कोरोनातील गणराया
आला आला हो कोरोना
त गणराया घरी हा आला....
नाही टाळ झांजांचा आवाज त्याच्या स्वागताला,
शांतपणे मखरात आरूढ हा झाला.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....
कोरोनामुळे पै पाहुणा नाही घरी हो आला,
नाही लगबग आली हो काना,
एकटीच गृहिणी नैवैद्य करी हो त्याला.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....
एकाही डॉक्टरांना आराम नाही हो जरा,
पोलिसांचा तर रात्रंदिवस खडा पहारा,
देवा त्यांच्यावर कृपा कर तु जरा.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....
तुझ्या शुंडेने कोरोनास आवळ रे जरा,
तुझ्या पाशी येवढेच मागणें हे आता,
सर्वांवर सुखाची पाखर घाल आता.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला....
मनोभावे पूजेन तुला गणराया,
नाही सगळेच जमेल रीतीने कराया,
तरी उदंड आशिर्वाद दे रे भक्तांना.
आला आला हो कोरोना त गणराया घरी हा आला.
--सौ.नम्रता मनीष चिटणीस
No comments:
Post a Comment