Tuesday, April 30, 2019

चित्रकला स्पर्धा (वयोगट ८ ते १२):-द्वितीय क्रमांक - कुमारी कोमल हेमंत गिरधर.


चित्रकला स्पर्धा (वयोगट ५ ते ७) :-प्रथम क्रमांक - कुमार रूद्र आशिष भोळे.


चित्रकला स्पर्धा (वयोगट ५ ते ७) :-द्वितीय क्रमांक - कुमारी ईशानवी अशोक संभाजी.


चित्रकला स्पर्धा (वयोगट ८ ते १२):-प्रथम क्रमांक - कुमारी आरुषी गिरीश सरप.


चित्रकला स्पर्धा (वयोगट १३ ते १८):-प्रथम क्रमांक - कुमारी भूमिका निलेश उज्जैनकर.


चित्रकला स्पर्धा (वयोगट १३ ते १८):-द्वितीय क्रमांक - कुमारी तनिष्का मनीष कांबळे.


निबंध स्पर्धा (वयोगट ८ ते १२) - द्वितीय क्रमांक - कुमारी नंदिनी अनिल वायकर .

Your special birthday

Birthday’s are the best days of our lives. I was 6 th April of 2008, I was going to be
1 year old. I was too small, I didn’t even knew that it was my birthday. My parents
woke me and they shouted “Happy Birthday” .i has no clue what was going on.
But I had a gigantic smile on my face. My mom dressed me up. It was a beautiful
frock. The frock looked like the blue frock Cinderella wore on the day of her ball.
Then my parents took me to my favourite restaurant. Not exactly favourite but I
liked the food over there. We had our lunch and then we drove over to a party hall.
The hall was decorated so beautifully. It was filled with balloons. The balloons
were of different –different colours. I had a special chair to sit. All my friends were
playing in front of me and I was sitting like a queen laughing and smiling. I felt
like a celebrity, everyone was clicking photo with me. My birthday cake was very
tall. It was of 3 layers. The knife to cut the cake was much much bigger than my
hand. Everyone were giving me big big gifts. I was so happy to see them with the
gifts. Everyone were dressed so beautifully as if it was a wedding. Everyone were
chit-chatting in the hall. The variety of food was amazing. People were filling their
plates with food and yeah! My mom was feeding me a lot of food that I started
crying. But as soon as left the table, I stopped crying. MY mom turned back and
said Stop doing so much drama, OK, She laughed and continued her work. I was
roaming around the whole hall staring at people and their dresses. Everyone looked
at me, they wished me “Happy Birthday”. They picked me up, they were playing
with me. They were talking with me.
Everyone forced me to dance, but I was too shy, I didn’t wanted to dance.
Everyone asked me to dance but I was stubborn. I started crying. Then everyone
told ‘OK, OK don’t cry. If you don’t want to dance then don’t dance but please
don’t cry’. And I stopped crying. I was giving everyone gifts. I was giving them
gifts as if I was a queen and I was giving my countries gifts...ha ha. Just joking!
We came back home from the party hall. I was so excited to open my gifts. I told
my mom ‘mummy can we open my gifts please!’ My mom said ‘Yeah yeah fine
we will open.’ I was jumping all around the house. We opened all the gifts. I was
so happy to see my gifts. This birthday was my bestest birthday ever. And I thank

my parents for such a birthday. And guess what, today is 5 th April and tomorrow is
6 th April 2019. I am so excited to tomorrow. I will be turning 12. I just can’t wait.


निबंध स्पर्धा (वयोगट ८ ते १२) - प्रथम क्रमांक - कुमार पियुष धनंजय शितोळे .

