महाराष्ट्र मंडळ
अभिमान आहे मला मराठी असण्याचा,
संस्कृती आणि परंपरा जपायला आधार मिळाला
महाराष्ट्र मंडळाचा.
सात समुद्रा पार आलो घरदार सोडून,
प्रगती च्या दिशेने आलो देशाचा उंबरठा ओलांडून.
देशाबाहेर आल्याशिवाय जाणीव झाली नाही परंपरा आणि
संस्कृतीची,
इकडे आल्यावर मिळाली माहिती महाराष्ट्र मंडळाची.
मंडळ चालवतात सगळे एकमेकांच्या साथीने,
जणू छोटा महाराष्ट्रच वसला आहे मंडळाच्या रुपाने.
दरवर्षी मंडळाचा कारभार सांभाळते एक नवीन
कार्यकारिणी समिती,
सगळ्यांना संधी देत असते मंडळाची विश्वस्त समिती.
कार्यकारिणी समिती ची सुरूवात होते
सत्यनारायणाच्या कथेनी,
मग भर पडते खेळ, पाककला
, भजन , नृत्य, संगीत
अशा विविध कार्यक्रमानी.
नवे विचार नवा उत्साह नव्या कल्पना बघायला मिळतात
त्यांच्या कृतीतून,
सगळे सभासद मजा करतात कार्यक्रमात सहभागी होवून.
प्रत्येकाच्या अंगी असतो लपलेला एक कलागुण,
सादर करायला संधी मिळते मंडळानी आयोजित केलेल्या
कार्यक्रमातून.
मोठमोठ्या कलाकारांचे असते येणेजाणे,
त्या निमित्ताने होते त्यांच्या सोबत भेटणे.
एका कार्यक्रमामागे किती करावी लागते चोख कामगिरी,
शाबासकी ची थाप पडली कि विसरायला होते थकावट
सारी.
मंडळाची बातच आहे वेगळी,
अनुभव घेतल्या शिवाय सांगता येणार नाही सगळी.
वर्ष संपता आयोजित करतात एक खास मेजवानी,
साजेशा पोषाखात हजेरी लावतात सह कुटुंब
सहपरिवारानी.
मंडळ स्थापन करणार्यांनी, दिली
आहे मराठी असण्याची साक्ष,
असाच बहरत राहो महाराष्ट्र मंडळाचा वटवृक्ष.
सौ. अंजली निलेश उज्जैनकर
No comments:
Post a Comment