प्रेम
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तरीही ते सगळ्यांचं सेम नसतं
कधी ते अव्यक्त नजरेतून कळतं
शब्दांवाचुन दोन हृदयांना जोडतं
कधी ते एकतर्फी मनामधेच रहातं
तर कधी विकृत सुडाने जाळणारं असतं
कधी ते मोहोब्बत बचपनकी असतं
तर कधी प्रौढ साथीचं पंचपनचं असतं
कधी ते जीवनाच्या अंतापर्यंत साथ देतं
तर कधी एका वळणावर ब्रेकअपने संपतं
भावना एक पण अविष्कार अनेक असं हे प्रेम असतं
म्हणुनच प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण नेहेमीच साऱ्यांचं सेम नसतं
कारण प्रेम नेहेमीच लैला - मजनूचं नसतं
कधी ते अश्याही जोड्यांचं असतं
जे सोकॉल्ड समाजमान्य नसतं
जरी ते फारसं बरं नसतं
तरीही ते तितकंच खरं असतं
नेहेमीच्या गुलाबी रंगाचं नसतं
तर ते थोडं वेगळं इंद्रधनुष्यी असतं
आपणही ते थोडं समजुन घ्यायचं असतं
कारण प्रेम म्हणजे प्रेमच असतं
सेम नसलं तरीही तेही प्रेमच असतं
सौ नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment