Showing posts with label पाककृती. Show all posts
Showing posts with label पाककृती. Show all posts

Saturday, June 5, 2021

चिवडा-----सौ. शीतल अमित झळकीकर

 

चिवडा

साहित्य

पातळ पोहे.      अर्धा किलो

शेंगदाणे.           एक वाटी

डाळं.                एक वाटी

सुकं खोबरं.        अर्धी वाटी (बारीक चकत्या)

काजू.                १०० ग्राम

हिरव्या मिरच्या            १०-१२मिरच्याचिरलेल

कडीपत्ता.           १०० ग्राम धुऊन पुसून

हिंग

तेल

चवीनुसार मीठ आणि साखर

हळद

मोहरी

 

कृती

प्रथम पातळ पोहे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावे .पोहे कुरकुरीत भाजलेले बरे.

शेंगदाणे, डाळं ,सुखं खोबरं ,काजू प्रत्येक जिन्नस वेगळेवेगळे तळून घ्यावे.फोडणीसाठी तेलात मोहरी तडतडली की त्यात हळद , हिंग, मिरच्या ,कडी पत्ता  व  जिन्नस घालून परतून घ्यावे.

फोडणी गार झाली की पातळ पोहे त्यात घालून  , मीठ व साखर घालून चांगले एकत्र करावे.

एअर टाईट कंटेनर किंवा स्टीलच्या डब्याला पेपर लावून ठेवला तर हा चिवडा चांगला टिकतो.



“आंबा मोदक”--------------सौ विनिता आठवले

 

“आंबा मोदक”

नमस्कार मंडळी,

Mother’s day special आणि तो ही मे महिना…म्हणजे आंब्यांचा मोसम …आहे तर म्हटले…माझ्या आई ची स्पेशल रेसिपी तुम्हाला सांगावी..

आंबा मोदक…करण्यास अतिशय सोप्पे आणि खाण्यास अतिशय रुचकर..

साहित्य:

सारण—

१/२ मेजरींग कप खरवडलेले खोबरं

१/२ मेजरींग कप गूळ

१/२ मेजरींग कप  साखर

उकड-

३/४ मेजरींग कप आंबा रस

१/४ मेजरींग कप  पाणी

1 (हिप) मेजरींग कप -मोदक पीठ (किंव्हा तांदूळ पीठ ही चालेल)                                                             

१/२ टीस्पून तूप

१/२ तेल

किंचित मीठ

कृती—

सारण (आधी सारण करून, गार करून घ्यावे.)

१)खोबरं आणि गूळ एकत्र करून नॉन-स्टिक पॅन/कढई मध्ये घ्यावे आणि मंद आचेवर एक जीव होई पर्यंत शिजवावे.

२)त्याला सुटलेले पाणी आळात आले की गॅस बंद करावा.

३)सारण गार होऊ द्यावे.चमच्याने मोदक भरता येईल इथं पथ ते आळले पाहिजे.

उकड—

आंबा रस आणि तेल एकत्र करून उकळत ठेवावे.

उकळी आली की पीठ त्यात घालून उलतन्याच्या मागच्या दांड्याच्या साहाय्याने फिरवावे.

झाकण ठेवून दोन वाफा आणाव्यात आणि गॅस बंद करावा.

उकड चांगली मळून घ्यावी ( वाटल्यास हाताला तेल आणि पाणी लावून घ्यावे.)

मोदक कृती—

पिठाचे आपल्यला हवे त्या आकारचे भाग करून घावे.

मोदकची पारी करून, त्यात सारण भरावे आणि सुंदर मोदक वळावा.

नेहमी प्रमाणे मोदक १५ मिनिटे उकडत ठेवावे.

मोदक खाण्यास तयार.

 

---सौ विनिता आठवले

 



Saturday, May 1, 2021

फ्रुट श्रीखंड पुरी-------सौ. शीतल अमित झळकीकर

 

फ्रुट श्रीखंड पुरी

 

श्रीखंडासाठी चे साहित्य

साहित्य

दही एक किलो

पिठीसाखर दोन वाट्या

वेलची पूड

आवडीप्रमाणे ड्राय फ्रुट्स

कृती

एक किलो दही एका कापडात रात्रभर बांधून ठेवावे.

