स्वागत गजाननाचे -२०२०
विघ्नहारी हे गणराया विघ्न हराया या
संकट साऱ्या जगतावरती ते निर्दाया या I
रोगराईचे संकट साऱ्या जगतावरती आले
राजा असो वा रंक त्याने ना कोणा सोडले
उपाय सारे हरले आता तुम्ही सोडवा या I
कसे करावे स्वागत तुमचे बंधन अवतीभवती
मुखावरही बंधन असता कशी करू आरती
या साऱ्या बंधनांतुनी मुक्ती
द्याया या ।
आशा एकच येता तुम्ही संकटे सारी हरतील
उत्साहाने आनंदाने पुन्हा सारे जगतील .
आशावादी तव भक्तांना आशिष देण्या या ।
सौ.नम्रता
नितीन देव
No comments:
Post a Comment