Saturday, June 5, 2021

"आई"----सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

"आई"

आई आपल्याला सदैव हवी असते, सदैव हवी असते.
अगदी आपण म्हातारे झालो तरीही.
आई पेक्षा उत्तम मैत्रीण कुणी नसते,
मन मोकळे केले की,तीच धीर देत असते,
चुक जरी झाली तरी माफीचा हात तीच फिरवत असते .

आई असते तेव्हा आरडाओरड करायचा तिच्या वर असतो हक्क,
आई  पासुन दुर गेल्यावर समजते  तिचे महत्त्व  ,
घरात वावरताना किती मोठे असते तिचे अस्तित्व,
मुलं मोठी होत असतात, पण आई ती आईच असते.

आई नसताना रोज येते तीची सारखी आठवण,
कशात मन रमवावे येत नाही लक्षात पटकन .
हाच विचार करून तिने दिले कन्यादानात सोपवून,
मी नसताना जा आपल्या संसारात रमून .

भातुकली खेळतांना बघीतली तुझी साडी नेसून,
पण आता तू दिलेले संस्कार लक्षात ठेवून ,
बघेल मी तूझ्या पावलावर पाऊल टाकून.
जमतेय का मला तुझ्या सारखी आई होवून
तुझ्या सारखी आई होवून.

आई तुझा आशिर्वाद सदैव आमच्या वर असू दे,
आमच्या कडून झालेल्या चुकांना माफी दे,
तू आहेसच मायेचा भंडार, तुझ्या लेकरांना पदररात घे,
देवा तुला एक विनंती आहे, आई  ची माया सदैव  मुलांना लाभू देसदैव लाभू दे.
कारण आई ही आईच असते आणि ती सदैव हवी असते, सदैव हवी असते.
       
                                                 सौ. अंजली निलेश उज्जैनकर

No comments:

Post a Comment