रात्रभर बांधून ठेवल्याने त्याच्यातले सगळे पाणी निथळून जाईल आणि आपल्याला चांगला चक्का मिळेल.

आता याचक यामध्ये पिठीसाखर वेलची पूड घालून थोडेसे हलवून आपल्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर ते चांगले मिक्स करून घ्यावे. श्रीखंड तयार.

पूर यांसाठी साहित्य

कणिक

थोडासा रवा

तेल

आणि आणि कणीक मळण्यासाठी पाणी.

पुऱ्या साठीचे साहित्य म्हणजे कणिक थोडा रवा चिमुटभर मीठ आणि थोडं थोडं करून पाणी घालून आणि व्यवस्थित मळून घ्यावी.

आता या कणकेचे छोटे छोटे गोळे करून पुर्‍या लाटून छान तळून घ्याव्यात.

फ्रुट श्रीखंडासाठी

वरील सर्व कृती करून त्यात आपल्या आवडीप्रमाणे फळं घालावी.




Friday, April 2, 2021

छोटू समोसे--------सौ. शीतल अमित झळकीकर

 

छोटू समोसे

 

साहित्य

दोन उकडलेले बटाटे

लाल तिखट २ छोटे चमचे

चिमुटभर बडीशेप

कोथिंबीर चिरलेली

मीठ चवीनुसार

पारीसाठी साहित्य

मैदा एक वाटी

चिमुटभर ओवा

मोहन एक चमचा

मीठ

तळण्यासाठी तेल

कृती

बटाटे कुस्करून घ्यावे.

त्यात लाल तिखट, कोथिंबीर थोडेसे, बडीशेप आणि मीठ घालून एकत्र करावे.

आता पारी साठी -

 मैदा, त्यात थोडेसे पाणी, थोडा ओवा, मीठ घालून कणिक मळून घ्यावी. मध्यम आकाराची गोळी घ्यावी. लाटावी, त्याचे दोन भाग करावे आणि कोनाच्या आकारात करून घेऊन त्यात सारण भरावे. तळणीसाठी तेल ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. दोन किंवा चार समोसे एकावेळी तळावे. मंद आचेवर सामोसे गुलबट रंगाचे होईपर्यंत तळावे.

सामोसे जर खुसखुशीत हवे असतील तर ते मंद आचेवरच तळावे, मोठ्या आचेवर सामोसे खुसखुशीत तळले जाणार नाहीत आणि मग माऊ पडतात.



पुरणपोळी (गव्हाच्या पिठाची)-------सौ. शीतल अमित झळकीकर

 

पुरणपोळी (गव्हाच्या पिठाची)

पूरणासाठी साहित्य

तीन वाटी चणाडाळ

गुळ अडीच वाटी

चिमूटभर जायफळ पूड

चिमुटभर वेलची पुड

आवरणासाठी

गव्हाचे पीठ

पाणी

तेल

पूरणाची कृती

चणा डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. कुकरला लावून चार ते पाच शिट्ट्या कराव्यात.

चणाडाळ मधलं पाणी निथळून घ्यावे.

शिजवलेली चणा डाळ थोडीशी परतून घ्यावी. त्यात गूळ घालावे. हे मिश्रण सतत ढवळत राहावे. थोड्या वेळात पुरण घट्ट होईल. कालथा पुर्णत उभा घालून बघावा कालथा उभा राहिला म्हणजे पुरण बरोबर झाले आहे. गार झाल्यावरती हे पुरण थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.

कणकेत थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यावी जेव्हा आपण ही कणीक मळतो त्यावेळी त्याच्यामध्ये पाणी एकदम न घालता थोडे थोडे पाणी त्याच्यात वरून घालत राहावे. आपल्याला हवी तशी काढणी मळणी गेली की मग थोडे तेल घालून कणीक परत नीट मळून घ्यावी आणि मग ती एका भांड्यात थोडेसे तळाला तेल घालून झाकून ठेवावी.

आता कणकेची एक छोटी गोळी घ्यावी ती अंगठा वापरून गोल गोल थोडी मोठी वाढवून घ्यावी, मग पुरणाचा एक गोळा घेऊन तो त्या कणकेमध्ये घालून छान गोळा करून घ्यावा. मग हाताने थोडासा दाब देऊन पोळी लाटावी. लाटणं वापरून ती पोळी लाटण्यावर घ्यावी आणि मग ती तव्यावर टाकावी. एका बाजूने पोळी छान खरपूस झाली कि ती तव्यावरून काढावी आणि मग दुसऱ्या बाजूवर शेकायला टाकावी.

