अशा बरसल्या श्रावण सरी
अवखळ मन घेई भरारी
थेंब टपोरे पानांवरी
मोहक गंध पृथेपरी
रिमझिम पाऊस, इंद्रधनू गहिरा
जादूगरी करी अल्लड हा वारा
पटली तुज मज आठवणींची खुणगाठ
पहिल्या पावसाच्या क्षणांनी सजली प्रेमाची पाउलवाट
साथ ही आपुली चिंब ओल्या क्षणांची
जीवनगाणे सुखाचे, भेट श्रावण धारांची
....... डॉ पल्लवी प्रसाद बारटके
No comments:
Post a Comment