Your special birthday

Birthday is celebrated every year. It is celebrated on the day you were born. I have
celebrated my birthday many times, but my most special birthday was my sixth
birthday. I forgot that it was my birthday because of my exams. I was really busy
in my exams. My parents didn’t forgot my birthday. When I came back from
school fter exams, I rang the bell, no one answered it. I asked my neighbours if my
parents had gone out. They called me in their home to rest. When I went in, I could
not see anything because it was dark. Suddenly the lights turned on and all my
friends and my parents were there, I was shocked and then I realised that it was my
birthday. I was so happy, I didn’t knew it was my birthday and my parents knew.
After the party I fell asleep. After I woke up, my parents told let’s go out. I did not
have any idea where we were going, soon I realised we were going to YAS mall.
After reaching there, we went to Lego, my favourite shop. I bought a lot of stuff
over there. After that we went to a shooting range .over there I fired different
airsoft guns. I also got 1 st in one activity. Then we ate different types of food. We
also went to a show in pas mall in that a magician performed many tricks and a
joker made everyone laugh. Some athletes also showed their skills. When the show
was over, we went to a book store and bought some books. When we were tired,

we went home. I called some of my friends to play with me. After playing, I went
to sleep. So that5 was my most special birthday.





निबंध स्पर्धा (वयोगट १३ ते १८) - द्वितीय क्रमांक - कुमारी विधी संतोष राक्षे.

Social media: a boon or bane
Social media is a huge platform containing various services like Youtube,
instagram, twitter, etc. Like anything in this world, social media also has its pros
and cons. To list the pros, there will be many whether it be communication or
expressing creativity. Social media platforms like Instagram, Snapchat, Pinterest,
etc. are used for uploading ideas, pictures to show and inspire others. The pros of
these platforms would be that they let each and everyone to express their ideas to
the world. There are many people who have become famous because of these
platforms like makeup artist James Charles, magician Zach king and many more.
Now for the cons, many of these platforms have been hacked and hackers have
been taking the information of accounts and misusing the pictures and videos that
are posted. Many children have also been cyber bullied by these hackers. But still
many of these websites are safe and secure. Let's move back to pros, take up a
situation in which you have to encourage people to stop global warming, to do so
you have to use your Twitter and Instagram accounts. A few days later many
people having been taking steps to stop global warming and you have a very
positive response. Let’s take another situation, you want to make a special
breakfast for your mother and you look up on Youtube for ideas and make a very
special breakfast and your mom loves it. Now let's take a similar situation, you
want to make the same special breakfast for your dad and without even trying to
make something on your own creative ideas you just check something out on
Pinterest and copy what an original creator has done. Now that would be copying.
Now for another boon of social media you can get inspired by many creators on
this huge platform and become one too and inspire others. But some platforms like
Twitch, a gaming media, many children and even adults spend hours sitting on
their phones l watching livestreams of people playing games and get nothing
productive out of it. Many children don't go outside in fresh air to play and don't
even enjoy reading paperback books because they read ebooks on a screen. But
getting back to pros, you can meet so many different people like your old friends
from school, etc., to recommunicate with them. But another bane would be that

supposedly there is a person near a waterfall who has slipped off the rocks nearby
and fallen and is badly injured. Instead of calling the ambulance or even going
there to help the person, people have been taking pictures and videos of that
struggling and posting it on YouTube, Twitter etc. These act just shows that
humanity is no more on the earth. But a really good pro would be that creator on
the YouTube like Liza Koshi etc. are expressing their stress and anxiety with their
subscribers to make themselves more happy. Also many YouTubers have been
taking a break from posting for their suggested period of time to be more mentally
and physically happy. To list these would be so many more but I think that social
media is a boon and bane on the public. But to compare, these would not be any more or less of a boon or bane. I think that it is completely your choice of weather to be active on any social media platform or not.
















सौ. शैलजा कुलकर्णी.