दुधाबरोबर अथवा तूप घालून छान खमंग पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा

टीप- (चणाडाळ मधले पाणी कटाच्या आमटीसाठी वापरता येते)


Sunday, February 28, 2021

बटाटा वडा--------सौ. शीतल अमित झळकीकर

 

बटाटा वडा

बटाटा वडा साहित्य

बटाटा वडा कृती

बटाटे सहा उकडलेले  5-6

·      सर्वप्रथम डाळीचे पीठ घेऊन त्यात हळद मीठ हिंग आणि मोहन घालून थोडेसे पाणी घालून पीठ तयार करावे.

·      उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे व त्यात फोडणी घालावी.

·      फोडणीसाठी तेलात मोहरी हिंग कढीपत्ता घालून, बटाट्यात घालावे.

·      आता या मिश्रणात लिंबू पिळावे आणि कोथिंबीर चिरुन घालावी घालावी.

·      मीठ घालावे आणि सर्व मिश्रण छान एकत्र मिक्स करून घ्यावे.

·      या मिश्रणाचे आपल्याला आवडतील त्या आकाराचे गोळे करून घ्यावे.

·      आता तळणीसाठी तेल घ्यावे.

·      एक गोळा घ्यावा तो बेस्ट डाळीच्या पिठात बुडवून गरम तेलात सोडावा.

·      वडे थोडेसे लाल रंगाचे होतील तोवर तळावे.

आलं असून मिरची ठेचा 2 मोठे चमचे

डाळीचे पीठ 1-2 कप

हळद

मीठ

हिंग

कोथिंबीर

लिंबू

कढीपत्ता

तेल तळण्यासाठी आणि फोडणी साठी.

धने जीरे पूड

लिंबाचा रस

साखर

मीठ

 

लसणीची चटणी साहित्य

लसणीची चटणी कृती

सुकं खोबरं किसलेलं दोन वाट्या

·      सर्वप्रथम किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे

·      लाल तिखट थोडेसे भाजून घ्यावे

·      आता सर्व साहित्य म्हणजेच किसलेलं खोबरं लाल तिखट लसणीच्या पाकळ्या आणि मीठ मिक्सर मध्ये वाटुन घ्यावे.

·      लसणीची चटणी तयार.

लाल तिखट

लसणीच्या पाकळ्या 12 ते 15

एक मोठा चमचा मीठ.

 


 

गाजराचे भरीत----सौ नम्रता नितीन देव

 

गाजराचे भरीत

आपण गाजराची कोशिंबीर नेहेमीच करतो पण हे थोडंसं वेगळं, गाजराचे भरीत.

 

साहित्य -

२-३ मध्यम आकाराची गाजरं तुकडे करून कुकर मधून वाफवून घेतलेली,

पाव वाटी शेंगदाण्याचे कूट,

२हिरव्या मिरच्या,

बारीक चिरलेली कोथिंबीर २टे स्पून,

एक वाटी गोडसर दही,

चवी पुरेसे मीठ -साखर,२सुक्या लाल मिरच्या,

४-५कढीपत्त्याची पाने,

फोडणीचे साहित्य,२-३टी स्पून तेल फोडणी साठी

 

कृती -

वाफवलेले गाजराचे तुकडे कुस्करून घेणे व त्यात चवीपुरेसे मीठ,साखर,दाण्याचे कूट,फेटलेले दही हे सर्व साहित्य मिसळुन घेणे.दोन हिरव्या मिरच्या व पाव टी स्पून मोहरी मिक्सर मधे फिरवून घेणे व भरीता मध्ये मिसळणे.छोट्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल तापवून त्यात मोहरी,जिरं,३-४मेथी दाणे,लाल सुक्क्या मिरच्यांचे तुकडे,कढीपत्ता,हिंग,व हळद घालुन खमंग फोडणी करून ती भरीतावर ओतणे.बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून चवदार भरीत पोळी-भाकरी बरोबर सर्व्ह  करावे.

 





सौ नम्रता नितीन देव