसे खुसखुशीत तळले जाणार नाहीत आणि मग माऊ पडतात.
पुरणपोळी (गव्हाच्या पिठाची)-------सौ. शीतल अमित झळकीकर
पुरणपोळी
(गव्हाच्या पिठाची)
पूरणासाठी साहित्य
तीन वाटी चणाडाळ
गुळ अडीच वाटी
चिमूटभर जायफळ पूड
चिमुटभर वेलची पुड
आवरणासाठी
गव्हाचे पीठ
पाणी
तेल
पूरणाची कृती
चणा डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. कुकरला
लावून चार ते पाच शिट्ट्या कराव्यात.
चणाडाळ मधलं पाणी निथळून घ्यावे.
शिजवलेली चणा डाळ थोडीशी परतून घ्यावी. त्यात
गूळ घालावे. हे मिश्रण सतत ढवळत राहावे. थोड्या वेळात पुरण घट्ट होईल. कालथा
पुर्णत उभा घालून बघावा कालथा उभा राहिला म्हणजे पुरण बरोबर झाले आहे. गार
झाल्यावरती हे पुरण थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
कणकेत थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यावी
जेव्हा आपण ही कणीक मळतो त्यावेळी त्याच्यामध्ये पाणी एकदम न घालता थोडे थोडे पाणी
त्याच्यात वरून घालत राहावे. आपल्याला हवी तशी काढणी मळणी गेली की मग थोडे तेल
घालून कणीक परत नीट मळून घ्यावी आणि मग ती एका भांड्यात थोडेसे तळाला तेल घालून
झाकून ठेवावी.
आता कणकेची एक छोटी गोळी घ्यावी ती अंगठा वापरून
गोल गोल थोडी मोठी वाढवून घ्यावी, मग पुरणाचा एक गोळा घेऊन तो त्या कणकेमध्ये
घालून छान गोळा करून घ्यावा. मग हाताने थोडासा दाब देऊन पोळी लाटावी. लाटणं वापरून
ती पोळी लाटण्यावर घ्यावी आणि मग ती तव्यावर टाकावी. एका बाजूने पोळी छान खरपूस
झाली कि ती तव्यावरून काढावी आणि मग दुसऱ्या बाजूवर शेकायला टाकावी.
दुधाबरोबर अथवा तूप घालून छान खमंग पुरणपोळीचा
आस्वाद घ्यावा
टीप- (चणाडाळ मधले पाणी कटाच्या आमटीसाठी वापरता येते)
रंग होळीचा---------संतोष दगडू राक्षे
रंग
होळीचा
रंग लावा आकाशाच्या भव्यतेचा,
रंग लावा सागराच्या अथांगतेचा
रंग लावा चातकाचा आतुरतेचा,
रंग लावा निसर्गाच्या देण्याचा
रंग लावा श्रीरामाच्या धैर्याचा,
रंग लावा कृष्ण सुदामाच्या मैत्रीचा
रंग लावा विठ्ठलाच्या करुणेचा,
रंग लावा ज्ञानोबांच्या विश्वशांतीचा
रंग लावा तुकोबाच्या अभंगांचा,
रंग लावा पुंडलिकाच्या भक्तीचा
रंग लावा शिवबाच्या पराक्रमाचा,
रंग लावा बळीराजाच्या घामाचा
रंग लावा आईच्या वत्सलतेचा,
रंग लावा वडिलांच्या धीराचा
रंग लावा प्रियेचा प्रीतीचा,
रंग लावा सखेच्या सौख्याचा
रंग लावा बंधूंच्या प्रेमाचा,
रंग लावा बहिणीच्या मायेचा
रंग लावा मुलांच्या निरागसतेचा,
रंग लावा स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा
रंग लावा स्त्रीच्या सन्मानाचा,
रंग लावा पुरुषी मर्दुमिकेचा
रंग लावा समाजातीतील एकात्मतेचा
रंग लावा माणसाला माणुसकीचा
रंग लावा भूमातेच्या धुळीचा,
रंग लावा होळीच्या पावित्र्याचा
संतोष दगडू राक्षे
तुझा रंग----------रुपाली मावजो किर्तनी
तुझा रंग
तुझ्या रंगात रंगायचं होतं ह्या राधेला
पण तुला ही सखी कधी दिसलीच नाही
संगळ्यांना रंगवण्यात तू गुंग होतास?
का तुझा रंग माझ्या पर्यंत पोचलाच नाही?
केसांपासून पाया पर्यंत चिंब मी न्ह्याले
आजू बाजूच्या रंगात रंगत मी गेले
नव्हतं मला रंगायचं पण संगळ्यांनी रंगवलं
तुलाच शोधत होते कृष्णा, मीच हरवले
धुउन गेला रंग सारा पण आतून मी रंगलेले
तुझाच तो रंग ज्यात पूर्ण मी बुडलेले
वरवरचा रंग गेला, आतला काही जाइना
पुसून तो काढायची ईच्छाही मला होईना
तुझ्या रंगात रंगायचं होतं ह्या राधेला
पण तू रंगवलेलं तिला समजलंच नाही
तुझ्याच रंगात रंगलेली असुनही
ह्या राधेला ते कळलंच नाही
---रुपाली मावजो किर्तनी
आयुष्याचा रिमोट कंट्रोल----नम्रता चिटणीस
आयुष्याचा रिमोट
कंट्रोल.
कधी वाटतं आयुष्याचा
रिमोट कंट्रोल आपल्या हाती असावा...
मनात येईल तेव्हा
आयुष्य पुन्हा "रिवांईंड" करून जगावं!
कटू आठवणींसाठी
"डिलिट" बटण वापरावं....
गोड आठवणींना मात्र
"पॉज" करून करून पहावं!
चुकीच्या निर्णायासाठी
"एडीट" बटन चं ऑप्शन असावं...
"एडीट केलेलं
आयुष्य मग पुन्हा जोमाने जगावं!
आठवणीतला एखादा चेहरा
"कॉपी पेस्ट" करून घ्यावा...
हळव्या कातरवेळी
तो मग भरभरून पहावा!
"फास्ट फॉरवर्ड"
करून भविष्यात डोकवावं??
दुःखाची सावट दिसताच,
चॅनेलच बदलून टाकावं!
भुतकाळची व्यथा....भविष्याची
चिंता का करत बसावं??
हातातला वर्तमान
आपला....भरभरून जगावा.








