Saturday, June 5, 2021

चित्रकला---स्वानंद विकास नाईक

 




चित्रकला…..:- धृति आशिष देहणकर

 



चित्रकला-------भूमिका निलेश उज्जैनकर

 


चित्रकला--------आदित बलदावा

 



चित्रकला----स्मिता सरप

 


चित्रकला---------सौ. शीतल अमित झळकीकर

 



चिवडा-----सौ. शीतल अमित झळकीकर

 

चिवडा

साहित्य

पातळ पोहे.      अर्धा किलो

शेंगदाणे.           एक वाटी

डाळं.                एक वाटी

सुकं खोबरं.        अर्धी वाटी (बारीक चकत्या)

काजू.                १०० ग्राम

हिरव्या मिरच्या            १०-१२मिरच्याचिरलेल

कडीपत्ता.           १०० ग्राम धुऊन पुसून

हिंग

तेल

चवीनुसार मीठ आणि साखर

हळद

मोहरी

 

कृती

प्रथम पातळ पोहे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावे .पोहे कुरकुरीत भाजलेले बरे.

शेंगदाणे, डाळं ,सुखं खोबरं ,काजू प्रत्येक जिन्नस वेगळेवेगळे तळून घ्यावे.फोडणीसाठी तेलात मोहरी तडतडली की त्यात हळद , हिंग, मिरच्या ,कडी पत्ता    जिन्नस घालून परतून घ्यावे.

फोडणी गार झाली की पातळ पोहे त्यात घालून  , मीठ व साखर घालून चांगले एकत्र करावे.

एअर टाईट कंटेनर किंवा स्टीलच्या डब्याला पेपर लावून ठेवला तर हा चिवडा चांगला टिकतो.



“आंबा मोदक”--------------सौ विनिता आठवले

 

“आंबा मोदक”

नमस्कार मंडळी,

Mother’s day special आणि तो ही मे महिनाम्हणजे आंब्यांचा मोसमआहे तर म्हटलेमाझ्या आई ची स्पेशल रेसिपी तुम्हाला सांगावी..

आंबा मोदककरण्यास अतिशय सोप्पे आणि खाण्यास अतिशय रुचकर..

साहित्य:

सारण

/ मेजरींग कप खरवडलेले खोबरं

/ मेजरींग कप गूळ

/ मेजरींग कप  साखर

उकड-

/ मेजरींग कप आंबा रस

/ मेजरींग कप  पाणी

1 (हिप) मेजरींग कप -मोदक पीठ (किंव्हा तांदूळ पीठ ही चालेल)                                                             

/ टीस्पून तूप

/ तेल

किंचित मीठ

कृती

सारण (आधी सारण करून, गार करून घ्यावे.)

)खोबरं आणि गूळ एकत्र करून नॉन-स्टिक पॅन/कढई मध्ये घ्यावे आणि मंद आचेवर एक जीव होई पर्यंत शिजवावे.

)त्याला सुटलेले पाणी आळात आले की गॅस बंद करावा.

)सारण गार होऊ द्यावे.चमच्याने मोदक भरता येईल इथं पथ ते आळले पाहिजे.

उकड

आंबा रस आणि तेल एकत्र करून उकळत ठेवावे.

उकळी आली की पीठ त्यात घालून उलतन्याच्या मागच्या दांड्याच्या साहाय्याने फिरवावे.

झाकण ठेवून दोन वाफा आणाव्यात आणि गॅस बंद करावा.

उकड चांगली मळून घ्यावी ( वाटल्यास हाताला तेल आणि पाणी लावून घ्यावे.)

मोदक कृती

पिठाचे आपल्यला हवे त्या आकारचे भाग करून घावे.

मोदकची पारी करून, त्यात सारण भरावे आणि सुंदर मोदक वळावा.

नेहमी प्रमाणे मोदक १५ मिनिटे उकडत ठेवावे.

मोदक खाण्यास तयार.

