Sunday, September 30, 2018
नियति
आज बऱ्याच दिवसांनी थोडी निवांत झाली होते , सहज मनात विचार येत होते ते आयुष्यातल्या वाटचालीचे, स्वतःचीच स्वतःला ओळख पटवून द्यायची व्यर्थ खटाटोप चालली होती . मनात विचारांचा काहूर माजला होता नि त्यातूनच जाणवत होते की किती कठीण आहे जगणे. अचानक मनाने ताबा घेतला तो भूतकाळाचा , त्या भूतकाळातल्या आठवणीतले एक व्यक्तिमत्व होते आमचे "दादाजी".
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका अन त्या तालुक्यातील एक खेडेगाव शिरगाव. आज प्रतिशिर्डी म्हणून ते प्रसिद्ध आहे हे गाव . तळेगाव ( दाभोडे) कडे जाताना लागतो तो सोमावो फाटा , फाट्यावरून आत काही अंतरावं वसलेले हे एक गाव. माझ्या आठवणीतल्या आत्याचे गाव , अर्थात आता खूप काही बदलले आहे , पण माझ्या आठवणीत अजूनही जिवंत आहे ते सुमारे ३५ वर्षापूर्वीचे खेडे गाव , मातीचे रस्ते त्या रस्त्या वरून ये - जा करणाऱ्या बैल गाड्या , एखाद दुसरी दुचाकी गावात वीज नसल्यामुळे संध्याकाळ झाली की घरा घरात टिमटिम प्रकाश देणारे कंदील. सगळीच घरे कौलारू , जमिनी शेणाने सारवलेल्या.
पवणा नदीचा प्रवाह गावातूनच वाहत असे , नदीच्या काठापासून अगदी पन्नास पावलावर आत्याचं घर . चार गुंठ्यात बांधलेलं मातीच्या विटांचा ते कौलारू घर , घरा समोर भली मोठी ओसरी , घराला लाकडी दरवाजे , त्यांना लोखंडी सळ्यांच्या कडया, आत भले मोठे दालन त्यातच दोन्ही बाजूला समोरासमोर मातीच्या पचण्या बनवून तयार केलेली माडी ; माडीत सामान ठेवलेले असायचे ते म्हणजे गुरांचा कडबा (चारा ) , शिवाय चूलीसाठी लागणारे सरपण ( झाडांच्या सुख्या फांद्या ) , शेणाने बनवलेल्या गवऱ्या .
दुसऱ्या दालनात प्रवेश केला की दिसायचे पितळेची चकाकणारी भांडी , मोठे मोठे हंडे , कळश्या . विशेष करून ह्या दालनाच्या एका भिंतीला लावलेली असायचे मातीच्या घागरीची चवडी , एकावर एक घागरिंचा थर अश्या सात ते आठ रांगा भिंती लगत असायच्या. एका बाजूला भला मोठा मातीचा पिंप , जे कणगी या नावाने प्रचलित आहे त्यात वर्षभराचे धान्य साठवले जाते.
दुसरे दालन ओलांडले कि तिसरे माजघर , तिथे एका कोपऱ्यात मांडलेली असायची मातीची चूल आणि चुलीच्या बाजूला काही अंतरावर न्हाणीघर (बाथरूम ) बाजूला लाकडी दरवाजा आणि त्या बाहेर भली मोठी पडवी , गुरांचा गोठा ( गाय , बैल , म्हैस इ. जनावरांची राहण्याची सोय )
एकत्र कुटुंब पध्दतीत साकारलेले हे घर लहानांन पासून ते थोरांपर्यंत २५ माणसांचे वास्तव्य आणि या सर्वांवर देखरेख करणारी एकच व्यक्ती आणि ती म्हणजे माझ्या आत्याचे यजमान "दादाजी ". साधारण पासष्टी ओलांडलेले , पोषाख पांढरी बंडी , पांढरे धोतर तसेच डोक्यावर पंधरा फेटा खांद्यावर उपरणे सतत ओसरीवर घोंगडी अंथरून मांडी घालून बसलेले असल्याचे आमचे दादाजी. घोंगडीच्या बाजूला नेहमी एक काठी असे , असो दादाजींचं वर्णन करता करता पूर्ण देखावाच डोळ्या समोर उभा राहिला आणि मनाला न आवारात त्या देखाव्याचे वर्णन केले .
