छोटू
समोसे
साहित्य
दोन उकडलेले बटाटे
लाल तिखट २ छोटे चमचे
चिमुटभर बडीशेप
कोथिंबीर चिरलेली
मीठ चवीनुसार
पारीसाठी साहित्य
मैदा एक वाटी
चिमुटभर ओवा
मोहन एक चमचा
मीठ
तळण्यासाठी तेल
कृती
बटाटे कुस्करून घ्यावे.
त्यात लाल तिखट, कोथिंबीर
थोडेसे, बडीशेप आणि मीठ घालून एकत्र
करावे.
आता पारी साठी -
मैदा,
त्यात थोडेसे पाणी, थोडा ओवा, मीठ घालून कणिक मळून घ्यावी. मध्यम आकाराची गोळी
घ्यावी. लाटावी, त्याचे दोन भाग करावे आणि कोनाच्या आकारात करून घेऊन त्यात सारण
भरावे. तळणीसाठी तेल ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. दोन किंवा चार समोसे एकावेळी
तळावे. मंद आचेवर सामोसे गुलबट रंगाचे होईपर्यंत तळावे.
सामोसे जर खुसखुशीत हवे असतील तर ते मंद आचेवरच
तळावे, मोठ्या आचेवर सामोसे खुसखुशीत तळले जाणार नाहीत आणि मग माऊ पडतात.
No comments:
Post a Comment