Saturday, June 3, 2017

बहर करिता साहित्य पाठविण्याविषयी काही सूचना.
१. सर्व प्रकारचे साहित्य mmadbahar@gmail.com यापत्त्यावर ई-मेलने पाठवावे.
२. साहित्य हे मराठीतच टाईप केलेले असावे.
३. साहित्य ms-word मध्ये किंवा ई-मेलमध्ये पेस्ट करून पाठवावे. PDF अथवा स्कॅन केलेले नसावे.
४. मराठी मध्येटाइपिंग करण्यासाठी http://marathi.indiatyping.com ही लिंक वापरा.
५. साहित्य पाठवताना ई-मेलच्या Subject मध्ये योग्य तो विषय नमूद केलेला असावा.
६. साहित्याच्या तळाला लेखकाचे नाव असावे.
७. साहित्यात अथवा त्यातील मजकूरात किंवा छायाचित्रात कोणत्याही प्रकारच्या अबुधाबी (युएई) च्या धार्मिक, सांस्कृतिक प्रथा/           नियमांचा अनुल्लेख नसावा. काही आक्षेपार्ह आढळल्यास साहित्य प्रसिद्ध केले जाणार नाही.
७. सभासदांनी पाठवलेले साहित्य mmadbahar.blogspot.ae या ब्लॉग वर प्रकाशित करण्यात येईल. व त्यानंतर
सर्व सभासदांना त्याबद्दल इ-मेलद्वारे सूचित करण्यात येईल.
वाचक सभासद त्यांच्या आवडीच्या लेखाला योग्य प्रतिसादही देऊ शकतात.
हे वर्ष महाराष्ट्र मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तेव्हा या वेळचा विषय हा त्यालाच अनुसरून आहे. "मी आणि महाराष्ट्र मंडळ".....चला तर मग ... उचला लेखणी आणि तुमच्यातल्या लेखकाला व्यक्त होऊ द्या.
या व्यतिरिक्त ही इतर लेख, प्रवासवर्णन, कविता, रेसिपी, बालकलाकारांनी रेखाटलेले चित्र यांचे सुद्धा स्वागत आहे.
बहर ब्लॉग मध्ये Mobilography व Achievements या दोन नवीन सदरांचा समावेश करण्याचे ठरवले आहे. तेव्हा ज्यांना आपली छायाचित्रणाची हौस, आवड, गोडी पुरवायची आहे त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काढलेले एखादे सुंदर छायाचित्र नाव व विषय यासहित पाठवून द्यावे. छायाचित्रात नेमके काय दाखवायचे आहे याविषयी १-२ ओळी लिहाव्यात.....
Achievements या सदरात विद्यार्थी/खेळाडू यांना शाळा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मिळालेल्या वेगवेगळ्या पुरस्कारांचा उल्लेख केला जाईल. सभासदांनी/पालकांनी त्याबद्दलची माहिती/छायाचित्र mmadbahar@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. 
साहित्य दि. ५ जून २०१७ पर्यंत वर नमूद केलेल्या ई-मेलवर पाठवावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
सौ. रुपाली कीर्तनी (0506890867)
श्री. अजय पडवळ (0528115209)



No comments:

Post a Comment