Monday, June 25, 2018

शाळा


नोव्हेंबर २०१४
    काही दिवसापूर्वी "शाळा" हा चित्रपट बघितला. त्याआधी बोकील सरांची कादंबरी वाचली होती. चित्रपटाचा परिणाम जास्त असतो. आज थोडा प्रयत्न करतोय आमच्या शाळेबद्दल काहीतरी लिहायचा.
    शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि पहिला प्रवास. आजच्या काळात तर मुलं दोन वर्षाची होतानाच पालक प्रवेश प्रक्रिया, वेगवेगळी माध्यम, वयाची अट . चा विचार सुरु करतात, त्यासाठी धावपळ पण करतात. ती काळाची गरज पण आहे.
     आमची शाळा या सगळ्यापासून नक्कीच दूर होती. रायगड त्यावेळच्या कुलाबा जिल्ह्यातील महाड हे आमचं गाव. मला गाव म्हणायला आवडेल कारण चहुबाजूनी डोंगरकड्यानी वेढलेलं, त्याला सावित्री गांधारी नदीचा किनारा. गावात असलेली चवदार तळे, काकर तळे, विरेश्वर तळे,. सगळी माणसं एकमेकांना ओळखत होती.
     मला आठवतंय माझी पहिली शाळा हि राम मंदिराजवळ होती, सध्या जिथे जोशी हॉस्पिटल आहे त्यावर एक मोठा हॉल होता. ती शाळा एसटी कर्मचाऱ्यांच्या महिला चालवत असत. या शाळेची वेळ फार मस्त होती, दुपारी १२ ते . मला इथे अभ्यास काय केला तो अजिबात आठवत नाही. पण या शाळेत मला पहिले मित्र मिळाले ते म्हणजे तुषार, प्रसाद, सुमंत . त्यावेळी घरी आल्यावर शाळेत काय शिकवलं, अभ्यास काय दिलाय असे प्रश्नच नसायचे. आपण आपलं आवरायचं आणि शाळेत जायचं, मजा होती हे मात्र खरं....
      खऱ्या अर्थाने शाळेची ओळख झाली ती १९७४ मध्ये.  सरेकर आळी मध्ये असलेली जिल्हा परिषद/ महाड नगर पालिकेची शाळा नंबर . आमचा जन्म ऑक्टोबर चा, त्यामुळे वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत घातलं गेलं. माझी मावशी आली होती सोडायला फक्त पहिला दिवस म्हणून. दुसऱ्या दिवसापासून काही जुने मित्र एकत्र शाळेत जायला लागलो. त्यात बरेच जण नवीन सामील झाले.  या शाळेची अशी एक शिस्त होती कदाचित ती त्यावेळच्या शिक्षकांमुळे असेल. मा. उमरठकर, शेठ, देशमुख गुरुजी तसेच वैशम्पायन, पोतदार, तांबे या शिक्षिका.
      शाळेत बसायला बाके काही नव्हतं. चक्क फरशीवर बसायचो. काही पुस्तके, हातात पाटी असं दप्तर. शाळेत जाताना डब्बा, पाण्याची बाटली असा सरंजाम तेव्हा नव्हता. घर जवळच असल्याने मधल्या सुट्टीत घरी यायचे, जे असेल ते खाऊन परत शाळेत. महाड जवळच्या गावातून खूप मुलं शाळेत होते, ते येताना गावचा खाऊ म्हणून तुरीच्या शेंगा, बोर, , आणायचे. शाळेचे वर्ग ते थी  मर्यादित विद्यार्थी, आमच्या सगळयांच्या पालकांना नावाने ओळखणारे शिक्षक. एक वर्ग एक शिक्षक अशी साधी सोपी वर्गाची मांडणी. सगळेच विषय चांगले शिकवले जायचे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, यासाठी शाळा झाडाने, सजवणे, रंगकाम हि तर खास कामे. थी ला असताना आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवून अभ्यास करून घेतला होता, काही मार्क्स नी संधी हुकली होती. आज या परीक्षेसाठी खूप सुविधा आहेत, पण खरंच ३६-३७ वर्षांपूर्वी हे कसं केलं असेल. आज या निमित्ताने या शाळेला तसेच त्या वेळच्या सगळ्या शिक्षकांना मानाचा नमस्कार.
        १९७८ साली वि. . परांजपे विद्यामंदिर मध्ये प्रवेश घेतला. एक ब्रिटिशकालीन, खूप छान वर्ग, त्याकाळी सर्व सुविधा असलेली शाळा. आम्हा सर्वांचे पालक पण या शाळेचे विद्यार्थी होते. जेव्हा ११ वी मॅट्रिक ची परीक्षा होती तेव्हा हि शाळा मुलं मुलींसाठी एकत्र होती, नंतर कन्या शाळा वेगळी झाली.
          ५ वी ते १० वी या शाळेत होतो. सुरुवातीचे काही दिवस थोडं वेगळं वाटत होत, कारण इंग्लिश, शास्त्र असे नवीन विषय, नवीन शिक्षक, . पण काही दिवसातच सवय होते तसंच झालं. त्यावेळेस नक्कीच शाळा लांब होती. रोज ११ ते अशी एकदम मस्त वेळ होती. सगळे शेजारचे मित्र एकत्र जायचो. जायचा रस्ता  सरळ होता, पण आम्ही घरातून निघून भाजी मंडई, कुंभार आळी ते शाळा . नाहीतर डोंगरी पूल, आज जिथे जत्रा भरते ते शेत, विरेश्वर देऊळ ते शाळा. गणवेशाची सक्ती होती, खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट. पण चप्पल बूट अमुकच पाहिजेत हे काही नव्हतं. अर्थात तेव्हा ते शक्यही नव्हतं. तसंच नवीन पुस्तक घेणं  हे परवडणार. माझ्या साठी तर अश्विनीची परीक्षा झाली कि दुसऱ्या दिवशी पुस्तक घरी घेऊन यायचो. हे अगदी पुढे बी.एस. सी पर्यंत चालू होत.
           या शाळेत आधी हि खूप चांगले शिक्षक होते उदा. खरे, परांजपे, जोगदेव. आम्ही असताना पण चांगले शिक्षक होतेच. संसारे, मोरे, गोरे, चांदे, गाडगीळ सर आणि चांदे, टिपणीस, जोशी, जोगळेकर मॅडम. विषय चांगला शिकवणे, शाळेचा इतिहास चांगले हुशार विद्यार्थी घडवून त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा होता. शिक्षक या वर एक वेगळा लेख होऊ शकतो. नुसतं अभ्यास करता चांगलं वर्तन कसं असावं, काय केलं पाहिजे हे पण शिकवलं. खप उदाहरण आहेत त्यासाठी. रोजची प्रार्थना, बुधवार वा शनिवार नख कापली का तसेच केस वाढले आहेत का हे बघणं (तेव्हा कदाचित राग यायचा या सगळ्याचा). सगळे विषय तर मस्त शिकवले जायचे. आठवतंय ते गाडगीळ सरांचा गणिताचा तास, टिपणीस मॅडम नि शिकवलेलं मराठी/हिंदी व्याकरण, गोरे सरांचा इंग्लिशचा तास, जेव्हा कोणी नसेल तर चक्रदेव सरानी सांगितलेल्या गोष्टी आणि कितीतरी ..... त्या सगळ्या शिक्षकांना नमस्कार.
 या वर्षात खूप मित्र मिळाले आणि ती मैत्री अजून हि टिकून आहे. खूप मजा पण केली या वयात, १०-१२ मित्र मंडळी एकत्र डब्बा ऐसपैस, घर समोर चवदार तळे त्यात पोहणे, सायकलिंग करायचो. झाडावरून कैऱ्या, पेरू काढणे, एवढच नाही तर रामफळ पण काढली होती.
तुषार, अविनाश, प्रसाद, अभय, महेश, सुमंत, तसेच वर्गमित्र पण खूप होते संदेश, संतोष, राजेश, संजय ..

