Saturday, August 22, 2020

कविता…..:- श्रावण..........सौ.अजंली नीलेश उज्जैनकर

 

श्रावण


श्रावण आला श्रावण आलाहिरवे रान बहरू लागला.
सणासुदीचा महीना आला, चला गं पुजू  शंकराला.

मंगळागौरीच्या पुजेला, हळदीकुंकु देऊ सुवासिनीला.
शृंगार करूनी रात्री ला , फेर धरूया  जागराला.

नागपंचमी च्या  सणाला , चला गं सख्यांनो माहेराला.
कृष्णाचा झुलवू पाळणा, गोकुळ अष्टमी  च्या सणाला.

अतूट प्रेमाच्या नात्याचा , राखी पौर्णिमेचा सण हा आला.
देवाला करू प्रार्थनादृष्ट न लागो बहिण भावाच्या प्रेमाला.

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय गाण गाऊनी, सलामी देऊ तिरंग्याला.
मानवंदना देऊ त्या शहीदांना , ज्यांनी दिले ,प्राण या देशाला .

शेतात राबणाऱ्या बैलाचा , सण हा आला पोळ्या चा.
ओवाळू सजलेल्या बैल जोडीला, घास भरवू या  पुरणाचा ,

गणरायाच्या स्वागताला ,ढोल ताशे घ्या सोबतीला.
दहा दिवसांचा सण हा आला, उधाण आले आनंदाला.

--सौ.अजंली नीलेश उज्जैनकर


No comments:

Post a Comment