उन्हाळ्याची अर्थात मे महिन्याची सुट्टी सुरु झाली की मी वडिलांकडे हट्ट करायचे की मला गावी पोहचवा , माझा हट्ट देखील पुरा केला जात असे , लहानपणापासूनच मला गावची ओढ इतर भावंडान पेक्षा जास्तच होती . साधारणपणे नववी पर्यंत माझी दरवर्षी गावाला भेट असायची महिना महिना वास्तव्य असायचे नि आदेशाचा डोस मिळायचे ते दादाजीं कडून , ते त्यांचे अनुभव आम्हाला सांगायचे त्यातूनच आम्हाला उपदेश करायचे ,त्यावेळेस अल्लड होतो पण त्यांच्या धाकापोटी का होईना त्यांच्या समोर जाऊन बसायचो.
"ममईची (मुंबईची) पोर आली का ? मग काय लागली का सुट्टी ? साला (शाळा ) काय म्हणती ? अभ्यास करती का खाती धपाट ? काय हो दादाजी मी काय ढ वाटले तुम्हाला ? एकतर वर्षभर अभ्यास करायचा हीच तर सुट्टी मिळते मज्जा करायला ....... माझे आपले उगाच रागावणे .....
तस नाय इथे तुझं आई बाप नाय , इसवासान धाडत्यात आमच्याकड उगाच कालवा नको , चार गोष्टी आमीबी तुला शिकवायला हवं , पोरीची जात तू जपावं लागतंय ......... सखे (बायकोला हाक मारायचे ) पोर आलीय सुट्टीला चांगलंचुंगलं खायला घाल तिला . जरा आपल्या शेतातल काम शिकिव , दाव तिला नदीवरून पाणी कस वाहत्यात , डोक्यावर हंडे कास धरत्यात ,इतालच पोरगा बघू नि देऊ लावून तीच लगीन , कुणी बोलायला नको पोरगी शिकली पण हुकली ......... एवढे बोलून जोरजोरात हसत , माझं मात्र हे सगळं ऐकून तिळपापड होत असे . . मनात मी म्हणे , बोला काय बोलायच ते बोला एकदा का आम्ही सगळी मुले जमा झालो कि कोण ऐकतय तुमचं आम्ही करू मज्जा .
...
गावात घर रस्त्यावरच असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला दादाजी हाक मारीत. राम राम , या ता वाईस बसा मंग पुढ जा.. सखे ..च्या (चहा) टाका पावण्यांना, मग काय दिवसभर ते चहाचं पातेलं चुलीवरून ढळत नसायचे. कोणी न कोणी राम राम करीत यायचा नि चहाचा स्वाद घेवून पुढे जायचा. अख्या गावात त्यांचा दबदबा होता, गावकरी त्यांना खूप मान देत. घरात सुमारे ५०-६० म्हशी, ५ जरशी गाई, चार बैल, दुधाचा व्यवसाय शिवाय भरघोस जमीन . पण येवढं असून ते मात्र फारसे शिकलेले नव्हते. थोडं फार लिहिता वाचता येत होतं त्यांना. असाच एका रात्री त्यांनी आम्हां पोरांनाएकत्र केलं आणि म्हणाले " दिसभर गावं धुनाडलाय, या आता वाईच बसा इकडं, पोरांनो तुम्हाला गोस्ट आईकायाची का नियतीची". त्यांच्या भाषेची लकब काही वेगळीच होती , मला खूप आवडायची, त्यात ते गावरान शब्द, कधी कधी मला अर्थ समजून घ्यावा लागायचा मला. तसच त्यांच्या " नियती" हा शब्द देखील नवखा होता मला त्या वयात समजायला...
पण त्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आम्हांला.
