जुळून येती रेशीमगाठी
स्वर्गात जुळून आल्या आपुल्या रेशीमगाठी
मी जन्म घेतला फक्त तुला भेटण्यासाठी .....
अस्वस्थ भावनांचा हा आवेग कशासाठी ?
हृदयातील प्रेम हे आहे तुझ्याच साठी .....
हुरहूर ही मनाची आहे कुणासाठी ?
मज नयनातील
माधुर्य आहे तुझ्याच साठी .....
आयुष्य हे सुखाचे विणलेले आपुल्यासाठी
तू श्वास आहेस माझा जगते तुझ्याच साठी .....
सौ. श्रेया पटवर्धन
No comments:
Post a Comment