Saturday, September 29, 2018

विविध रूपे माय मराठीची


भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच
मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते.आपण ज्या भागात राहतोत्या राज्याचा आणि परिसराचा आपल्या
 मराठी बोलण्याच्या पद्धती वर परिणाम होत असतोत्यामुळे कुठे बाहेर राहत असताना कोणी मराठी बोलताना दिसलं कि पहिला प्रश्न येतो " कुठली मराठी ".  मराठी भाषाव्याकरण एकच असलं तरी गावांनुसार त्याच नांव बदलतउदाकोकणी मराठीअहिराणी मराठीनागपूरी
 मराठीकोल्हापूरी मराठी आणि अजून किती तरीह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले
 अनेक शब्द आलेले दिसतात,  जे लहान शब्दकोषात  सापडतीलच असे नाहीभाषा कोसांवर बदलते तर  कधी फर्लांगा वर बदलते.

मुंबई ची भाषा आता सरमिसळ झाली आहेत्यात हिंदी भाषिकांना समजावे असे शब्द दिसतातकोकण भागात ज्या प्रमुख
 भाषा बोलल्या जातात त्या म्हणजे आगरीकोकणीमालवणीतरी ही यामध्ये जिल्ह्यावर काही फरक पडतोचमुंबईहून आपण निघालो गोव्याला जाण्यासाठी तर याचा छान प्रत्यय येतो.

आमच्या इकडे रायगड जिल्ह्यात आपल्या मित्राशी बोलायची सुरुवातच " काय रे " अशी होतेमाझे किती तरी मित्र मैत्रिणी आजही  अगदी सोशल मीडिया वर जरी  भेटले तरी पहिला प्रश्न हाच असतो  " काय रेकसा आहेस रे?"  थोडे पुढे गेलो तर

 आपल्याला हेल काढून काढून बोलणारा भेटतोमला स्वतःला काही शब्द खूप आवडतातते म्हणजे आपण " तसं नाही" असं म्हणतो पण रत्नागिरी जिल्ह्यात  " तसं नव्हेम्हणतातअजून एक खास गोष्टखूप दिवसांनी जर  कोणी भेटले तर " मेल्या आहेस कुठे तू"? आणि मग सुरु होतेती मालवणीया भाषे बद्दल काय बोलणारगंगाराम गवाणकर,
 मच्छिन्द्र कांबळी या दोघांनी " वस्त्रहरण " नाटक देऊन मालवणी भाषा किती समृद्ध आहे हे दाखवून दिलंय.

कोल्हापुर भागात बोलली जाणारी कोल्हापुरी बोली आहेबोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही गरीबखेडवळअस्सल
 शेतकऱ्याची बोली आहेलय काढून बोलण्याची लकब याभागात आढळतेभाषेत रांगडेपणा आणि प्रेमळता   असते.  मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून  ओंळखली जाते,

नागपूरी भाषेच्या उल्लेखा शिवाय विषय पुरा होणे नाहीएका वाक्यात दोन क्रियापद एकत्र करून बोलणेकाय करून राहिल
 बे तू ?" आमच्या एका सरांकडे कधी गेलो कि ते "बैसम्हणायचेखूप दिवस ते कळतंच नव्हतंनंतर समजलं की बोलायची
 पद्धत आहे.

वऱ्हाडीमालवणीखानदेशीअहिराणीनागपुरी आदी बोलीभाषा ही मराठी भाषा समृद्ध करणारी सौंदर्यस्थळे आहेत
महाराष्ट्रात बोलीभाषांचा मोठा विविधढंगी फुलोरा पाहायलामिळतो.

हल्लीच्या दूरदर्शन मालिका किंवा चित्रपटांमुळे काही काही शब्द आपण तसेच्या तसे घेतले आहेतउदाहरण द्यायचं झाले तर,

 "लय भारी ", "चालतंय की", "काय राव " आणि खूपखूपते कुठून आले यापेक्षा ते शब्द आपले झाले.

या सगळ्या भाषांचे प्रकारबोलीभाषेचे आणि आपल्या सगळ्यांना समजावून सांगणारे साहित्यिकांचे असंख्य उपकार आहेत.

 अगदी बहिणाबाईंपासून ते नारायण सुर्वे आणि अजूनकितीतरीएका भाषे बद्दल लिहावंच लागेल ती म्हणजे "बेळगावी" .हि भाषा कोकणीकोल्हापुरीकन्नड यांचं सुंदर मिश्रण आहेपु.नी रंगवलेला " रावसाहेबचांगलाच  लक्षात राहिलाय.  अलिकडे  प्रकाश संत यांचा "वनवासपंखा "  असा  चार पुस्तकांचा संच प्रकाशित झाला ,  त्यांचा हिरो " लंपन " बेळगावी  आहे.

अनुभवआवडलेला आणि जिथे आगरी भाषा बोलली जाते तिथला एक किस्सा जो सर्वत्र बघायला मिळतोशाळेत 

जाणे महत्वाचे असतेच पण त्या जोडीला वडिलांना त्यांच्यापारंपरिक व्यवसायात मदत करणेदोन्ही करताना त्या मुलाची 
कशी गम्मत (कसरतहोतेमास्तर & तो मुलगा यांचे संवाद

मी चवतीन होतो.
सकाली उटलोआंग धवलाच्या  बटर खाल्ला.
पलत शालन झेलोउशीर झाल्तामास्तरनी झनकन कानाखाली पेटवलीपाच मिन्टं अन्दारकायपुन दिसना.
कसातरी खाली बसलोहजेरी चाल्लीवती.
 
मास्तर वरडलं
"
आत्ताच आयलो मी
"
हं दिसतय मना."
"
पुस्तकं कारा साल्यावहजेरी झल्याव मास्तर परत वराडलं
"
 अर तुझ्या उट  कालचा धरा वाचुन दाकीव. "
माजे पोटान गोला उटलाचवतीन होतू तरी वाचाला जमत न्हवतामी उबाच.
"
काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्यामास्तर
"
बापासचे बरब खारीवर कोलब्या  चिम्बोर्या पकराला जेलेलो."
"
बापासला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय  समजला ?"

या सगळ्या बोली भाषा, त्यांचा लहेजा, तो बाज आपण सगळ्यांनी जपावा, तर या भाषांना परत एकदा बहर येईल.


मनोज करंदीकर 


 
 

 
 

 
 

 
 
 

No comments:

Post a Comment