होळी
फाल्गुनातली पोर्णिमा म्हणजे होळीचा सण,
मनातील गर्व, अहंकार, त्यागून साजरे करावे होलीका दहन.
मनाचा बाळगुण मोठेपणा, ओठी गोडवा शब्दांचा, साजरा करावा सगळ्यांसोबत सण हा रंग बीरंगी रंगांचा.
राग, द्वेशाची टाकूनी आहूती, बुरसटलेल्या विचारांची पेटवावी होळी,
गाठी सारखी आयुष्यातही राहावी सदैव गोडी.
इंद्रधनुच्या सप्तरंगाची होऊ दे उधळण,
पंचमीला खेळू गुलाल एकत्रित येवून सर्वजण.
साचलेली नकारात्मकता मिटवायला, साजरी करावी दरवर्षी जल्लोषात होळी,
साजरी करावी दरवर्षी जल्लोषात होळी.
सौ. अंजली निलेश उज्जैनकर
No comments:
Post a Comment