 

---सौ विनिता आठवले

 



कोरोना--------सुषमा सुशील पाटील

 

कोरोना

 

कोण मी नि कुठला मी 

काय माझे नि कुठले माझे

तुझ्यापुढे तर हतबल सारे 

जणु काही बंद दरवाजे ।

 

हा माझा तर तो त्याचा 

नाही ठेवलास कुणी कुणाचा

भल्या भल्यांची केलीस दैना

माणूसच माणसांस पाहीना ।

 

कुठून येशील कुठे धडकशील

नाही उरला तुझा भरवसा

समोर आला की  चित पाडशील

याचाच तर तु घेतलास वसा ।

 

एवढे खाउन पोट तुझे भरेना

घात न केल्या दिन तुझा सरेना

तु म्हणे सदा कोरोना कोरोना

तुला काय कोणी का मरेना ।

 

ओळखुन बसलास आमची कमजोरी

दहशत ही तुझीच नि तुझीच की रे शिरजोरी ।

 

आता तर झालीय तुझ्या अहंकारात वृद्धी

नको विसरू विनाशकाले विपरित बुद्धी ।

 

न विचारतां तुला तांडव करीशी आमच्या उरावरी

थांबव रे आता नको करू आमच्या कर्तुत्वाशी बरोबरी ।

 

असा किती दिवस पामरां छळशील रे 

एक दिवस आमचा ही येइलच की रे ।

 

आज ना उद्या तुलाही लागतील आम्हा लेकरांची हाय

निसर्गाच्या नियमापुढे तुलाही लागतील टेकावे पाय ।

 

मग मारशील दडी नि बसशील गुपचिडी

तुला मात्र पळतां भुई होईल थोडी ।

 

जरी करशील वारंवार वारी

वरती बसलाय आमचाही कैवारी

लक्षात ठेव देव ज्याला तारी

त्याला कोण मारी ।

 

सुषमा सुशील पाटील

 

My Mother-------Sanvi Prashant Mohite

 

My Mother

My Mother, my friend so dear

Throughout my life you’re always near.

A gentle smile to guide my way 

You’re the sunshine to light my day.

 

                               

                           God’s Special Gift

                                                           When god created mothers as

                          sweet as can be

                          He made an extra special one

                          and saved her just for me!

 

                  

 

 

 

 

                                      -Sanvi Prashant Mohite       

'तिच्या जागी उभी मी'--------------- रुपाली मावजो किर्तनी

 

एक बाईच दुसऱ्या बाईला समजू शकते असं म्हणतात. पण जो वर आपण तिच्या जागेवर उभं राहून जग पाहत नाही तो वर तिला कुणीच समजू शकत नाही असं माझं ठाम मत आहे. एक बाई जी सगळ्यांच्याच आयुष्यात आपला ठसा ठेवते ती म्हणजे, आपली आई. आपण तिचं प्रेम बघतो पण तिचे त्याग , तिच्या रागा मागच्या भावना, आणि तिचा आरडा ओरडा आपल्याला कधीच समजत नाही. आज विचार केला तर मलाही तसंच वाटतंलहान असताना मम्मीला कधीच समजून घ्यायचा मी प्रयत्न नाही केला. मम्मी कामावरनं थकून यायची पण आम्हाला तिची चिडचिड समजायची नाही. घरची कामं करायला मदतीला बोलवायची तेव्हा वाटायचं की, 'मीच का?'
'
शिकलेलं कधीच फुकट जात नाही' तिच्या ह्या शब्दांचा अर्थ आज समजतो जेव्हा शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा फायदा समजायला लागला. आज जेव्हा माझ्या मुली माझ्या समोर तोच प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन उभ्या राहतात, 'मीच का?' हा प्रश्न परत परत विचारतात, माझ्या चिडचिडच्या मागे लपलेला थकवा जेव्हा त्यांना दिसत नाही, तेव्हा आठवतं मला माझं बालपण, माझी तेव्हाची मनाची अस्वस्थथा, आणि डोळ्या समोर येतो एकच चेहराचेहरा माझ्या मम्मीचा. 