मतदान - अधिकार कि औपचारीकता

सध्या भारतामध्ये लोकसभा निवडणुकांचा ज्वर अगदी शिगेला पोहोचलाय. हा लेख तुम्ही वाचेपर्यंत मतदानाचा पहिला टप्पा पार पडलेला असेल.  नेत्यांच्या सभा, दौरे, आश्वासनं, प्रलोभनं, आरोप, प्रत्यारोप, युत्या, आघाड्या, पक्षप्रवेश, दलबदली आदि राजकीय गोष्टी, घडामोडी चालू आहेत. विविध प्रसारमाध्यमांतून मुलाखती, चर्चासत्रं, लेख, जाहिराती जनमत चाचण्या, तर फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर आदि समाजमाध्यमांतून पक्षाच्या, नेत्याच्या समर्थनार्थ वा विरोधात्मक पोस्ट्स, खरे खोटे व्हिडिओ, फोटो, मेसेजेस, ट्रोलिंग  या गोष्टी जोरावर आहेत. एकूण काय तर मतदाराला विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेण्यासाठी भरपूर स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. आता प्रश्न असा आहे कि सर्वसामान्य मतदार खरोखर अभ्यास करून मत देतो का? किंबहुना तेवढा अभ्यास करायला मतदाराला वेळ आहे का? याच प्रश्नांच्या अनुषंगाने निवडणूक, मतदार आणि मतदान यांचा अभ्यास केला.
सर्वसाधारणपणे, माझ्या दृष्टीने मतदारांचं वर्गिकरण करायचं झालं तर ते एकनिष्ठ, भावनिक, अभ्यासू आणि उदासीन अश्याप्रकारे करता येईल. एकनिष्ठ हा जो प्रकार आहे तो म्हणजे पाठिंबा दिलेल्या पक्षाशी वा नेत्याशी इतके एकनिष्ठ असतात कि त्यांच्या निष्क्रियतेची देखील पाठराखण करतात आणि विरोधक पक्षाच्या, नेत्यांच्या चांगल्या गोष्टीमधेही चुका शोधतात. या एकनिष्ठांची ठरलेली मतं कोणत्याही परिस्थितीत मिळणारच असल्यामुळे त्या त्या नेत्यांना पक्षाला हि मतं मिळण्याची काळजी नसते. 'भावनिक' मतदार असतो. हा त्या त्या वेळच्या निवडणुकीच्या लाटेवर स्वार होतो आणि वर नमूद केलेल्या स्टडी मटेरियलच्या प्रभावाखाली येऊन वाहत, नव्हे, वाहवत जातो आणि त्याप्रमाणे मतदान करतो. 'अभ्यासू' मतदार नावाप्रमाणेच वरील स्टडी मटेरियलचा पूर्ण अभ्यास करून सारासार विचार करून मतदान करतो. यानंतरचा प्रकार म्हणजे 'उदासीन' मतदार. या प्रकारचा जो मतदार आहे त्याला एकतर राजकारण, निवडणूक या गोष्टीमधे रस नसतो किंवा या गोष्टींवरून विश्वास उडालेला असतो. मतदारांच्या या वर्गीकरणाचा तार्किक विचार केला तर असं वाटतं कि एकनिष्ठ जेंव्हा निराश होतो तेंव्हा तो भावनिक होतो,  त्यानंतरही जेंव्हा निराशा पदरी पडते तेंव्हा तो अभ्यासू होतो आणि हे सर्व करून झाल्यावर त्याचा जेंव्हा विश्वास उडून जातो तेंव्हा तो उदासीन होतो.
राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना एकनिष्ठ आणि उदासीन मतदारांची फारशी काळजी नसते, कारण एकनिष्ठांची मतं हमखास मिळणार असतात तर उदासीन मतदारांची कुणालाही मिळणार नसतात. निकालावर परिणाम करणारे म्हणजे भावनिक आणि अभ्यासू मतदार. निवडणुकीमध्ये पक्षांची आणि नेत्यांची तारांबळ, धावपळ, कवायत असते ती केवळ या मतदारांचे मन आपल्याकडे वळविण्यासाठी आणि परिणामी मत मिळविण्यासाठी. मग सुरु होतात नेत्यांच्या सभा, प्रचार फेऱ्या, वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतीं, चर्चां, चर्चासत्रं, जाहिराती. इतकंच