त्याच गावाचा सरपंच , त्याचं घर बीआमच्यावाणीच खटल्याच, दुध दुभत्यांन भरलेलं, मॉप जमीन लोकांची लुबाडलेली, पैका अडका भारी, त्याला चार पोरं, कारभारीण तर दागिन्यांनी मढलेली
जमीन जुमला पैका समद असून बि जपायची अक्कल नव्हती, कधी लक्षच दिलं न्हाय घराकडं
पर शिरमंतीची लई घमंड त्यांना, येता जाता गडी माणसांचा पाणउतारा करायचा, अडला नडला दिसला कि त्याचा फायदा घ्यायचा नि थोडं पैकं दिऊन त्याची जमीन घ्यायची ताब्यात, त्या येळाची लोकं भाबडी , त्यांना वाटायचं ह्यो आपल्याला गरजला मदत करत्योय . पर ह्यो पठ्या लय सोकावलेला . ह्याची कारभारीण गावाच्या बाय बापड्यांना आपल्या शेतात राबू राबू घ्यायची नि पिक आली कि चार दाणं टाकायची त्यांच्या पदरात. त्यांना वाटायचं आप्ल्यावानी कुणी न्हाय . मॉप हाय आपल्याकडं, चार चार पोरं हायत आपल्याला . काय बी कमी न्हाय.कशाचंच भ्यां नव्हतं त्यांना. . पर पोरांनो नियतीचा घाला भल्या भल्यांनाचुकला न्हाय. लई लोकांना लुबाडलं, कमी ल्याखलं, लई माज क्येला सिरमंतीचा, पर दिस त्येचं राह्यलं न्हाय.त्ये बी बदललं, पोरं कळती झाली
तशी लागली वाईट चालीला , याक धड न्हाय निघालं , बापानं जेवढं कमावलं ते लागली गमवाया. आय बापाचं काय बी ऐकायचि न्हाइत...येका पोरांन तर बाप ऐकत न्हाय म्हणून घातली काठी त्याच्या कंबरडयात नि मोडलं बापाचं कंबरडं , झालं लुळ ब्यानं.. नि पडलं येका जागेवर .. पार माज उतरला सिरमंतीचा, म्हातारी लागली जायला लोकांच्या श्यातात बिगारीवर , चार पोरंचारी दिसेला गेली. आजच्या वगताला दोघं नवरा बायको गावकऱ्यांच्या तुकड्यावर जगत्यात, देवाकडं मरान मागत्यात.........
एवढे बोलून दादाजी गप्पा झाले. आम्ही देखील त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते रंग पाहून स्तब्ध झालो. अचानक ते मोठ्या मोठ्याने हसू लागले. " तर पोरांनो काय? समजलं का? देवांन दिलाय ते जपून खा , उतमात करू नगा.आज हाय त्येच उद्या राहील ह्याची काय बी ग्यारंटी न्हाय. मानसाचा जनम एकदाच मिळतोय. सोताच्या स्वर्थापाई कुणाचं नुसकान करू नगा.गरिबी आली तर लाजू नगा नि शिरमंती आली तर माजू नगा.ज्ये पेरलं त्येंच उगवत असतंय येखाद्याला दुख दिलंततर समजा तेच पुढ त्येच तुमच्या नशिबाला आल्यावाचून राहायचं न्हाय.नियतीचा फेरा कुणाला बी चुकला न्हाय.आपल्या कर्माचं आपल्या पोरांना भोगावं लागतय...येवढ लक्षात ठिवा देवाला बी भोग चुकलं न्हाय मग आपण तर माणसच.
तर पोरांनो आज तुम्ही समदी जाणती हात..
एक लक्षात राहूद्या . कुणावर अन्याय करू नका.नाय्याने वागा नि कुणाचा अन्याय बी सहन करू नका.अन्याय करणारा नि त्यो अन्याय सहन करणारा दोघं तेवढंच पापी.नियतीन वागा म्हंजी देव बी तुम्हाला मदत करील.
दादाजींचे ते शब्द आजही माझ्या मनावर बिंबले गेलेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दादाजींनी केलेल्या उपदेशांची प्रचीती आलीय खरी...नियत सोडून वागणाऱ्यांचे, भल्या भल्यांचे हाल ह्या डोळ्यांनी पाहिलेत. खरे आहे "नियती" कोणाला सोडत नाही आणि चांगल्या नियतीने वागणाऱ्यांना परमेश्वर मदत केल्याशिवाय राहत नाही... "दादाजी" कळत नकळत चांगले संस्कार मात्र करून गेले....

Saturday, September 29, 2018
अविस्मरणीय विस्मरण..
तसं बघायला गेलं तर विसराळूपणा म्हणजे मोठा
त्रासच. पण ह्यातून ज्या गमतीजमती निर्माण होतात ना त्या आठवल्या की आपल्या वेंधळेपणावर
हसूच येते… अणि मग त्यांच्या बनतात अविस्मरणीय आठवणी.
असं म्हणतात की कलाकार मंडळी विसराळू असतात
कारण ती त्यांच्याच दुनियेत रममाण असतात.. पण माझ्या मते विसरभोळेपणा काही कुणा एका
वर्गाची मक्तेदारी नाही.