'
तिच्या जागी उभी मी'

चेहर्‍या वरील भाव तिच्या
कधीच समजू शकले नाही
त्या ओरडण्या मागचं प्रेम
तेव्हां मी ओळखु शकले नाही

ओरडण्यात लपलेले भाव
आज मला कळतात
जेव्हां उत्तर मागणारे चेहरे
मला बघायला मिळतात

दाटून आलेले डोळे मी
तेव्हा बघू शकले नाही
भरुन आलेलं ह् ह्रदय आज
डोळ्याना माझ्या चुकलं नाही

त्या जागेवर उभी राहिले तेव्हांच
प्रेम ते समजु शकले
आई म्हणजे नक्की काय
तेव्हांच मला कळुन चुकले

प्रेमांत मउ ह्रदय तिचं
आज लगेच वितळतं
माझ्या मनांत चाल्लेलं मात्र
न सांगताही तिला समजतं

सगळ्यात आधी आजही माझं
मन तिलाच शोधते
'
मम्मी' ह्या एका हाकेत
सर्वस्व मला मिळतं...
सर्वस्व मला मिळतं

----
रुपाली मावजो किर्तनी

आई -सर्वस्व----------सौ .नम्रता नितीन देव

 

आई -सर्वस्व

 

तुझाच अंश मी

 

तुझाच वंश मी

 

अस्तित्व माझे तुझ्यामुळे

 

तुझ्यामुळेच आज मी

 

मातीच्या गोळ्यास एका

 

तू दिलेला आकार मी

 

घडविलेस व्यक्तित्व माझे

 

तुझेच सर्व संस्कार मी

 

आयुष्याची मार्गदर्शक  तू

 

चालणारी पांथस्थ मी

 

नाहीस जरी आहेस तू

 

कायम  आश्वस्त मी

 

फेडू  कसे ऋण तुझे

 

माझ्यासवे नेईन मी

 

फेडण्या ते पुढील जन्मी

 

तुझीच लेक होईन मी

 

सौ .नम्रता नितीन देव

 

महाराष्ट्र मंडळ------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

महाराष्ट्र मंडळ


अभिमान आहे मला मराठी असण्याचा,
संस्कृती आणि परंपरा जपायला आधार मिळाला महाराष्ट्र मंडळाचा.

सात समुद्रा पार आलो घरदार सोडून,
प्रगती च्या दिशेने आलो देशाचा उंबरठा ओलांडून.

देशाबाहेर आल्याशिवाय जाणीव झाली नाही परंपरा आणि संस्कृतीची,
इकडे आल्यावर मिळाली माहिती महाराष्ट्र मंडळाची.

मंडळ चालवतात सगळे  एकमेकांच्या साथीने,
जणू छोटा महाराष्ट्रच वसला आहे मंडळाच्या रुपाने.

दरवर्षी मंडळाचा कारभार सांभाळते एक नवीन कार्यकारिणी समिती,
सगळ्यांना संधी  देत असते मंडळाची विश्वस्त समिती.

कार्यकारिणी समिती ची सुरूवात होते सत्यनारायणाच्या कथेनी,
मग भर पडते खेळ, पाककला , भजन , नृत्य, संगीत अशा विविध कार्यक्रमानी.

नवे विचार नवा उत्साह नव्या कल्पना बघायला मिळतात त्यांच्या कृतीतून,
सगळे सभासद मजा करतात कार्यक्रमात सहभागी होवून.

प्रत्येकाच्या अंगी असतो लपलेला एक कलागुण,
सादर करायला संधी मिळते मंडळानी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून.

मोठमोठ्या कलाकारांचे असते येणेजाणे,
त्या निमित्ताने होते त्यांच्या सोबत भेटणे.

एका कार्यक्रमामागे किती करावी लागते चोख कामगिरी,
शाबासकी ची थाप पडली कि विसरायला होते थकावट सारी.

मंडळाची बातच आहे  वेगळी,
अनुभव घेतल्या शिवाय सांगता येणार नाही सगळी.

वर्ष संपता आयोजित करतात एक खास मेजवानी,
साजेशा पोषाखात हजेरी लावतात सह कुटुंब सहपरिवारानी.

मंडळ स्थापन करणार्यांनी, दिली आहे मराठी असण्याची साक्ष,
असाच बहरत राहो महाराष्ट्र मंडळाचा वटवृक्ष.


                                               
सौ. अंजली निलेश उज्जैनकर