काय तर भावनिक मतदारांच्या मनांचा ठाव घेऊन त्याप्रमाणे प्रचाराची रणनीती आखण्यासाठी व्यावसायिक रणनीतीकार नियुक्त केले जातात. हे रणनीतीकार आपापल्या पक्षाची, नेत्याची प्रतिमा उजळविण्यासाठी मतदारांचा अभ्यास करून प्रचाराची रणनीती आखातात. मग पुढे जाऊन व्हॉट्सअँप फॉरवर्ड्स, फेसबुक पोस्ट्स यांसारख्या प्रभावी माध्यमांचा प्रचारासाठी सर्रास वापर केला जातो. याचाच आधार घेऊन  मतदारांचा बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न देखील होतात. आता प्रश्न असा कि बुद्धिभेद म्हणजे काय? उदाहरणादाखल सांगायचे तर एकाच विषयावरील बातम्या चर्चा जर विविध वृत्तवाहिन्यांवर बघितल्या तर सूत्रधारांनी ठराविक पद्धतीने वापरलेली भाषा, चर्चेला दिलेली दिशा या गोष्टी निष्पक्षतेवर शंका उपस्थित करतात. व्हाट्सअँप  फॉरवर्ड्स, फेसबुक पोस्ट्स यांच्या माध्यमातून छेडछाड केलेले फोटो, विडिओ मतदारांपर्यंत पोहोचवले जातात. विकास कामे दाखविण्यासाठी चक्क परदेशातील फोटोंचा वापर केल्याचही बऱ्याच वेळा उघड झालय. याची प्रभावशीलता लक्षात घेऊन आता तर राजकीय पक्षांचे समर्थक (एकनिष्ठ) आपापल्या पक्षाला, नेत्याला सुसंगत वातावरण निर्माण करण्यासाठी इमेजेस, व्हिडीओ आणि लिखित स्वरूपाच्या पोस्ट्स तयार करून व्हायरल करतात आणि शिकलेसवरलेले लोक देखील या बुद्धिभेदाचा शिकार होतात आणि कसलाही विचार, शहानिशा करता पटवूनही घेतात आणि इतरांना फॉरवर्ड करत राहतात.
अभ्यासू मतदार मात्र या सर्व गोष्टींचा अभ्यास करतो. आता अभ्यास म्हणजे नेमकं काय, तर विकसित माहिती तंत्रज्ञानामुळे, इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या भरपूर माहितीचा उपयोग करून बातम्यांची, फॉरवर्ड केलेल्या पोस्ट्स, फोटो, विडिओ यांची शहानिशा करता येते. आधी सांगितल्याप्रमाणे एकाच विषयावरील चर्चा विविध वृत्तवाहिन्यांवरून बघितली तरी वेगवेगळ्या पक्षांच्या बाजूने आणि विरोधात असे सर्व मुद्दे लक्षात येतात. अहो, एखादा फोटो छेडछाड केलेला आहे कि नाही याचीही खात्री इंटरनेटवर रिव्हर्स इमेज सर्च द्वारे करता येते. याच बरोबर इंटरनेटवर बातम्यांची सत्यासत्यता पडताळून योग्य बातमी देणाऱ्या वाहिन्यादेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जर सतर्क राहिलो तरच आपण योग्य त्या माहितीच्या आधारावर आपल्यासाठी काम करणाऱ्यांची योग्य निवड करू शकतो. पण, दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी आणि एका सर्वसाधारण राहणीमानाची जुळवाजुळव करण्यासाठी अहोरात्र धावपळ करणाऱ्या सर्वसामान्य मतदाराला, शहानिशा वगैरे गोष्टी करण्यासाठी वेळ कुठे आहे? मग याच गोष्टीचा फायदा उचलला जातो आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो..
