प्रेम हे ....
तुझे माझे प्रेम म्हणजे सागर
अथांग
सागरासारखे माझे प्रेम आहे अमर.....
तुझे माझे प्रेम
म्हणजे बकुळीचा सुगंध
वाळून गेले तरी
दरवळत राहील प्रीतीचा गंध.....
तुझे माझे प्रेम
म्हणजे चांदणे चंद्राचे
शितल तेच उधळत
राहो कायम आपल्या प्रेमाचे...
तुझे माझे प्रेम
म्हणजे हृदयात तेवत असलेली ज्योत नसू आपण कधी जरी अनंत असेल या भावनांचा
स्त्रोत....
सौ. श्रेया
पटवर्धन
No comments:
Post a Comment