Saturday, June 5, 2021

कोरोना--------सुषमा सुशील पाटील

 

कोरोना

 

कोण मी नि कुठला मी 

काय माझे नि कुठले माझे

तुझ्यापुढे तर हतबल सारे 

जणु काही बंद दरवाजे ।

 

हा माझा तर तो त्याचा 

नाही ठेवलास कुणी कुणाचा

भल्या भल्यांची केलीस दैना

माणूसच माणसांस पाहीना ।

 

कुठून येशील कुठे धडकशील

नाही उरला तुझा भरवसा

समोर आला की  चित पाडशील

याचाच तर तु घेतलास वसा ।

 

एवढे खाउन पोट तुझे भरेना

घात न केल्या दिन तुझा सरेना

तु म्हणे सदा कोरोना कोरोना

तुला काय कोणी का मरेना ।

 

ओळखुन बसलास आमची कमजोरी

दहशत ही तुझीच नि तुझीच की रे शिरजोरी ।

 

आता तर झालीय तुझ्या अहंकारात वृद्धी

नको विसरू विनाशकाले विपरित बुद्धी ।

 

न विचारतां तुला तांडव करीशी आमच्या उरावरी

थांबव रे आता नको करू आमच्या कर्तुत्वाशी बरोबरी ।

 

असा किती दिवस पामरां छळशील रे 

एक दिवस आमचा ही येइलच की रे ।

 

आज ना उद्या तुलाही लागतील आम्हा लेकरांची हाय

निसर्गाच्या नियमापुढे तुलाही लागतील टेकावे पाय ।

 

मग मारशील दडी नि बसशील गुपचिडी

तुला मात्र पळतां भुई होईल थोडी ।

 

जरी करशील वारंवार वारी

वरती बसलाय आमचाही कैवारी

लक्षात ठेव देव ज्याला तारी

त्याला कोण मारी ।

 

सुषमा सुशील पाटील

 

No comments:

Post a Comment