गाजराचे भरीत
आपण गाजराची कोशिंबीर नेहेमीच करतो पण हे थोडंसं वेगळं, गाजराचे भरीत.
साहित्य -
२-३ मध्यम आकाराची गाजरं तुकडे करून कुकर मधून वाफवून घेतलेली,
पाव वाटी शेंगदाण्याचे कूट,
२हिरव्या मिरच्या,
बारीक चिरलेली कोथिंबीर २टे स्पून,
एक वाटी गोडसर दही,
चवी पुरेसे मीठ -साखर,२सुक्या लाल मिरच्या,
४-५कढीपत्त्याची पाने,
फोडणीचे साहित्य,२-३टी स्पून तेल फोडणी साठी
कृती -
वाफवलेले गाजराचे तुकडे कुस्करून घेणे व त्यात चवीपुरेसे मीठ,साखर,दाण्याचे कूट,फेटलेले दही हे सर्व
साहित्य मिसळुन घेणे.दोन हिरव्या मिरच्या व पाव टी स्पून मोहरी मिक्सर मधे फिरवून
घेणे व भरीता मध्ये मिसळणे.छोट्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल तापवून त्यात मोहरी,जिरं,३-४मेथी दाणे,लाल सुक्क्या
मिरच्यांचे तुकडे,कढीपत्ता,हिंग,व हळद घालुन खमंग फोडणी करून ती भरीतावर ओतणे.बारीक चिरलेल्या
कोथिंबिरीने सजवून चवदार भरीत पोळी-भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
सौ नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment