चिवडा
साहित्य
पातळ पोहे.
अर्धा किलो
शेंगदाणे. एक वाटी
डाळं. एक वाटी
सुकं खोबरं. अर्धी वाटी (बारीक चकत्या)
काजू. १०० ग्राम
हिरव्या मिरच्या १०-१२मिरच्याचिरलेल
कडीपत्ता. १०० ग्राम धुऊन पुसून
हिंग
तेल
चवीनुसार मीठ आणि साखर
हळद
मोहरी
कृती
प्रथम पातळ पोहे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावे
.पोहे कुरकुरीत भाजलेले बरे.
शेंगदाणे, डाळं
,सुखं खोबरं ,काजू
प्रत्येक जिन्नस वेगळेवेगळे तळून घ्यावे.फोडणीसाठी तेलात मोहरी तडतडली की त्यात हळद
, हिंग, मिरच्या
,कडी पत्ता
व जिन्नस घालून परतून घ्यावे.
फोडणी गार झाली की पातळ पोहे त्यात घालून , मीठ
व साखर घालून चांगले एकत्र करावे.
एअर टाईट कंटेनर किंवा स्टीलच्या डब्याला पेपर लावून
ठेवला तर हा चिवडा चांगला टिकतो.
No comments:
Post a Comment