आता आमचंच घ्या ना.. नवीन लग्न झालेलं.. एकदा रात्री जेवणानंतर पिक्चर बघायला जायची हुक्की आली. मग काय काढली गाडी, अणि निघालो. ह्यांना एक मेल करायचा होता म्हणुन सायबर कॅफेमध्ये गेलो.. पटकन मेल करुन पिक्चरला गेलो.. मस्त होता पिक्चर.. हीरो हिरॉईनच्या गप्पा मारत घरी आलो… अणि दार उघडायला गेल्यावर लक्षात आले.. किल्ली?. . किल्ली कुठाय.. घाईत निघाल्याने पर्स न घेता हातातच किल्ली ठेवली होती अणि आता ती त्या सायबर कॅफेमध्ये विसरले होते.. झाले..म्हणजे बसा आता सकाळी तो सायबर कॅफे उघडण्याची वाट बघत. रात्रीच्या दीड वाजता डोक्याला हात लावायची वेळ आली होती.. पण असे हातावर हात धरून बसणारे आम्ही कुठले.. घर सुदैवाने टॉप फ्लोरला असल्याने सुदैवाने मोठी ओपन बाल्कनी होती.. अणि सुदैवाने तिथे बाहेरून कुलूप लावलेले नव्हते (विसराळू असलो तरी सुदैव बलवत्तर असते).. ह्यांनी टेरेसवरून बाल्कनीत उडी मारून काहीतरी खटपट करून बाल्कनी चे दार उघडले अणि रात्री 3 वाजता माझा गृहप्रवेश झाला. हुश्श..
शेवटी धमाल मस्ती करत लॉजवर पोहोचले अणि बॅगा
उघडून बघतात तर काय.. गड्याने चुकून दुसर्याच बॅगा गाडीत ठेवल्या होत्या.. मूळ सामानाच्या
बॅगा घरीच राहिल्या होत्या.. गप्पांच्या नादात सगळे बॅगा चेक करायला विसरले होते..
कपाळावर हात मारून घेण्या शिवाय दुसरे तरी काय करणार..
काही जणांकडे
मात्र नसतात अशा आठवणी.. अशा लोकांचा हेवा करावा की कीव कळत नाही .. जाऊ दे ना.. जास्त
विचार नको करायला नाहीतर माझेच मौल्यवान विचार मी विसरून जाईन. 😀
महाराष्ट्राचे आहारयुध्द.
स्थळ: गोदावरी काठी , महाराष्ट्रात कुठेतरी.
सर्व बाजुला हिरवीगार उभ्या पिकांची मैदाने ,बाजुला दुथडी वाहनारी गोदावरी व मोकळ्या मैदानात आमनेसामने उभे ठाकलेले प्रचंड सैन्य.दोन्ही बाजुला रथावर वजनदार सेनापती होते. एकाच्या रथावर RD लिहीले होते तर दुसर्याच्या रथावर JD. दोन्ही सैन्यांमध्ये महाराष्ट्र भरातुन आलेले व्हाट्सअप ग्रुप चे गटप्रमुख,स्वयंघोषीत आहार तज्ञ , वजनाने व विकारांने बेजार झालेले पांढरपेशे लोक सामिल होते.काही कुडमुडे सुध्दा भविष्यात डायटींगची गरज पडलीच तर माहिती हवी म्हणून वजनदार तलवारी कशातरी पेलत एखाद्या समुहात सामील होते.
गंमत म्हणजे सर्व वयांच्या व विविध आकारांच्या महिला सैनिकांची संख्या लक्षणीय होती.
या गर्दीत गरिब कष्टकरी आभावानेच दिसत होता.
यातच,काय सुरु आहे हे पाहायला सोम्या - गोम्या या गर्दीत सहभागी झाले पण त्यांना कशासाठी युध्द तयारी सुरु आहे काहीच कळेना. न राहवुन त्यांनी एका भराभरा बकने कोंबत असलेल्या ढेरपोट्याला विचारले तेंव्हा तो जोरात खेकसला. ‘ ५५ मिनीटे संपायला १० मिनीटे बाकी आहेत. जरा वेळाने या’.
सोम्या - गोम्या अजुन चक्रावले . ते विरोधी गटात घुसले व तिथे एकाला विचारले. तो पण उत्तर देण्या ऐवजी ‘ माझी २ तास संपलीत मला काहीतरी खाल्लेच पाहीजे म्हणून ‘ तरातरा निघुन गेला.
