Sunday, February 28, 2021

प्रेम---------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

प्रेम

 

प्रेमात रुसव्या फुगव्या शिवाय मजाच नाही,

किती ही चांगले वागलो तरी त्याला पर्याय नाही.

 

तुझं माझ्या विना आणि माझं तुझ्या विना जमत नाही,

इतके वर्ष झाली तरी तुला हे कसे कळत नाही.

 

प्रेम कोणत्याही पारड्यात तोलता येत नाही,

प्रेमाची तुलना कुणाच सोबत करता येत नाही.

 

प्रत्येकालाच प्रेम व्यक्त करता येत नाही,

म्हणून काय प्रेम नाही, असे म्हणता येत नाही.

 

प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या सारखी नाही,

बोलून दाखवली नाही, तर ती समजतही नाही.

 

एका हातानी टाळी वाजत नाही,

म्हणून दोघांनी एक एक पाऊल पुढे चालायला हरकत नाही.

 

प्रत्येक वेळी i love u म्हणायची गरज नाही,

पण वेळ बघून म्हटल्यावर त्या आनंदाची मजा कशातच नाही.

 

                                            सौ. अंजली निलेश उज्जैनकर

No comments:

Post a Comment