      या शाळेत घडलेल्या मजेदार गोष्टी खूप आहेत. सगळ्या सांगणं शक्यच नाही. शाळेचे कोणी सभासद वा कोणाचं निधन झालं तर शाळेला सुट्टी मिळायची, एकदा शाळा भरली, लगेच सगळ्यांना परत क्रीडांगण वर बोलावून कोणाची तरी शोकसभा झाली आणि शाळेला सुट्टी म्हणून सांगितलं. एकाने कोणी तरी टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर प्रत्येक वर्गशिक्षकाने सगळ्या विद्यार्थ्यांना पट्टीचे असे फटके दिलेत, नंतर हि चूक कोणी करण शक्यच नव्हतं.
         एकदा एक सरानी वर्गात येऊन विचारलं कि तुमचा इतिहास कसा आहे बघू, तर एक मुलगा म्हणाला एवढे मोठे होऊन इतिहास माहित नाही का, पुढे काय झालं असेल सांगायची गरज नाही?
         पावसाळ्यात शाळेच्या ग्राऊंडवर खेळणे हि मजा तर काही वेगळीच होती. कारण सगळीकडे पाणी चिखल असायचे. तिथे खेळताना घसरणे, कपडे खराब होते हे नेहमीच.
            माझ्या शेजारी बसणारा मित्र एका इंग्लिश च्या तासाला "डिस्को डान्सर" सिनेमाची गाणी लिहीत होता आणि काही शब्द चुकला राहिला तर मला विचारत होता. जेव्हा एकदा मॅडम नी लिहिताना रंगेहाथ पकडलं तर सांगितलं कि उद्या दुसरी गाणी लिहितो.
         खरंच आज हे लिहिताना नक्कीच असं वाटतंय कि प्रत्येकानी जेव्हा मिळेल तेव्हा एकदा तरी आपल्या शाळेला भेट द्यावी.



मनोज करंदीकर
 

No comments:

Post a Comment