सोम्या-गोम्यांना काही कळण्याच्या आतच ‘ यल्गार’ झाला व दोन्ही बाजुंचे सैन्य तुटुन पडले.RD गटातील सैनिक दर २ तासांना चरता चरता चढाई करत होते तर JD गटातील ५५ मिनीटा दरम्यान शत्रुने काहीही केले तरी मुग ( किंवा काहीही) गिळुन गप्प होते!
यात काही धुर्त गटबदलु तळ्यात मळ्यात करत दर दोन तासांनी ५५ मिनीटे खात होती.
अखेर दोन महिन्याने अनिर्णीत अवस्थेत युध्द संपले.
अन्नाच्या दुर्भिक्षा मुळे वाचलेल्या सैन्यांना जेमतेम दोन वेळचेच खायला मिळायला लागले. युध्दात परिश्रम झाल्याने बर्याच जनांना आपली जुनी फिगर गवसली होती. काहींनी BP, कोलेस्ट्रॉल, शुगर चेक केली व त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण कमी जेवन किंवा शारिरीक परिश्रम अशा फुटकळ गोष्टींना श्रेय द्यायला कोणी तयार होईना.
काही दिवसांनी सोम्या - गोम्या सैनिकांच्या विरकथा फेसबुक वर वाचु लागले. प्रत्येक जन आपलीच रण( आहार) निती कशी योग्य हे पटवन्यासाठी ‘ युध्दा पुर्वी- युध्दा नंतर’ असे फोटो टाकु लागले.वाद परत वाढत चालला होता.
त्यातच SD नावाचा नविन आहार तज्ञ नवा कोरा डायट प्लॅन घेउन आला ‘ एक दिवस पाहिजे तेवढे खा दुसर्या दिवशी पुर्ण उपवास करा, २ आठवड्यात १० किलो वजन कमी होणारच!’
त्याचेही समर्थक वाढु लागले.
दुसर्या आहार युध्दाच्या ठीणग्या परत पडतायत हे सोम्या - गोम्या ने ओळखले!!
-डॉ. अभिजीत लोणीकर
अबुधाबी.
[ उदघोषणा:लेखकाचा व डायटिंगचा दुरान्वये संबंध नाही व तो कुठल्याही डायट प्लान वर नाहीये.कथेतील नावे काल्पनिक नसुन जानकारांनी त्याचा योग्य संबंध लावावा!]
विविध रूपे माय मराठीची
भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच,
मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते.आपण ज्या भागात राहतो, त्या राज्याचा आणि परिसराचा आपल्या
मराठी बोलण्याच्या पद्धती वर परिणाम होत असतो. त्यामुळे कुठे बाहेर राहत असताना कोणी मराठी बोलताना दिसलं कि पहिला प्रश्न येतो " कुठली मराठी ".
मराठी भाषा, व्याकरण एकच असलं तरी गावांनुसार त्याच नांव बदलत. उदा. कोकणी मराठी, अहिराणी मराठी, नागपूरी
मराठी, कोल्हापूरी मराठी आणि अजून किती तरी. ह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले
अनेक शब्द आलेले
दिसतात, जे
लहान शब्दकोषात
सापडतीलच असे नाही. भाषा कोसांवर बदलते तर
कधी फर्लांगा वर बदलते.
मुंबई ची भाषा आता सरमिसळ झाली आहे. त्यात हिंदी भाषिकांना समजावे असे शब्द दिसतात. कोकण भागात ज्या प्रमुख
भाषा बोलल्या जातात त्या म्हणजे आगरी, कोकणी, मालवणी. तरी ही यामध्ये जिल्ह्यावर काही फरक पडतोच. मुंबईहून आपण निघालो गोव्याला जाण्यासाठी तर याचा छान प्रत्यय येतो.
आमच्या इकडे रायगड जिल्ह्यात आपल्या मित्राशी बोलायची सुरुवातच " काय रे " अशी होते. माझे किती तरी मित्र मैत्रिणी आजही अगदी सोशल मीडिया वर जरी भेटले तरी पहिला प्रश्न हाच असतो
" काय रे, कसा आहेस रे?"
