आयुष्याचा रिमोट
कंट्रोल.
कधी वाटतं आयुष्याचा
रिमोट कंट्रोल आपल्या हाती असावा...
मनात येईल तेव्हा
आयुष्य पुन्हा "रिवांईंड" करून जगावं!
कटू आठवणींसाठी
"डिलिट" बटण वापरावं....
गोड आठवणींना मात्र
"पॉज" करून करून पहावं!
चुकीच्या निर्णायासाठी
"एडीट" बटन चं ऑप्शन असावं...
"एडीट केलेलं
आयुष्य मग पुन्हा जोमाने जगावं!
आठवणीतला एखादा चेहरा
"कॉपी पेस्ट" करून घ्यावा...
हळव्या कातरवेळी
तो मग भरभरून पहावा!
"फास्ट फॉरवर्ड"
करून भविष्यात डोकवावं??
दुःखाची सावट दिसताच,
चॅनेलच बदलून टाकावं!
भुतकाळची व्यथा....भविष्याची
चिंता का करत बसावं??
हातातला वर्तमान
आपला....भरभरून जगावा.
No comments:
Post a Comment