Friday, December 22, 2017

आज वेळ नाही ... मंजिरी जोशी

सुख आहे सगळ्यांच्याच पदरात,
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही......
आईच्या अंगाईची जाणीव आहे,
पण आईला आज
"आई" म्हणायला वेळ नाही...
सगळी नाती संपवून झालीत,
पण त्या नात्यांना
पुरायलाही आज वेळ नाही...
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये सेव्ह आहेत,
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही...
ज्या पोराबाळांसाठी मेहनत दिवसरात्र करतात
त्यांच्या कडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही..
सांगेल कोण कशाला दुसऱ्याबद्दल,
जेव्हा इथे स्वतःकडेच
बघायलाही वेळ नाही...
डोळ्यावर आलीय खूप झोप,
पण आज कोणाकडे
झोपायलाही वेळ नाही..
हृदयात वेदनांचा पूर वाहतोय,
पणते आठवून
रडायलाही आज वेळ नाही..
परक्यांची जाणीव कशी असेल?
जर इथे आपल्याच माणसांसाठी आज वेळ नाही...
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या,
या संघर्षात जरा मागे वळून,
पाहायलाही आज वेळ नाही...
अरे जीवना तूच सांग,
जगण्यासाठी चाललेल्या या धावपळीत
जागायलाही आज वेळ का नाही????


मंजिरी जोशी

No comments:

Post a Comment