थोडे पुढे गेलो तर
आपल्याला हेल काढून काढून बोलणारा भेटतो. मला स्वतःला काही शब्द खूप आवडतात. ते म्हणजे आपण " तसं नाही"
असं म्हणतो पण रत्नागिरी जिल्ह्यात " तसं नव्हे" म्हणतात. अजून एक खास गोष्ट, खूप दिवसांनी जर
कोणी भेटले तर " मेल्या आहेस कुठे तू"? आणि मग सुरु होतेती मालवणी. या भाषे बद्दल काय बोलणार? गंगाराम गवाणकर,
मच्छिन्द्र कांबळी या दोघांनी " वस्त्रहरण " नाटक देऊन मालवणी भाषा किती समृद्ध आहे हे दाखवून दिलंय.
कोल्हापुर भागात बोलली जाणारी कोल्हापुरी बोली आहे. बोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही गरीब, खेडवळ, अस्सल
शेतकऱ्याची बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब याभागात आढळते. भाषेत रांगडेपणा आणि प्रेमळता असते.
मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून
ओंळखली जाते,
नागपूरी भाषेच्या उल्लेखा शिवाय विषय पुरा होणे नाही. एका वाक्यात दोन क्रियापद एकत्र करून बोलणे" काय करून राहिल
बे तू ?" आमच्या एका सरांकडे कधी गेलो कि ते "बैस" म्हणायचे, खूप दिवस ते कळतंच नव्हतं, नंतर समजलं की बोलायची
पद्धत आहे.
वऱ्हाडी, मालवणी, खानदेशी, अहिराणी, नागपुरी आदी बोलीभाषा ही मराठी भाषा समृद्ध करणारी सौंदर्यस्थळे आहेत.
महाराष्ट्रात बोलीभाषांचा मोठा विविधढंगी फुलोरा पाहायलामिळतो.
हल्लीच्या दूरदर्शन मालिका किंवा चित्रपटांमुळे काही काही शब्द आपण तसेच्या तसे घेतले आहेत. उदाहरण द्यायचं झाले तर,
"लय भारी ",
"चालतंय की", "काय राव " आणि खूपखूप. ते कुठून आले यापेक्षा ते शब्द आपले झाले.
या सगळ्या भाषांचे प्रकार, बोलीभाषेचे आणि आपल्या सगळ्यांना समजावून सांगणारे साहित्यिकांचे असंख्य उपकार आहेत.
अगदी बहिणाबाईंपासून ते नारायण सुर्वे आणि अजूनकितीतरी. एका भाषे बद्दल लिहावंच लागेल ती म्हणजे "बेळगावी" .हि
भाषा कोकणी, कोल्हापुरी, कन्नड यांचं सुंदर मिश्रण आहे. पु.ल. नी रंगवलेला "
रावसाहेब" चांगलाच लक्षात
राहिलाय. अलिकडे
प्रकाश संत यांचा "वनवास, पंखा "
असा चार पुस्तकांचा संच प्रकाशित झाला , त्यांचा हिरो " लंपन " बेळगावी च आहे.
अनुभव, आवडलेला आणि जिथे आगरी भाषा बोलली जाते तिथला एक किस्सा जो सर्वत्र बघायला मिळतो. शाळेत
जाणे महत्वाचे असतेच पण त्या जोडीला वडिलांना त्यांच्यापारंपरिक व्यवसायात मदत करणे. दोन्ही करताना त्या मुलाची
कशी गम्मत (कसरत) होते. मास्तर & तो मुलगा यांचे संवाद
मी चवतीन होतो.
सकाली उटलो. आंग धवला. च्या न बटर खाल्ला.
पलत शालन झेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायपुन दिसना.
कसातरी खाली बसलो. हजेरी चाल्लीवती.
मास्तर वरडलं
"आत्ताच आयलो न" मी
"हं दिसतय मना."
"पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं
" अर तुझ्या उट न कालचा धरा वाचुन दाकीव. "
माजे पोटान गोला उटला. चवतीन होतू तरी वाचाला जमत न्हवता. मी उबाच.
"काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्या" मास्तर
"बापासचे बरब खारीवर कोलब्या न चिम्बोर्या पकराला जेलेलो."
"बापासला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय क समजला ?"

या सगळ्या बोली भाषा, त्यांचा लहेजा, तो बाज आपण सगळ्यांनी जपावा, तर या भाषांना परत एकदा बहर येईल.
मनोज करंदीकर
Subscribe to:
Posts (Atom)