दुसरं म्हणजे, निवडणुका आल्या कि मतदानाच्या अधिकाराची जाणीवही आवर्जून केली जाते, मतदानाचं महत्व वगैरे सांगून मतदान करण्याचं आवाहन केलं जातं. मागे, निवडणूक आयोगाने मतदानाची सक्ती केल्याची बातमी वाचनात आली होती, ती म्हणजे, मतदान नाही केलं तर बँकेच्या खात्यातून किंवा मोबाईलच्या रिचार्जमधून पैसे कापले जातील. शहानिशा केल्यानंतर हि सक्तीची बातमी अपेक्षेप्रमाणे खोटी निघाली. दुसरी एक बातमी वाचली होती कि मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी एका शाळेने मतदान केल्यानंतर मतदारांच्या पाल्यांना एक गुण अतिरिक्त देण्याचे जाहीर केले. एकीकडे या बातम्या तर हा लेख लिहीत असतानाच पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी बातम्या आल्या कि वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या काही मतदारांची नावेच मतदार यादीत नाहीत. हि बातमी ऐकल्यानंतर पहिली प्रार्थना केली ती त्या शाळेतल्या सर्व मुलांसाठी, कि त्यांच्या पालकांची नावे मतदार यादीत असूदेत. नाहीतर पालकांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांच्या मुलांचा एक गुण उगाच कमी व्हायचा. एकीकडे मतदानाचा अधिकार वापरण्याचं आवाहन तर दुसरीकडे तोच अधिकार हिरावला जाण्याची नामुष्की, किती हा विरोधाभास. मतदानाच्या अधिकाराबद्दल जसे मतदाराला जागरूक केले जाते तशीच मतदान यादीत नाव नसल्यावर किंवा आपल्या नावावर दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केल्याचे लक्षात आल्यावर नियमानुसार काय करायचे याबद्दल देखील मतदारांना जागरूक केले गेले पाहिजे. मतदानाची सक्ती आणि मतदान करणाऱ्यांना दूषणं देण्याआधी, व्यवस्थेमध्ये सुधारणा करून नियमितता आणणे गरजेचे आहे.
एकूणच निवडणुकीबद्दल बोलायचं तर व्यवस्थेमध्ये सुधारणेची गरज तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त मतदारांमध्ये मतदार म्हणून सुधारणेला वाव आहे. महत्वाचे म्हणजे एक नागरिक म्हणून सदैव जागरूक राहण्याची गरज आहे.  सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क आणि साशंक राहण्याची गरज आहे. एखाद्या आजाराची लक्षणं दिसल्यावर इंटरनेटवर शोधाशोध करून मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात पारंगत असलेल्या डॉक्टरला जसे आपण प्रश्न विचारून बेजार करतो, अगदी तसेच व्यवस्थेतील आजारी घटकांवर रिसर्च करून राजकीय पक्षांना, नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि मग त्या प्रश्नांच्या मिळणाऱ्या, मिळणाऱ्या उत्तरांवर निवडणुकीत कुणाला मत द्यायचे हे ठरवले पाहिजे. नाहीतर, काही आश्वासनं, काही व्हॉट्सअँप फॉर्वर्डस, काही फेसबुक पोस्ट्स, काही ऐकायला बारी वाटणारी आणि तोंडवळणी पडणारी घोषवाक्ये याचा वापर करून रणनीतीकार जर निकालाची दिशा ठरवणार असतील तर मतदाराने काय केवळ ईव्हीएम मशीनचं एक बटन दाबून बोटावर शाई लावून घेण्यासाठी मतदान करायला जायचं? याला मतदानाचा अधिकार म्हणायचा कि मतदानाची औपचारिकता? शेवटी इतकंच म्हणेन कि, मतदानाची केवळ औपचारिकता करता त्याचा अधिकार म्हणून वापर करायचा असेल तर, मत मागताना जेवढा अभ्यास हे राजकीय पक्ष, नेते, रणनीतीकर मतदाराचा करतात, किमान तेवढा किंवा त्याहीपेक्षा जास्त अभ्यास मत देताना मतदाराने राजकीय पक्षांचा, नेत्यांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि एकूणच देशाच्या व्यवस्थेचा केला पाहिजे.  














श्री. सचिन राजे .