Saturday, September 8, 2018

पुस्तक परीक्षण :- ऑपरेशन डीप स्ट्राईक


ऑपरेशन डीप स्ट्राईक
लेखक: राहुल बदामी
प्रकाशक: लेखक स्वतः
पाने: २८९
प्रकाशन: सन २०१७
भाषा: इंग्रजी

            भारताचे नवीन पंतप्रधान, इनामदार, पाकिस्तानच्या दक्षिण किनाऱ्यावर  छुपा हल्ला करायला परवानगी देतात. लक्ष्य? बाबर ३ क्षेपणास्त्रे . हल्ला करणाऱ्यांचा नायक आहे अरमान अहमद आणि त्याचे सहकारी आहेत बलदेव, रोशन व हितेश.या ऑपरेशनचालवकरच बोजवारा उडतो आणि त्यांना खोलात शिरावं लागतं. पाकिस्तान मध्ये चार मोठ्या अतिरेकी संघटना /११ पेक्षा मोठा हल्ला करण्याचा उद्देशाने एकत्र आल्या आहेत.
           बाबर ३ हे लक्ष्य का आहे? ऑपरेशनचा बोजवारा का उडतो? ते पकडले जातात का?  त्यांना यश मिळेल का? त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कामावर खुश आहेत का? अतिरेक्यांची नक्की काय योजना आहे?
          भारतीय स्ट्राईक टीम मध्ये चार पात्रे आहेत. अरमान हा नेता, बलदेव हा त्याचा विश्वासू सहकारी , रोशनची त्याच्या वरिष्ठांनी चांगल्या कामाबद्दल निवड केली आहे पण पूर्वानुभवमुळे अरमानचा त्याच्यावर विश्वास नाही. हितेश तज्ञ आहे.
          पाकिस्तानमधील मिशन ही या पुस्तकाची कथा आहे. साधारणत: अशा पुस्तकांमध्ये मिशनची पार्श्वभूमी  असते, त्याची पूर्वतयारी असते आणि मिशन हा या पुस्तकाचा एक भाग असतो. पण हे पूर्ण पुस्तक हे मिशन आहे. त्यामुळे कारवाई व परिसीमा पूर्ण पुस्तकभर चालू असते. शेवटी जर अतिरेक्यांचे इप्सीत साध्य झाले ते जगाचा इतिहासच बदलून जाणार असतो.
         पाकिस्तान मध्ये मिशन हे एक जबरदस्त कथाबीज आहे. जेंव्हा त्याच्या जोडीला चांगली कथा, योग्य मात्रेमध्ये तणाव, युद्ध , कारवाई, नाट्य आणि वरून हेरगिरी असेल तर ते पुस्तक यशस्वी होणार यात वादच नाही.

      परंतु या पुस्तकात दोष पण आहेत:

    १.       जरी मिशन साठी त्यांनी टोपणनावे घेतली असली तरी ते फोन व सटकॉमवर खरी नावे वापरतात. जरी त्यांचे फोन खात्रीचे असले तरी खरी नावे वापरण्याने ऑपरेशन अयशस्वी होऊ शकते.
   २.       २. भारतीय सैनीक संपूर्ण पाकिस्तान फिरतात. अतिरेकी मोठा कट रचतात.क्षेपणास्त्र तळावर हल्ला होतो. क्षेपणास्त्र सोडली जातात पण पाकिस्तान या सगळ्यावर ताबडतोब कारवाई करत नाही. काही गोष्टी तर त्यांना कळत पण नाहीत. पाकिस्तान सरकार विदुषकासारखे दिसते. भारतीयांना सगळ्या गोष्टी खूप सहज जमतात.
   ३.       काही प्रश्न अनुत्तरीत रहातात. त्यांनी गाडी का सोडली नाही? सापळा त्यांच्या लक्षात कसा आला नाही? वगैरे.
          समुद्रामध्ये वादळात हेलोकॉपटर मधून पाणबुडीवर उतरण्याचा थरारक प्रसंग उत्तमरीत्या रंगवला आहे. हाच प्रसंग पुस्तकाच्या मुखपृष्टावर वितारला आहे. पुस्तकासाठी हे मुखपृष्ठ अतिशय योग्य आहे.
        १९४६ साली झालेला आरमाराचा उठाव हा भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होण्यामध्ये शेवटचा घाव ठरला हे मला माहिती नव्हते. लेखकाने जर या पुस्तकात मिशनचा नकाशा दिला असता तर बरे झाले असते. मी हे पुस्तक वाचताना भूगोल समजण्यासाठी सारखा गुगल मॅप बघत होतो.
        पुस्तकाच्या शेवटी पुढच्या पुस्तकाचे सुतोवाच केले आहेत. चीन मध्ये मिशन. मी पुढच्या पुस्तकाची नक्की वाट बघेन.


 मी हे पुस्तक का वाचले ?                    पाकिस्तान मध्ये मिशन
काय आवडले नाही ?                           राहून गेलेले दोष.
काय आवडले ?                                     तीव्रता.

शिफारस                      लेखकाने उत्तम लिहलेले पुस्तक आणि रोमांचकारी नाट्य. जरूर वाचा 



मंदार आपटे.




 

No comments:

Post a Comment