प्रेमाचा वलेंटायन्स डे
तुझ्या सारखा साथीदार
मिळायला खरंच
नशीब हवं
आयुष्यात तू
आल्या पासून
सगळंच वाटतं नवं
नवं
जीवनात माझ्या
तुझं असणं
माझ्यासाठी जणू
भेट खास
विचारात तुझ्या
दिवस रात्र
हरवून जाते मी
तासन तास
न वेळेचं न
काळाचं
न कसलंच बंधन
आम्हा दोघांस
हवा हवा सा वाटत
असतो
सदैव तुझा सहवास
तुझ्या माझ्या
नात्याला
हवाय का हा
वलेंटायन्स डे?
रोजच करतो प्रेम
व्यक्त
चिढतो भांडतो ही
प्रेमाने
मनाला समजावत
असते मी
वी हेव टू गो अ
लॉंग वे
रोजच करू
सेलिब्रेट आपण
प्रेमाचा हा
वलेंटायन्स डे
-रुपाली मावजो किर्तनी
No comments:
Post a Comment