Sunday, February 28, 2021

जोडीदार-----सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

जोडीदार

 

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात,

घरातील माणसे मात्र, निमित्त कारण होतात.

 

डोक्यावर टाकून अक्षदा, माप ओलांडून आले मी घरात,

थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने केली आपण संसाराला सुरूवात.

 

संसार चालवायला लागतात दोन पावलं ,

एक पाऊल असतं उजवं, तर दुसरं असतं डावं.

 

दोन्ही पावलां शिवाय संसाराचा गाडा चालत नाही,

माझं तुमच्या विना आणि तुमचे माझ्या विना जमत नाही.

 

तुमची माझी गाठ बांधली आहे सात जन्माची,

कारण  तुमच्या माझ्यात दोरी आहे विश्वासाची.

 

संसारात, जीवनातील सुख दुःख वाटून घ्यायची असतात,

कितीही नाकरले तरीही, ती आपली म्हणून स्विकारावीच  लागतात.

 

संसारातील निर्णय घेताना होते आपले एक मत,

तुमच्या सकारात्मक विचारांशी होते मी सहमत.

 

तुम्ही मला आणि मी तुम्हाला देत राहू अशीच साथ,

देवाला करु प्रार्थना,राहू दे असाच आमच्यावर आशिर्वादाचा हाथ.

 

तुम्ही सतत विचार करीत असता घरच्या, बाहेरच्यांच्या मनाचा.

पण बरेचदा लोक गैरवापर करून घेतात तुमच्या शांत स्वभावाचा.

 

अशावेळी खुप होतो संताप ,

का आपलेच लोक असे वागतात याचा होतो पश्चात्ताप.                           

 

आपल्या आयुष्यात आलेल्या दोन पर्यांनी घर आले बहरुन,

आईवडील या नात्याने संस्काराची शिकवण देऊ,त्यांना चांगले माग॔दश॔न करून.

 

सुखी संसाराला साथ असते नवरा बायकोच्या जोडीची,

आपली जोडी शोभून दिसते प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाची.

 

अशीच तुमची साथ लाभावी साता जन्माची

संसारात गोडी वाढावी आपल्या प्रेमाची.

 

                                            सौ. अंजली निलेश उज्जैनकर

No comments:

Post a Comment