मिसळ
पाककृती
साहित्य –
क्र. |
साहित्य |
प्रमाण |
१ |
मोड आलेली मटकी |
२ वाटी |
२ |
उकडलेले बटाटे |
२ |
३ |
कांदे |
२ |
४ |
टोमॅटो |
१ |
५ |
सुकं खोबरं |
१/४ वाटी |
६ |
लसूण |
५ ते ६ पाकळ्या |
७ |
आलं |
१ इंच |
८ |
हिरवी मिरची |
२ |
९ |
काश्मिरी चिली
पावडर |
१ चमचा |
१० |
कांदा-लसूण मसाला |
२ चमचे |
११ |
फोंडणी साहित्य –(मोहरी, हिंग, हळद) |
|
१२ |
कोंथिंबीर |
१/२ वाटी |
१३ |
कढीपत्ता |
|
१४ |
मीठ |
चवीनुसार |
१५ |
लिंबू |
१ |
कृती
–
·
मटकी उसळ –
१.
मटकी चाळणीतून पाण्यातून चांगली धुंवून घ्या.
२.
एका कढई मध्ये तेल गरम करून घ्या.
३.
तेल गरम झाल्यावर त्यात हिंग,
मोहरी ,बारीक चिरेलेला २-३ पाकळ्या लसूण
घाला.
४.
त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि १/२
वाटी बारीक चिरलेला कांदा घाला.
५.
कांदा लालसर भाजून झाल्यावर त्यात
अर्धा चमचा कांदा-लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.
६.
आता त्यात धुवून ठेवलेली मटकी घाला.
७.
१० मिनिट वाफवून घ्या.
८.
तुमची मटकीची उसळ तयार....!
·
बटाटा भाजी–
१.
२ उकडलेले बटाटे सोलून बारीक चिरून घ्या.
२.
कढई मध्ये एक चमचा तेल घालून गरम करा.
३.
गरम तेलात मोहरी,
हिंग , हळद आणि १/२ चमचा आलं-मिरची पेस्ट
घालून परतून घ्या.
४.
चिरलेला बटाटा घालून मिक्स करा.
५.
चवीनुसार मीठ घालून एक मिनिट वाफ द्या.
६. तुमची
बटाटा भाजी तयार...!
·
सॅम्पल –
Ø सॅम्पलसाठी
लागणारे वाटण –
१.
बारीक चिरून घेतलेला ११/२ वाटी कांदा लालसर परतून घ्या.
२.
पाव वाटी सुकं खोबरं सुद्धा लालसर परतून घ्या.
३.
आलं आणि ४-५ पाकळ्या लसूण गरम करून
परतून घ्या.
४.
हे सगळे भाजलेले जिन्नस एका मिक्सर
च्या भांड्यात काढून घ्या.
५.
त्या भाजलेल्या मसाल्यात १ चमचा
कोथिंबीर , १/२ चमचा मीठ आणि १ चमचा
कांदा-लसूण मसाला घाला.
६.
१/२ वाटी पाणी घालून बारीक वाटून घ्या.
७.
टोमॅटो बारीक चिरून त्याची पेस्ट/प्यूरी करून घ्या.
८.
सॅम्पलसाठी लागणारे वाटण तयार...!
Ø सॅम्पल
फोडणी –
१. २
चमचे तेल कढई मध्ये घालून गरम करून घ्या.
२. त्यात
टोमॅटो ची पेस्ट/प्यूरी
घाला.
३. ५ मिनिट ही पेस्ट/प्यूरी छान परतून
घ्या.
४. आता
त्यात मिक्सर मध्ये केलेले सर्व वाटण टाका.
५. १०-१५
मिनिट मध्यम आचेवर हे वाटण परतून घ्या.
६. ह्या
परतलेल्या वाटाणाला छान तेल सुटेल. ह्या वाटणात आता १ चमचा कांदा-लसूण मसाला , १
चमचा काश्मिरी चिली पावडर आणि १ चमचा मीठ टाका आणि ५ मिनिट परतून घ्या.
७. आता
ह्या सगळ्या मिश्रणात अंदाजाने जेवढे सॅम्पल हवे तेवढे गरम पाणी टाका आणि छान
ढवळून घ्या (ह्या प्रमाणसाठी १ लिटर पाणी लागेल).
८. १५-२०
मिनिट मंद आचेवर सॅम्पल सेट होऊ द्या.
९. तुमचं
सॅम्पल तयार .... !
****
“वाढताना
एका खोलगट बाउल मध्ये पळीभर मटकीची उसळ ,
त्यावर १ चमचा बटाटा भाजी घालावी. त्यावर १ डाव फरसाण घालावे. वरून पाहिजे तितके सॅम्पल
घालावे.आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेला कांदा,
चिरलेली कोथिंबीर घालावी , लिंबू
पिळावे. खायला देताना लिंबाची फोड व पाव/ब्रेड स्लाइस बरोबर द्यावा.” *****
प्रियांका गाडे
No comments:
Post a Comment